आजचे राशिभविष्य दि. १७ एप्रिल २०२६ मेष राशी तुमचा आनंदी स्वभाव इतरांना आनंद देईल. आज तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सहलीचे नियोजन कराल. मुले खेळण्यात व्यस्त राहतील. एका अनुभवी व्यक्तीला भेटल्याने तुम्हाला तुमच्या अनेक समस्यांवर उपाय शोधण्यात मदत होईल. तुमचा जोडीदार तुमच्याकडे विशेष लक्ष देईल आणि तुमचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. वृषभ राशी आज जुन्या बाबींमध्ये अडकू नका. व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या व्यावसायिकांना पैसा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला समाजसेवेत अधिक रस वाटेल. तुम्हाला अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी लढणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारली आहे. १३ एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest च्या बेस कॅम्पवर पोहोचत ५,३६४ मीटर (१७,५९४ फूट) उंची गाठली आणि आपल्या जिद्द व चिकाटीचा ठसा उमटवला. हा ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज १२ ते १४ किलोमीटर पायी चालत, उंच डोंगर-दऱ्यांतून प्रवास करत ही मोहीम पूर्ण करावी लागते. उंची वाढत गेल्याने ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. बेस कॅम्पवर केवळ सुमारे ४५ टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो, त्यामुळे श्वसन करणेही आव्हानात्मक…
जळगाव : प्रतिनिधी समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपत माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी पाळधी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या संदेशाला केंद्रस्थानी ठेवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सदर शिबिर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार असून, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. या सामाजिक उपक्रमात प्रतापराव पाटील मित्र परिवार, GPS मित्र परिवार, विवेकी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार दि.१५ एप्रिल रोजी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ ला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोंबडी बाजार येथील अल्प बचत भवनामध्ये ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यात आले आहे. या भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्टमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन तेथे विक्रीस ठेवण्यात आलेल्या वस्तूंची पाहणी केली. यावेळी त्यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच, उत्पादनांच्या पॅकेजिंग, ब्रँडिंग व विपणनावर…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून, विधान परिषदेच्या तब्बल १७ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील ९ विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता परिषद निवडणुकीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मतदारसंघांतील निवडणुकीचा सविस्तर अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका…
जळगाव : प्रतिनिधी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी शासनातर्फे मोफत भांडी योजना राबवण्यात येत असून या योजनेचा लाभ देण्यासाठी शंभर रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील महिलेला जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. सलग दोन दिवसात झालेल्या एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर हादरले आहेत. आसमा इरफान शेख (शिवाजी नगर, जळगाव, चिंचोली, ता. जळगाव) असे अटकेतील महिलेचे नाव आहे. असे आहे लाच प्रकरण महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शासनाच्या योजनेतंर्गत गृह उपयोगी संच वाटप केले जातात व त्यासाठी काही कंत्राटी एजन्सी नेमण्यात आल्या आहेत. चिंचोली येथेदेखील देण्यात आलेल्या एजन्सीत कार्यरत…
नाशिक : वृत्तसंस्था शहरातील एका नामांकित कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि कथित धर्मांतर प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला असून, या संपूर्ण प्रकरणामागे निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासातून झाला आहे. या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा खान गेल्या २० दिवसांपासून फरार असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. तरीदेखील तिचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. कंपनीच्या ऑपरेशन विभागात मॅनेजर व टीम लीडर…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर येथील घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककला पसरली आहे. मृत्यू हा अटळ आहे, परंतु ऐन उमेदीच्या वयात एखाद्याचा अकाळी मृत्यू होणे, हा कुटुंबावर मोठा आघात करून जातो; अशीच एक दुर्दैवी घटना १५ एप्रिलला दुपारी ४ वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे घडली. सुपियान खान चांद खान पठाण (वय १६) हा युवक घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेला असता विजेच्या धक्क्याने तो जागीच कोसळला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीने त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यास उपचारासाठी हलवण्यात आले. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील ‘इक्विटस स्मॉल फायनान्स बँक’चे एटीएम मशीन चोरून नेणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीत वापरलेली मोटारसायकल आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, ३ एप्रिल रोजी, पोलन पेठ सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्समधील इक्विटस बँकेचे एटीएम मशीन अज्ञात चार चोरट्यांनी पळवून नेले होते. बँक व्यवस्थापक हरिश गांधी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी कबुली दिली की, त्यांनी त्यांच्या इतर ३ साथीदारांसह (फरहान, अकबर आणि मुजाहिद) मिळून ही चोरी केली होती. एटीएम पळवण्यासाठी शनीपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक १७ वर्षीय धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना दि. १४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने हे कृत्य केले. याप्रकरणी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा…

