Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !
    अमळनेर

    वाळूच्या डंपरची धडक : उपचारादरम्यान वृद्ध ठार !

    editor deskBy editor deskApril 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या डंपरने रस्त्याने पायी जाणाऱ्या सदरुद्दीन शेख अब्दुल (वय ६५ रा. जोशीपुरा, पिंपळे रोड, अमळनेर) यांना धडक दिली. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा दि. १३ एप्रिल रोजी दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    धुळे रस्त्यावरुन पायी जात असलेल्या सदरुद्दीन शेख अब्दुल या वृद्धाला भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच ४१, बीटी २०२१) या क्रमांकाच्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याची घटना दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली होती. या अपघातात शेख यांना गंभीर दुखापत झाल्याने रस्त्यावरून उचलत रिक्षात टाकून उपचारासाठी त्यांना अमळनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना दि. १३ एप्रिल रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात डंपर चालक रोशन खराटे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कायद्याचा सौदा महागात; लाचखोर पोलिस नाईक पोलिस कोठडीत !

    April 15, 2026

    मेहरुण तलाव ट्रॅकवर तरुणावर चॉपरने हल्ला

    April 15, 2026

    संतापजनक : ३४ वर्षीय मावशाने केला १६ वर्षीय मुलीवर अत्याचार, मुलगी गर्भवती !

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.