Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि.१६ एप्रिल २०२६ मेष राशी विद्यार्थ्यांना आज काहीतरी नवीन शिकायला मिळू शकते. तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. बऱ्याच काळापासून रेंगाळत असलेली एखादी कौटुंबिक समस्या आज सुटण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत आहात, त्या प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. वृषभ राशी आज, तुम्ही एखादे काम नियोजित करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमची सर्व नियोजित कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. तुमचा जोडीदार आनंदी होईल. तुम्हाला एका प्रतिष्ठित कंपनीकडून मुलाखतीसाठी बोलावणे येऊ शकते. आज तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी मिळतील. मिथुन राशी आज, शांततेच्या अभावामुळे तुम्हाला थोडे गोंधळल्यासारखे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, या वादात आता करुणा मुंडे यांनी उडी घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “महिलांवर जितके अत्याचार अशोक खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले,” असा थेट आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. अशोक खरातने राजकीय आणि प्रशासकीय पाठबळावर मोठे सिंडिकेट उभारून महिलांचे शोषण केल्याचे आरोप समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ‘कॉल कुंडली’ प्रकरणातून अनेक बड्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी या प्रकरणाचा ‘आका’ कोण आहे, याचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या कथित भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणात आता सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेषतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी नुकतीच शिर्डी पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. मात्र बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले. यावरून अंधारे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. अंधारे म्हणाल्या की, “महिला नेत्या म्हणून अदिती तटकरे यांनी आधी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी. केवळ पद भूषवून चालणार नाही, तर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गावठी पिस्तूल व धारदार कोयता घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14/04/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कासमवाडी परिसरात दोन इसम घातक शस्त्रांसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बवन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तात्काळ कार्यरत करण्यात आले. पथकाने कासमवाडी, नेरी नाका आणि स्मशानभूमी परिसरात शोधमोहीम राबवली. कासमवाडी ते नेरी नाका रोडवरील एकता चौकाजवळील मोकळ्या पटांगणात दोन इसम दुचाकीवरून येताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला,…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, हे जाळे केवळ मुंबई आणि पुणेपुरते मर्यादित न राहता आता विदर्भातील ग्रामीण भागापर्यंत पसरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्याची परिस्थिती 10 वर्षांपूर्वीच्या पंजाबसारखी होत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. वडेट्टीवार यांनी सांगितले की, अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचे जाळे पसरले आहे. याशिवाय नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही अंमली पदार्थांच्या घटना वाढताना दिसत आहेत. यामुळे राज्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर या विळख्यात अडकत असल्याचे त्यांनी नमूद केले. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या ताज्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी गृहविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या शनिपेठ पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक विनोद अहिरे याला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलावर कारवाई न करण्यासाठी विनोद अहिरे याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने त्याला सापळा रचून रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीही अशा प्रकारे लाच स्वीकारली आहे का,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील मेहरुण तलाव ट्रॅकवर मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुकीचा कारला कट लागला. त्या कारणावरुन कारमधील चौघांनी अनुजर शेख शकील (वय १९, रा. फातेमानगर) या तरुणावर चॉपरने हल्ला केला. ही घटना रविवार दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फातेमानगरात अनुजर शेख शकिल हा रविवार सुटीचा दिवस असल्याने त्याचा मित्र समीर आरिफ मोमीन व शेहजाद सलीम खाटीक यांच्यासोबत (एमएच १९, ईटी ५९११) क्रमांकाच्या दुचाकीवर मेहरुण ट्रॅकवर फिरत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना कट मारला. त्यानंतर कारमधील चौघे जण हे खाली उतरुन त्यांनी अनुजर शेख…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने रस्त्याने पायी जाणाऱ्या सदरुद्दीन शेख अब्दुल (वय ६५ रा. जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर) यांना धडक दिली. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दि. १३ एप्रिल रोजी दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे रस्त्यावरुन पायी जात असलेल्या सदरुद्दीन शेख अब्दुल या वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच ४१, बीटी २०२१) या क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याची घटना दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या अपघातात शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरून उचलत रिक्षात टाकून उपचारासाठी त्यांना अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षीय मुलीवर तिच्या ३४ वर्षीय मावसाने वेळोवेळी अत्याचार केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आणि त्यानंतर ही घटना समोर आली. सन २०२५ मधील दिवाळी सणाच्या १५ दिवस अगोदर ही १६ वर्षीय मुलगी घरी एकटीच असताना, तिच्या ३४ वर्षीय मावसाने तिच्यासोबत जबरदस्ती करीत अत्याचार केला. त्यानंतरही मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देत, त्याने वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले. तेथून तालुका पोलिस ठाण्यात मााहिती देण्यात आली व पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी अत्याचार केल्याचे सांगितले. मुलीच्या फिर्यादीवरून…

Read More

जळगाव ; प्रतिनिधी  पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या देविदास रामा कोळी (६१, रा. रायपूर, ता. जळगाव) यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी २ लाख ३१ हजार ३६९ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. ही घटना २६ ते ३० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेले देविदास कोळी हे २६ मार्च रोजी राजकमल टॉकीज परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. त्यावेळी त्यांच्या मागे हेल्मेट घातलेल्या एक जणाने त्यांना थांबविले व ‘बाबा तुमचे…

Read More