जळगाव : प्रतिनिधी
जुन्या भांडणातून पुन्हा वाद घालत तीन ते चार जणांनी घरात घुसून कैलास उखा पवार (३२, रा. सुप्रिम कॉलनी) यांच्यासह त्याची १० वर्षांची मुलगी तेजस्विनी कैलास पवार हिच्यावर चॉपरने हल्ला केला. यात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत घडली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिम कॉलनीतील कैलास उखा पवार हे मजुरीचे काम करतात. मंगळवार, ३० जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच परिसरात राहणारे तीन ते चार जणांनी पवार यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला यावेळी पवार यांची मुलगी तेजस्विनी हीदेखील घरात होती. तिच्या हातावरदेखील चॉपरने वार केला. या हल्ल्यात पवार यांच्या डोक्याला तर तेजस्विनीच्या हाताला गंभीर दुखापत होऊन ते जखमी झाले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले