भुसावळ : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बोरगाव परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजता झालेल्या भीषण कार अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण वरणगाव आणि दर्यापूर शिवार परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातात श्याम विक्रम ठाकूर (वय ४५), शोभा विक्रम ठाकूर (वय ६०) आणि अवघ्या ५ वर्षीय शिवन्या श्याम ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकूर कुटुंबीय उज्जैन, ओंकारेश्वर आणि सिहोर येथे धार्मिक दर्शनासाठी गेले होते. दर्शन पूर्ण करून…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात उघडकीस आलेल्या तरुणींच्या शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने पोलिस चौकशीत केलेले खुलासे अधिकच धक्कादायक ठरत असून, या गुन्ह्याच्या मागील मानसिकता आणि कार्यपद्धती उघड झाली आहे. चौकशीदरम्यान अयानने पहिल्या ब्रेकअपनंतर आपण “प्लेबॉय” बनल्याचे सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकार कोणत्याही मानसिक आजारातून नव्हे, तर चुकीच्या जीवनशैलीतून आणि विकृत विचारसरणीतून घडलेला आहे. तपासात असे उघड झाले आहे की, अयान अहमद सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर अत्यंत सक्रिय होता. त्याचे तब्बल १८ हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. तो…
जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” र सुरु नाही – केवळ १४ विहिरी अधिग्रहित – नागरिकांना दिलासा जळगाव : प्रतिनिधी पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना अखंडितपणे सेवा द्यावी,” असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील पाणीटंचाई व महावितरण कडील विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार…
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील एकरुखी शिवारात १५ एप्रिल रोजी दुपारी १च्या सुमारास महावितरणच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांच्या शार्ट सर्कीट मुळे सुमारे सहा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे व गट नंबर पुढील प्रमाणे १)भीमसिंग पन्ना जाधव यांच्या शेतात मका पिक होते क्षेत्र 0.89 आर गट. नं. ११६/३ब २)हिम्मत पन्ना जाधव यांच्या शेतात बाजरी पिक होते क्षेत्र 0.89 आर गट नं. ११६/३ब ३)दिपक बळवंत जाधव यांच्या शेतात मका क्षेत्र १.७८ आर गट नं.११६/३ब ४)कादरका मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२० आर गट नं.११७ ५) कदरखा मेवाती यांच्या शेतात मका क्षेत्र १.२०आर गट नं.११७ ६) शकीलखा मेवाती…
चोपडा : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी रामपुरा भागात गोरक्षक आणि पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर बुधवारी सकल हिंदू समाजातर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या निलंबनाची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ‘गोमाता वाचवा’ आणि ‘दोषींवर कारवाई करा’ अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. गांधी चौकापासून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेत रूपांतरित झाला, ज्यात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष संजय शर्मा म्हणाले, संविधानाला न मानणाऱ्या आणि गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पीआय साळवे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. कत्तलखाने चालवणाऱ्यांना पाठबळ देणाऱ्या पोलिसांना आता हिंदू समाज सोडणार नाही,’ असा इशारा त्यांनी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील जळके,वसंतवाडी,सुभाषवाडी,वराड,विटनेर परिसरातील भारत गॅस ग्राहकांना जळगाव महाबळ येथील भुषण गॅस एजन्सी कडून गॅस सिलिंडर बुक करुन देखील सिलेंडर लवकर दिले जात नसल्याने भुषण गॅस एजन्सीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या परिसरातील भारत गॅस ग्राहकांनी मागील महिन्यात १७,१८,१९मार्चला आपले सिलिंडर बुक केले असुन त्या ग्राहकांना ३,४ एप्रिल ला सिलिंडर डिलिव्हरी मेसेज प्राप्त झाले असून ग्राहकांना सिलिंडर मिळाले नाहीत तसेच ग्राहकांनी दुरध्वनी वरून विचारणा केल्यावर आज येणार उद्या येणार असेच सांगितले जाते. या संदर्भात भुषण गॅस एजन्सीचे संचालक भुषण चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजब उत्तर दिले की ग्रामीण भागात पुरवठा करणे शक्य होत…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वंजारी खपाट येथे महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचे उभे मका पीक पूर्णपणे जळून खाक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून प्रशासनाकडे तातडीने पंचनामा व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पुरुषोत्तम शंकर चौधरी (रा. वंजारी खपाट, ता. धरणगाव) यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज सादर केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या शेतातून जाणाऱ्या महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीत अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे ठिणग्या उडून शेतात आग लागली आणि काही क्षणातच संपूर्ण मका पीक जळून गेले. या आगीत चौधरी यांचे उभे पीक पूर्णतः…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अत्यंत वर्दळीचा आणि सुरक्षित मानला जाणाऱ्या जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात बुधवारी (१५ एप्रिल) सायंकाळी साखळीचोरांनी धाडसी हात साफ करत सेवानिवृत्त महिलेच्या गळ्यातील सुमारे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रिंगरोड परिसरात राहणाऱ्या नीलिमा विश्वासराव पाटील (वय ६६) या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. नेहमीप्रमाणे त्या बुधवारी सायंकाळी फिरण्यासाठी भाऊंच्या उद्यानात गेल्या होत्या. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता त्या पायी घरी परतत असताना, पाठीमागून एका दुचाकीवरून दोन अज्ञात इसम वेगाने त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने क्षणात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडून जोरात…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका महिला ग्राफिक डिझायनरची अघोरी विद्या आणि गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांत फसवणूक झाल्याच्या प्रकाराला चार वर्षे उलटून गेले असले तरी, या गुन्ह्यातील दांपत्याला पोलिस पकडू शकलेले नाहीत. यातील, मुख्य संशयिताची पत्नी स्वतः पोलिस कर्मचारी असल्याने या तपासात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत संतप्त पीडितेने १६ एप्रिलला अखेर पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. पीडित महिला आणि संशयित पोलिस कर्मचारी महिमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. पीडितेच्या घरातील वादाचा गैरफायदा घेत महिमाने तिचा पती ललित पाटील याच्याकडे ‘दैवी शक्ती’ असल्याचे सांगितले. घरातील संकटे दूर करण्याचे आश्वासन देत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिला अघोरी विद्येच्या…
जळगाव : प्रतिनिधी विमानतळ परिसरातील तारा बिझनेस पार्कमध्ये एका व्यावसायिकाच्या c अज्ञात चोरट्यांनी १० लाख रुपयांच्या रोकडसह सुमारे १२ लाख १३ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा खुर्द (विमानतळ जवळ) भागातील तारा बिझनेस पार्कमध्ये मोईज अब्बास बोहरा (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराच्या तळमजल्यावर ‘रुबी पेंट’ नावाची रंगाची फॅक्टरी असून वरच्या मजल्यावर ते वास्तव्यास आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात रंगाचे आणि फर्निचरचे काम सुरू आहे. १० एप्रिल रोजी मोईज बोहरा हे एकटेच दर्शनासाठी बऱ्हाणपूर येथील हकीमी दर्गा येथे…

