Author: editor desk

मुक्ताईनगर : मनोज पाटील  इंदूर-हैदराबाद महामार्गावरील कर्की फाट्याजवळ अपूर्ण पडलेल्या पुलाचे काम आणि सर्व्हिस रोडवर निर्माण झालेले खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या गणेशोत्सवाचे आगमन सुरू असताना, कर्की फाट्यावरील या रस्ता दुरुस्तीच्या अभावामुळे श्रींच्या मूर्ती नेताना भाविकांना आणि स्थानिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावला; अपघाताचा धोका महामार्गावरील पुलाचे काम दीर्घकाळापासून अपूर्ण असल्याने सर्व वाहतूक अरुंद सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. आगमनात मोठा अडथळा: पिवळ्या प्लास्टिकने झाकलेली भव्य गणेशमूर्ती ट्रॅक्टर ट्रॉलीवरून नेताना खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अत्यंत धोक्याचे ठरत आहे. मूर्ती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मोबाइल रिचार्ज अपडेट करण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने सेवानिवृत्त वृद्धाची मुदत ठेव प्री-मॅच्युअर करून तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. रमेश नारायण पाटील (क्य ७४, रा. महाबळ) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश पाटील यांना भामट्याने व्हॉट्सअॅपवर कॉल केला होता. गुगलवर जाऊन रिचार्ज अपडेट टाइप करा आणि डेबिट कार्डचे डिटेल्स भरा, तुमचे रिचार्ज होऊन जाईल, असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला, पाटील यांनी सांगितल्यानुसार प्रक्रिया करताच भामट्याने त्यांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्याशी लिंक असलेल्या नेटबँकिंगचा ताबा मिळवला. आरोपीने ९ व १० सप्टेंबर दरम्यान पाटील यांच्या खात्यावर असलेल्या मुदत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील महाबळ परिसरातील संत गाडगेबाबा चौकात दि.१० सप्टेंबर रोजी  तयार खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानावरून नेलेली वरण, बट्टी खराब असल्याबाबत विचारणा केल्याने पंकज सुरेश बारी (३८, रा. माऊली नगर) यांना वरण, बट्टी सेंटर चालकासह दोन जणांनी मारहाण केली. पंकज बारी यांनी दुकानावरून वरण, बट्टी नेल्यानंतर ती खराब निघाली होती. त्याविषयी ते दुकानमालक दिनेश सपकाळ यांच्याशी बोलले असता त्यांनी बारी यांना ढकलून दिले. तसेच तुषार सोनवणे नामक व्यक्तीला बोलवून घेत दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी पंकज बारी यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दिनेश सपकाळ व तुषार सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जुन्या वादातून क्षितिज मनोज निदाणे (२०, रा. शनिपेठ, गुरुनानक नगर) या तरुणावर तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाच्या मानेसह पोटावर, छातीवर असे अनेक वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (१२ ऑगस्ट) गुरुनानक नगरात घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज जप्त केले आहे. गुरुनानक नगरातील क्षितिज निदाणे याचे परिसरातील काही तरुणांसोबत वाद होते. याच वादातून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी क्षितिजचा पाठलाग करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. शरीरावर जागोजागी वार झाल्याने तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला…

Read More

यवतमाळ : वृत्तसंस्था सणासुदीच्या काळात यात्रेचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर अत्यंत भयंकर प्रसंग ओढवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातून समोर आली आहे. महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील यात्रेत आकाश पाळण्यात बसलेल्या एका महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळण्याचा वेग जास्त असल्याने अवघ्या काही सेकंदात या महिलेचे केस जोराने खेचले गेले आणि केसांसह त्यांच्या डोक्याची चामडीच उपटून निघाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्याच्या निमित्ताने मोठी यात्रा भरली होती. या यात्रेचा आनंद घेण्यासाठी बाली मारोती टाळीकोटे या महिला आल्या होत्या. त्या यात्रेतील आकाश पाळण्यात बसल्या. पाळणा वेगाने गोल फिरत असताना अचानक…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  पारोळा तालुक्यातील पळासखेडे बुद्रुक येथे जुन्या वादातून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला पारोळा पोलिसांनी अवघ्या काही तासांत राजवड येथील घनदाट जंगलातून जेरबंद केले. मिळालेल्या माहितीनुसार,  पळासखेडे बुद्रुक येथील अंकुश नेहरू पाटील (वय ३०) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे. दरम्यान, पळासखेडे बुद्रुक येथे १० सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास रवींद्र सुकदेव पाटील यांच्या शेताजवळ मयूर दुर्वास पाटील आणि अंकुश नेहरू पाटील यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद सुरू झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन केलेल्या वाळुची ट्रक तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधुन मधुन चोरटी वाहतूक केली जात होती. शहरात दोन ठिकाणी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी जिल्हापेठ तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी सकाळी ५.५० वाजेच्या सुमारास खोटेनगरकडून हा ट्रक आकाशवाणी चौकाकडे जात होता. यासंदर्भात गोपनीय माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी आयटीआयजवळ हायवेवरील वाहनावर लक्ष ठेवले. संशयास्पद येणार ट्रक (एमएच ई ७३७२) दिसताच तो थांबविला. वाहनाच्या तपासणीत त्यात १४ हजार किमतीची सुमारे दोन ब्रास वाळु निदर्शनास आली. चालकाची चौकशी केली असता त्याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आणि परवानगी नसल्याचे समोर आले. सुमारे ५० हजाराचा ट्रक, नऊ हजार…

Read More

जळगाव | प्रतिनिधी कविवर्य ना. धों. महानोर यांच्या साहित्यिक आणि सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कार वितरण सोहळा २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात मुंबई ला झाला. भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात साहित्य व शेती-पाणी क्षेत्रातील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याचवेळी परिवर्तन जळगाव निर्मित ‘हंस अकेला’ या संत कबीरांच्या विचारांचा शोध घेणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, डॉ. श्रीकांत देशमुख, सुधींद्र कुलकर्णी, तसेच ना. धों. महानोर यांचे कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन दत्ता बाळसराफ यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात अवघ्या १२ वर्षांच्या एका शाळकरी मुलाने घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. या चिमुकल्याने इतक्या लहान वयात टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. रोहित राहुल चौधरी (वय १२, मूळ रा. लक्ष्मी नगर, जळगाव) असे या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  रोहित हा भुसावळ येथील एका हॉस्टेलमध्ये राहून तिथल्याच शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वीच तो जळगावला आपल्या घरी आला होता. रोहितच्या वडिलांनी नुकतेच शहरातील खडके चाळ भागात एक नवीन घर घेतले होते आणि याच नव्या वास्तूत ही दुर्दैवी घटना घडली. ९ सप्टेंबर…

Read More

आदिवासी नृत्य, मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके अन् वृषभराजाची भव्य मिरवणूक ठरली आकर्षण जळगाव : प्रतिनिधी आदिवासींचे पारंपरिक होळी नृत्य.. मल्लखांबची चित्तथरारक प्रात्यक्षिके.. सालदार मंडळींचे उत्स्फूर्त पावरी नृत्य… अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांची लेझीमवर गणेशवंदना… वृषभराजाची भव्य सवाद्य मिरवणूक… अशा कृषीसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पोळा सण जैन हिल्स येथे थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, प्रकुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदोर मावोजो, राजेंद्र मयूर, उपमहापौर मनोज चौधरी, हिमाचल प्रदेश हॉर्टिकल्चर विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सोमदेव…

Read More