Author: editor desk

आजचे राशिभविष्य दि. १५ एप्रिल २०२६ मेष राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. तुमची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत राहील. पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारतील. तुम्ही काही सर्जनशील कामात स्वतःला गुंतवून घ्याल. अधिकारीसुद्धा तुमच्या कामावर खूश होतील. वृषभ राशी तुमचे तुमच्या पालकांशी असलेले संबंध सौहार्दपूर्ण आणि सुसंवादी राहतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. आज, तुमची समाजकार्यातील आवड वाढेल. तुम्ही गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला एखादे गुपितही कळू शकते. तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवू शकता. मिथुन राशी तुमची सर्व महत्त्वाची कामे आज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी “समाजातील असमानता दूर करण्यासाठी संविधानाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. कार्यक्रमाला महापौर दीपमाला काळे,उपमहापौर मनोज चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रकार तथा लेखक राजू बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश महाजन, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, सहायक आयुक्त योगेश पाटील, प्रकल्प अधिकारी अरुण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था दादर परिसरात पूर्ववैमनस्यातून ४० वर्षीय तरुणाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत अंकुश आंबोरकर यांचा मृत्यू झाला असून, गौरव सणस आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दादर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश आंबोरकर रविवारी रात्री दादर येथे आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी गौरव सणसने त्यांना रस्त्यात अडवले. दोघांमध्ये झालेल्या शाब्दिक वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. गौरवने आपल्या टोळक्यासह अंकुश यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था भोंदूबाबा म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून, यामध्ये पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. या नव्या खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणात मोठी खळबळ उडाली आहे. दमानिया यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कराळे हे अशोक खरात यांच्या कार्यक्रमात उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला आहे. इतक्या वरिष्ठ पदावरील पोलिस अधिकारी अशा वादग्रस्त व्यक्तीच्या कार्यक्रमात का सहभागी झाले, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, त्यांनी त्या कार्यक्रमात भाषणही केल्याचे सांगत यामुळे सामान्य नागरिकांमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी महानगरपालिकेच्या दि. १५ एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेस नगरसेविका वैशाली अमित पाटील (प्रभाग क्र. १३) यांनी वैद्यकीय कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) द्वारे उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. महापौर दीपमाला काळे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, दि. ४ एप्रिल रोजी मुंबई येथील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सभेला उपस्थित राहणे सध्या शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महासभा प्रत्यक्ष उपस्थितीत घेण्याची तरतूद असली, तरी विशेष परिस्थितीत स्थानिक प्रशासनास आवश्यक त्या सवलती देण्याचे अधिकार आहेत. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर काम करीत असलेला मजूराचा तोल जावून कोसळला. यामध्ये मुकेश गोकुळ सोनार (वय ३२, रा. तानाजी मालुसरे नगर, असोदा रोड) या बांधकाम मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना दि. १३ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मास्टर कॉलनी परिसरातील शेरा चौकात घडली. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कुठलीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप मयताचा भाऊ राकेश सोनार याने केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि,  शहरातील मास्टर कॉलनीतील शेरा चौकात साबीर शेख यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास ठेकेदार…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी राज्यातील विविध जिल्ह्यांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे करून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले. गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळालेल्या माहितीवरून पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर अचूक नियोजन करत त्याला अटक करण्यात आली. सादिक अली हा अनेक दिवसांपासून विविध जिल्ह्यांत फरार होता आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातही तो हवा होता. तपासात आरोपीने जळगाव जिल्ह्यासह वर्धा, बुलढाणा, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर येथे चैन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत शनीपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका लोकसेवकाला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद पितांबर अहिरे (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी लोकसेवकाचे नाव असून ते शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे कार्यरत आहेत. तक्रारदार हे जळगाव येथील रहिवासी असून त्यांच्या मुलाविरुद्ध शनीपेठ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपी लोकसेवकाने तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१४ एप्रिल २०२६ मेष राशी तुम्ही तुमची कामे अत्यंत काळजीपूर्वक आणि कार्यक्षमतेने पूर्ण कराल. तुमच्या मुलांबद्दलची चिंता दूर होईल. तुमच्या आजच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नजीकच्या भविष्यात मिळेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज, तुम्ही तुमच्या कामाच्या योजनांमध्ये बदल करण्याचा विचार कराल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली बातमी मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सहलीचे नियोजन कराल. लहानपणीपासूनच्या मित्राची भेट झाल्याने मन खूप खुश असेल. वृषभ राशी व्यवसायात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरेल. विवाहित लोकांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी उत्साही वाटेल. तुमच्या सर्व शैक्षणिक इच्छा पूर्ण होतील. वैद्यकीय किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 8 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोविली गावाजवळील रायता पुलावर सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कल्याणहून मुरबाडच्या दिशेने प्रवासी घेऊन निघालेल्या ईको कारला समोरून येणाऱ्या भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आणि आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते.…

Read More