Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला
    क्राईम

    मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला

    editor deskBy editor deskApril 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील मेहरुण तलाव ट्रॅकवर मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या दुकीचा कारला कट लागला. त्या कारणावरुन कारमधील चौघांनी अनुजर शेख शकील (वय १९, रा. फातेमानगर) या तरुणावर चॉपरने हल्ला केला. ही घटना रविवार दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी हल्ला करणाऱ्या तरुणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फातेमानगरात अनुजर शेख शकिल हा रविवार सुटीचा दिवस असल्याने त्याचा मित्र समीर आरिफ मोमीन व शेहजाद सलीम खाटीक यांच्यासोबत (एमएच १९, ईटी ५९११) क्रमांकाच्या दुचाकीवर मेहरुण ट्रॅकवर फिरत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना कट मारला. त्यानंतर कारमधील चौघे जण हे खाली उतरुन त्यांनी अनुजर शेख याला मारहाण केली. या मारहाणीत दाढी असलेल्या एकाने त्याजवळ असलेल्या चॉपरने अनुजर याच्यावर वार करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर संशतिय हल्लेखोर हे तेथून पसार झाले. दरम्यान, जखमी अनुजर याला तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कायद्याचा सौदा महागात; लाचखोर पोलिस नाईक पोलिस कोठडीत !

    April 15, 2026

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    April 15, 2026

    संतापजनक : ३४ वर्षीय मावशाने केला १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती !

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.