मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध क्षेत्रांमध्ये बदल घडवणाऱ्या आठ महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला. पद्मविभूषण सन्मानित ज्येष्ठ पार्श्वगायिका Asha Bhosle यांच्या स्मृती जपण्यासाठी मुंबईतील वांद्रे-अंधेरी परिसरात ‘आशा भोसले संगीत अकॅडमी’ उभारण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या अकॅडमीसाठी योग्य जागा निश्चित करण्याचे आदेश म्हाडाला देण्यात आले आहेत.आशाताईंनी यापूर्वी या भागात जागा उपलब्ध करून देण्याची इच्छा व्यक्त केली होती, ती त्यांच्या निधनानंतर पूर्ण होत असल्याचे चित्र आहे. या उपक्रमामुळे नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून संगीत क्षेत्राला नवी दिशा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था स्वतःला “दैवी अवतार” म्हणवून घेत शेकडो भाविकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला कथित अशोक खरात सध्या पोलिस कोठडीत असून तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसा त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळल्याचे चित्र समोर येत आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांवर “तुमच्यावर देवाचा कोप होईल” अशा प्रकारच्या धमक्या देत तो त्यांना भुलवण्याचा आणि मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता. तसेच काही अधिकाऱ्यांना भविष्य सांगण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. मात्र विशेष तपास पथक (SIT) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्याकडून सुरू असलेल्या सखोल चौकशीमुळे संपूर्ण प्रकरणाचा आवाका वाढत चालला असून, आरोपीकडून मिळणारी माहिती अत्यंत मर्यादित आणि त्रोटक असल्याचे समजते. कोठडीत…
जामनेर : प्रतिनिधी मंदिराच्या पायरीवर बसलेल्या तरुणाला अचानक चक्कर येऊन खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना पहूर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पहूर कसबे येथील हनुमान मंदिराच्या पायरीवर मित्रांसोबत बसलेल्या हितेश अरुण पवार (वय १९) या तरुणाला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. घटनेनंतर त्याला तातडीने गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री सुमारे आठ वाजेच्या दरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मृत हितेश हा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. शालेय जीवनातच त्याला…
जळगाव : प्रतिनिधी घरी बसून ऑनलाईन रेटिंगचे काम देऊन कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवत जळगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची तब्बल २ लाख ९२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शांताराम पाटील (वय ३६, रा. गाढोदा, ता. जळगाव) यांच्याशी सुरज कुमार नाव सांगणाऱ्या व्यक्तीने संपर्क साधला. त्याने घरी बसून ऑनलाईन रेटिंगचे काम करून चांगले कमिशन मिळेल, असे सांगत त्यांना आकर्षित केले. यानंतर आरोपीने Telegram अॅपवर एक लिंक पाठवून त्यावर नोंदणी करण्यास सांगितले. सुरुवातीला १० ते २० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अमोल पाटील यांना ७००…
वरणगाव : प्रतिनिधी काहूरखेडा शिवारातील मानपूर रोडवरील सोलर प्लांटजवळील तलाव परिसरातून एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे व तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात शस्त्र पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काहूरखेडा तलावाजवळील मंदिर परिसरात एक शिवारातील व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रभारी अधिकारी अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. यावेळी अशोक जगन्नाथ कोळी (६८, मांगलवाडी, ता. रावेर; सध्या काहूरखेडा) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. अधिक चौकशी केली असता त्याने घरातून आणखी एक कट्टा, दोन…
रावेर : प्रतिनिधी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील निमड्यालगत सायबुपाडा परिसरात आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उकलले असून, पतीनेच गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरुद्ध रावेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सूत्रांनी पोलिस दिलेल्या माहितीनुसार, लालू शरद पावरा (२५, सायबुपाडा, निमड्या) या महिलेचा मृतदेह ४ एप्रिल रोजी डोंगरदरीतील झाडाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी ५ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यू संशयास्पद असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलमार्फत शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान,…
आजचे राशिभविष्य दि.१३ एप्रिल २०२६ मेष राशी संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या पालकांसोबत एका धार्मिक स्थळाला भेट द्याल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सहानुभूतीपूर्वक वागाल. सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी हा एक विशेष दिवस असेल. तुमच्यासाठी सर्व काही चांगले होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या बहुप्रतिक्षित परीक्षेचा निकाल मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. वृषभ राशी कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन आणि चांगल्या संधी मिळतील. आज, तुम्ही अशा काही लोकांशी जोडले जाल जे तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्यास तयार असतील. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडूनही मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कामाच्या ठिकाणीही परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता आणखी राजकीय रंग चढताना दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत अशोक खरात हा सरकारशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाना पटोले यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) ने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित काही बडे राजकारणी व अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. “दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत, मात्र सरकार याकडे गांभीर्याने पाहत…
मुंबई : वृत्तसंस्था भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ गाजवणाऱ्या आणि आपल्या बहुआयामी गायकीने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली. रुग्णालयाचे डॉ. प्रतीक समदानी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आशा भोसले या अनेक वैद्यकीय समस्यांनी त्रस्त होत्या. मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्या अनेक अवयवांनी कार्य करणे बंद केले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांनी आपल्या सात दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती,…
जळगाव : प्रतिनिधी आयटी क्षेत्रात करिअर घडविण्याचे स्वप्न घेऊन शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीने आपल्यावर गंभीर स्वरूपाचा मानसिक, शारीरिक व आर्थिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणामुळे आयटी क्षेत्रात तसेच सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिची ओळख तानिश शेख या तरुणाशी झाली. त्याने मोठ्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे तसेच लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. त्यानंतर हळूहळू त्याने जवळीक वाढवत मानसिक दबाव निर्माण केल्याचा आरोप तिने केला आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार, नोकरी मिळाल्यानंतर तिच्यावर छळ सुरू झाला. तसेच तानिश शेखसोबत तौसिफ अख्तर आणि निदा खान यांनीही संगनमत करून दबाव व धमक्या…

