Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रंगकाम करतांना तोल जावून मजुराचा मृत्यू
    क्राईम

    रंगकाम करतांना तोल जावून मजुराचा मृत्यू

    editor deskBy editor deskFebruary 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील एका परिसरात इमारतीला रंगकाम (पेटिंग) करत असताना पहिल्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने अजय राजकुमार यादव (२४, मूळ रा. प्रतापगड उत्तर प्रदेश, ह.मु. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, ३१ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

    मिळालेल्या महितिन्सुअर, अजय यादव हा तरुण अन्य दोन मित्रांसह गेल्या सहा महिन्यांपासून रामेश्वर कॉलनीत वास्तव्याला होता. तीनही मित्र इमारतीला रंगकाम करायचे बुधवार रोजी रोजी वाटिकाश्रम परिसरात एका इमारतीचे रंगकाम करण्यासाठी अजय यादव हा भिंतीवर उभा होता. पहिल्या मजल्यावरून त्याचा अचानक तोल गेल्याने तो खाली पडला व त्याच्या डोक्याला जबर मार लागला, त्याला सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करत आहेत. मयताच्या पश्चात आई, वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तीन बहिणींचा एकच भाऊ होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

    April 29, 2026

    अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

    April 29, 2026

    फैजपूर-वरणगावमध्ये गोडाऊन फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त!

    April 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.