Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मुंबई कस्टम विभागाने तब्बल १२ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत 5 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचं सांगितलं जातंय. एकूण सहा जणांना विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. छुप्या पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत परदेशी नागरिकावर अटकेची कारवाई करण्यात आल् आहे. मुंबई विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाची तपासणी केली. तेव्हा या प्रवाशाने चक्क एका विशिष्ट प्रकारच्या बेल्टमध्ये सोनं लपवल्याचं निदर्शनास आलं. अखेर कस्टम विभागाकडून याप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच सोनंही हस्तगत करण्यात आलंय. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकांनी एक विशिष्ट प्रकाराचा तयार केलेला बेल्ट…

Read More

म्हसावद : प्रतिनिधी  येथील युवा धावपटू लोकेश पाटील यांचा नागरी सत्कार नुकताच राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांच्या हस्ते करण्यात आला. लोकेश यांनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड स्पर्धा जिंकून म्हसावद नगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून, गावाचा झेंडा सातासमुद्रापार लावला असल्याचे गौरवोद्गार यावेळी देवकर यांनी काढले. म्हसावद येथील लोकेश संजय पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे कॉम्रेड मॅरेथॉन आयोजित स्पर्धेत 90 किलोमीटर अंतर अवघ्या नऊ तास 55 मिनिटांत पूर्ण केले. हा विक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण धावपटू ठरला. तसेच या विक्रमामुळे त्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे मसावद येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. येथील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवार, २० सप्टेंबर रोजी मुक्ताईनगरात आ. चंद्रकांत पाटील यांच्या अभिष्टचिंतनपर कार्यक्रमासाठी येत आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा १४ सप्टेंबर बुधवार रोजी वाढदिवस आहे. यंदा वाढदिवसाला अतिशय जंगी पध्दतीत साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुधवार, १४ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा नियोजीत कार्यक्रम असल्याने हा कार्यक्रम २० सप्टेंबर रोजी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनाही आमंत्रीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून आमदार चंद्रकांत पाटील हे मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे जिल्हावासीयांचे आता लक्ष लागले आहे. तालुक्यातील निमगाव जवळील आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जन मिरवणुकीतल्या वादामुळे शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात हमरीतुमरी झाली. दोन्ही गटात वाद झाले, या वादाचं पर्यावसान नंतर हाणामारीत झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांचंही नाव यात आलं असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातले आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकरे गटातल्या ५ जणांना अटक करण्यात आली आहे. या शिवसैनिकांकडे चॉपर, तलवार अशी हत्यारं असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे.…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कार्यकर्त्यावर जे गुन्हे महाविकास आघाडीच्या काळात दाखल झाले आहेत. ते सर्व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे तर आता नव्याने गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. दहा दिवसांपूर्वी वाजतगाजत आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला काल ढोल ताशांच्या गजरात भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. वाकडी बारव येथून निघालेल्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते नारळ वाढवून आरतीनंतर शुभारंभ करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्र्यांनी काहीकाळ ढोल वादनाचाही आनंद घेतला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, ॲड. राहुल ढिकले, बाळासाहेब सानप, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील शिरूड नाका परिसरातील तरुणीने शुल्लक कारणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना दि १० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. मिळालेली माहिती अशी की, शिरूड नाका परिसरात राहाणाऱ्या २० वर्षीय लाजवी भास्कर माळी ही विद्यार्थिनी प्रताप महाविद्यालयात बी.कॉम च्या दुसऱ्या वर्षाला होती. तिला बी. कॉम च्या तिसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाला नाही. म्हणून तरुणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना दि १० रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत झाली. असा गौप्यस्फोट शिवसेनेने मुखपत्र सामनातून केला. शिवसेनेने मुखपत्र सामनातून गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. अमित शहा हे वारंवार शिवसेनेच्या बाबतीत ही अशी भाषा वापरतात. हा त्यांच्या मनातील महाराष्ट्राविषयीचा द्वेष आहे. खरं तर त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे. केंद्रातले ‘यूपीए’ सरकार मोदी व अमित शहांच्या मागे हात धुऊन लागले असताना मोदी व पवारांतील सुसंवादामुळेच अमित शहा यांना गोध्रा हत्याकांडातील एका प्रकरणात जामिनावर मुक्त होण्यास मदत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन दोन बहिणींना दि ५ रोजी शहरातील एका महाविद्यालाच्या आवारातून बेपता झाल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दि ६ रोजी मंगळवारी जिल्हापेठ पोलीसात केली होती. जिल्हापेठ पोलिसांनी तीन दिवसात आपली तपासचक्रे फिरवीत त्या दोन मुलीसह तीन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. सविस्तर वृत्त असे की. दोन्ही बहिणी जळगावला काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी त्या एसएनडीटी महाविद्यालयमध्ये गेल्या होत्या. तेथून त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार दिली होती. पोलिसांनी तीन दिवस अथक तपास करून त्यांचा माग काढला. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची देखील मदत घेण्यात आली. तंत्रज्ञानाचा वापर करून मुलींचा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली. तसेच जिल्हा बँकेच्या कामकाजासंदर्भातही त्यांनी सखोल चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन उद्या दि ११ रोजी दिल्लीत पार पडणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर श्री पवार यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, याबाबत सविस्तर माहिती श्री देवकर यांनी पवार यांना दिली. त्यानंतर श्री पवार यांनी पुढील दिशानिर्देश देवकर यांना दिले. यासोबतच जिल्हा…

Read More

नेरी ता.जामनेर : वार्ताहर नेरी बु। येथील अनमोल मित्र बहुउद्देशीय संस्था संचलित अनमोल कोचिंग क्लासेस,अनमोल बेकरी,अनमोल चायनीज,अनमोल ग्राफिक्स,अनमोल ब्युटीपार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील 76 गणेश मित्र मंडळाचे एकजुट व एकत्रितपणे साजरा करीत असलेला गणेशोत्सव कौतुकास्पद मानून प्रत्येक मंडळ अध्यक्ष किंवा सदस्य यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन अनमोल परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने नेरी बु। येथील वाघूर गणेश मित्र मंडळ,जय भारत गणेश मित्र मंडळ,जय बजरंग गणेश मित्र मंडळ,महावीर गणेश मित्र मंडळ,नेरी दिगर येथील जय भवानी गणेश मित्र मंडळ,जय मल्हार गणेश मित्र मंडळ,नवशक्ती गणेश मित्र मंडळ,जय लेवा गणेश मित्र मंडळ,जोगेश्वरी गणेश मित्र मंडळ,शिवनेरी गणेश मित्र मंडळ,देवपिंप्री येथील शिवशक्ती गणेश मित्र…

Read More