मेष आज थोडी मेहनत केल्याने मोठा फायदा होईल. आज तुम्ही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. लहान मुलांना भेटवस्तू मिळू शकतात, ज्यामुळे ते दिवसभर आनंदी राहतील. तुम्ही ऑनलाइन वेबसाइटवरून तुमच्यासाठी काहीतरी ऑर्डर करू शकता, आज तुम्ही दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करत राहाल. आज तुम्हाला तुमच्या कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला आहे. गायीला भाकरी खाऊ द्या, सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील. वृषभ आज तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. तुम्ही केलेले काम वेळेपूर्वी पूर्ण होईल. या राशीचे अभियंते आज त्यांचा अनुभव योग्य दिशेने वापरतील.त्यांना आज चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. ऑफिसमध्ये तुम्हाला…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था पत्नीने फोनवर आय लव्ह यू म्हटले नाही म्हणून मद्यपी पतीने पत्नीला लाकडी बांबूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील लेकटाउन सोसायटीच्या दुचाकी पार्किंगमध्ये घडला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत 23 वर्षीय महिलेने शुक्रवारी दि.१ भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज रमेश खुडे (वय-28 रा. गोसावी वस्ती, कोथरुड) याच्यावर आयपीसी 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरकाम करता. गुरुवारी सायंकाळी त्या लेकटाउन सोसायटीत राहणाऱ्या बहिणीकडे गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकी येत असतांना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ८ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती माहिती. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना आता हजारो कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर ठिकाठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येतंय. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनचालक धास्तावले आहेत. जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरत ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावर उद्घाटनाला अवघ्या वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, उद्धाटनानंतर काही महिन्यातच महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर शुक्रवारी (१ मार्च) अचानक खड्डा पडला. महामार्गाजवळून काही शेतकरी पायी जात असताना पुलावरील काँक्रिट कोसळले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल जामनेर तालुक्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पपई, कांदा, टरभूजसह गहू, हरभरा, दादर, मका पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे. चोपडा तालुक्यातील पश्चिम भागातील वढोदा येथे १ मार्चला दुपारी ३.३० वाजता अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व वादळी वाऱ्याने अवघ्या १० ते १५ मिनिटात पपई, मका, केळी पिकांचे नुकसान झाले. वढोदा येथील छगन बळीराम पाटील या शेतकऱ्याचे कापणीवर आलेल्या ३०० पपईचा बाग उध्वस्त झाल्या असून पूर्ण बाग वाऱ्याने उन्मळून गेली आहे.…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरून परिसरात जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमाराचा उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरून परिसरात संशयित आरोपी दादू सोनवणे याने जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजणक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या, पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पुढील कारवाईला सुरुवात करत आहे. दरम्यान गेल्या ३ दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून गावठी पिस्तूल हस्तगत करण्याची घटना समोर आले आहे. यातच आता…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर कारचे ऑइल खाली पडत असल्याचे सांगून कारमधून १ लाख ५० हजारांची रोकड ठेवलेली बॅग अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी रात्री जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील हरेश्वर नगरातील रहिवासी गोपाळ काशीनाथ पलोड (वय ६७, ) यांचे दाणाबाजार परिसरात दुकान असून, व्यापार करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून गोपाळ पलोड हे कारने घरी जाण्यासाठी निघाले. महात्मा गांधी रोडवरून जात असताना एका द्वाकीवरून आलेले २० ते २५ वयोगट असलेले दोन जण अचानक समोर आले.…
जळगाव : प्रतिनिधी मेहरूण तलाव परिसरातील जे. के. पार्क येथे गुरुवारी रात्री गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन्ही जणांवर याआधी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिसांनी सलग दुसन्या दिवशी गावठी कट्ट्यासह फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावठी कट्टा घेऊन जे. के. पार्क परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता त्या ठिकाणी एका दुचाकीवर तीन जण उभे असल्याचे दिसून आले. पोलिस आल्यानंतर तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी अमन रशीद सय्यद ऊर्फ खेकडा (२१, सुप्रीम कॉलनी) व दीपक लक्ष्मण तरटे (२६, नागसेन नगर) या दोघांना…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगणे येथे चांदीचे दागिने चमकवून देण्याचे आमिष दाखवत तीन महिलांची भागलपूर (बिहार) येथील तिघांनी फसवणूक केली. सुमारे २० हजाराची चांदी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार २५ रोजी घडला. पोलिसांनी संशयावरून विकास विष्णू शाह (भागलपूर) याला अटक केली असून दोघांचा शोध सुरू आहे. संशयिताकडून चांदी गाळण्याचे साहित्य व सुमारे ५ हजाराची चांदी हस्तगत केल्याचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, हिंगणे येथील तीन महिला सकाळी ९च्या सुमारास घरासमोर बसलेल्या असताना तीन इसम त्याठिकाणी आले व भांडे घासण्याची पावडर घ्यायची आहे का, अशी विचारणा केली. महिला पावडर पाहत असताना त्यांनी सांगितले की, तुमच्या हातातील चांदीच्या पाटल्या…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामुळे गाजणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे अधिवेशन चांगलेच वादळी ठरले आहे. कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधिमंडळ परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्या दोघांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. सत्ताधारी पक्षातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, महेंद्र थोरवे यांच्या बोलण्याची पद्धती राग आणणारी असल्याचे दादा भुसे…

