Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
    क्राईम

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    editor deskBy editor deskApril 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात गावठी पिस्तूल व धारदार कोयता घेऊन दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन तरुणांना जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 14/04/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कासमवाडी परिसरात दोन इसम घातक शस्त्रांसह संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बवन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तात्काळ कार्यरत करण्यात आले. पथकाने कासमवाडी, नेरी नाका आणि स्मशानभूमी परिसरात शोधमोहीम राबवली. कासमवाडी ते नेरी नाका रोडवरील एकता चौकाजवळील मोकळ्या पटांगणात दोन इसम दुचाकीवरून येताना दिसले. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान एका आरोपीच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) आढळले, तर दुसऱ्या आरोपीच्या अंगझडतीत धारदार लोखंडी कोयता व रिकामे मॅगझिन मिळून आले.

    अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे – रोहित गोपाळ कुंवर (वय 22) सागर रामा सोनवणे (वय 21)  या कारवाईत सुमारे ₹70,500 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात गावठी कट्टा, बजाज पल्सर दुचाकी, धारदार कोयता आणि रिकामे मॅगझिन यांचा समावेश आहे. या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3/25, 4/25 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी किरण चौधरी आणि योगेश घुगे करत आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे कासमवाडी परिसरात काही प्रमाणात निर्माण झालेला दहशतीचा वातावरण कमी झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

    यांनी केली कारवाई 

    एमआयडीसी पोस्टचे पोनि बवन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोटनि चंद्रकांत धनके, पोहेकों प्रमोद लाडवंजारी, पोहेकों गिरीश पठिल, पोहेकॉ किरण चौधरी, पोकों रमाकांत साळुंखे, पोकॉ शशिकांत मराठे यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.