Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील बाजूस असलेल्या दगडी पुलाजवळ एकास दोन गावठी पिस्तूल व एका जिवंत काडतूससह बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, या इसमाची माहिती मिळाल्यावरून पो. नि. गजानन पडघन यांच्या सूचनेवरुन पो. उ.नि. राजू विष्णू सांगळे, पोहेकों, नीलेश बाबुलाल चौधरी, पो. कॉ. प्रशांत परदेशी व प्रशांत सोनार यांनी त्याचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. देवानंद विकास कोळी (२०, रा. तुकाराम नगर, पाडळसा ता. यावल) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे प्रत्येकी २० हजार रुपये किमतीच्या दोन लोखंडी गावठी पिस्तूल जप्त केल्या. याचबरोबर एक जिवंत काडतूस तसेच मोबाइल, मोटारसायकलही जप्त केली. भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांपासून फरार असलेल्या सुरेश राजाराम बारेला (२५, रा. देवळी, जि. बडवानी, ह.मु. चोपडा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार, २७ फेब्रुवारी रोजी मुद्देमालासह चोपडा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील साहित्य, चोरीच्या तीन दुचाकी मिळून १ लाख ४८ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहर पोलिस ठाण्यात सन २०१७ मध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यात सुरेश बारेला हा सहा वर्षांपासून फरार होता. त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोहेकों कमलाकर बागूल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, गोरख…

Read More

भडगाव : प्रतिनिधी चाळीसगावनंतर एक दिवसाच्या अंतराने भडगाव येथेही उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (डेप्युटी आरटीओ) मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या कार्यालयाच्या मागणीसाठी भडगावात कडकडीत बंद पाळलेल्या दिवशीच सायंकाळी हे कार्यालय मंजुरीची बातमी आली. यासंदर्भात गृह विभागाचे अवर सचिव भारत लांघी यांनी बुधवारी आदेश काढले. भडगावसाठी एमएच ५४ असा नोंदणी क्रमांक असेल. विशेष म्हणजे ३६ किमीच्या अंतरात हे दुसरे डेप्युटी आरटीओ कार्यालय असेल. भडगाव येथे डेप्युटी आरटीओ कार्यालय व्हावे, यासाठीचा प्रस्ताव सन २०१७ पासून शासनाकडे प्रलंबित होता. चाळीसगाव येथे डेप्युटी आरटीओ कार्यालय मंजूर झाल्याचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. त्यामुळे याच्या निषेधार्थ बुधवारी भडगावात कडकडीत बंद पाळण्यात आला यानंतर सायंकाळी डेप्युटी…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी काल झालेल्या बेमोसमी पाऊस व गारपीट मुळे नुकसान झालेल्या शेतकयाच्या बांधावर जाऊन शेतातील पिकाचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळेस शेतकयाचे झालेले नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते यावेस भा.ज.पा.तालुका अध्यक्ष श्री सुनिल निकम सर यांनी तेथूनच आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याशी फोनवर शेतकऱ्यांनशी संभाषण करून दिले व दादांनी सर्व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी मि पुर्णपणे तुमच्या सोबत आहे असे अश्वाशित केले व शेतकयाच्या वेदना समजून घेतल्या. तेथूनच चाळीसगाव प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना फोन करून प्रत्यक्ष पाहणीस बोलवले व शेतकयाचे झालेले नुकसानाची पाहणी करून तात्काळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले यावेळेस मा.प्रांत…

Read More

गोरखपूर : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एक खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली आहे. गोरखनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापाने आपल्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या नराधम बापाने पत्नी आणि मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. आपल्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीने पोलिसांना सांगितलं की, तिचे वडील अनेक दिवसांपासून तिचा विनयभंग करत होते. छेडछाड करताना अश्लील व्हिडिओही दाखवत होते. तिने विरोध केल्यावर मुलीला बेदम मारहाण केली जात होती. वडिलांनी केलेल्या सतत मारहाणीमुळे मुलीची नजर कमजोर झाली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दि.२६ रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले, सुलतानी संकट तर आहेच पण कालचा अस्मानी संकटांने हाता तोडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यावर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ पंचनामा करावा असे आदेश देखील दिल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा तालुक्यात रात्री अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. तर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दि २६ रोजी रात्री तालुक्यातील तामसवाडी, बोळे, वसंतवाडी,…

Read More

धुळे : वृत्तसंस्था जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील लाकड्याहनुमान गावाच्या परिसरात तब्बल ३ एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एलसीबी आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे. पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. विशेष म्हणजे धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील आज कारवाईस्थळी पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकलीयापाणी धरणाच्या वाहत्या पाण्यालगत व अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. यावेळी बाजरी, ज्वारी पिकाच्याआड गांजाची लागवड आढळून आली. सुमारे २ ते ३ एकर क्षेत्रात ५ ते ७ फुट उंचीची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्यातील ३ वर्षांपासून फरार असलेल्या संशयित आरोपी धीरज अरुण कानडे वय-३६ रा. आडगाव ता. एरंडोल याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी दुपारी जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ वर्षांपूर्वी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी धीरज अरुण कानडे हा फरार झाला होता. दरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी धीरज कानडे हा जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील शहरासह ग्रामीण भागात देखील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोलद येथे माजी सरपंचाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला प्रेत आढळले. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथून दोन किलोमीटर अंतरावर कोलद नावाचं छोटंसं गाव आहे. कोलद येथील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर (वय 60 वर्षे) यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला होता. काही नागरिक तेथून जात होते, तेव्हा त्यांना या शेतरस्त्याच्या नालीत प्रेत आढळून आलं. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. माजी सरपंच असलेल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला वेग आला असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ५ मार्च रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. १५ फेब्रुवारी रोजी अमित शाह हे दौऱ्यावर येणार होते. मात्र, हा दौरा स्थगित करण्यात आला होता. आता ५ मार्च रोजी अकोला, जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे अमित शाह यांच्या सभा होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर दुपारी १ वाजता अमित शाह यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. खासदार उन्मेष पाटील यांनीदेखील अमित शाह यांच्या ५ मार्च रोजी होणाऱ्या दौऱ्याला दुजोरा दिला आहे. भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘क्लस्टर’…

Read More