जळगाव : प्रतिनिधी स्कूल व्हॅन व रिक्षाच्या अपघातात दोन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता महाबळ रस्त्यावरच्या सुमंगल कार्यालयाजवळ घडली. या अपघातात रिक्षाच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहेत. सुमंगल कार्यालयाजवळून रिक्षा विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. रिक्षाला वळणावर व्हॅनने समोरून धडक दिली, यात रिक्षाच्या एका बाजूचे नुकसान झाले. मात्र, व्हॅनच्या धडकेमुळे रिक्षामधील दोन विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. एका विद्यार्थ्याच्या गालावर आणि कानावर इजा झाली होती तर विद्यार्थिनीच्या बोटाला दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर नेऊन तिच्यावर भुसावळ तालुक्यातील खेडी येथे अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १४ वर्षे अल्पवयीन मुलगी राहते. संशयित आरोपी हर्षल दीपक सोनवणे (वय २१, रा. भुसावळ) याने पीडित मुलीला १ जानेवारी रोजी जळगाव शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात नेले. त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीस आली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी बुधवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी हर्षल सोनवणे (वय…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अजिंठा चौक परिसरात भुसावळ रस्त्यालगत बुधवारी गावठी कट्टा घेऊन फिरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद हमीद ऊर्फ अण्णा (वय २४, रा. गेंदालाल मिल) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीचा मुगीर बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद हा युवक अजिंठा चौक परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने अर्शद शेखला ताब्यात घेतले. पोलिस नाईक सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला न्यायालयात हजर केले असता, न्या.…
पुणे : वृत्तसंस्था दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन केली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पोलिस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकूण ४०० भरारी पथके परीक्षा कालावधीत होणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत, असेही गोसावी यांनी सांगितले. राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला १ मार्च रोजी सुरुवात होणार आहे. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अमरावती शहरातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या तिवसा ते कुऱ्हा मार्गावर पिकप वाहन पलटी होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये १५ जण जखमी झाले असून सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील अंतोरा गावचे काही रहिवासी कौंडण्यपूर येथून अस्थिविसर्जन करून परत येत होते. यावेळी तिवसा ते कुऱ्हा मार्गावर त्यांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या मार्गावरील शेंदूरजना बाजारजवळ हे भरधाव पिकअप वाहन पलटी झाले. या अपघातामध्ये गाडीमधील १५ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. सध्या अपघातातील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे : वृत्तसंस्था इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटण्यास बोलावून घेत तरुणाला दमदाटी करुन त्याचा अॅपल कंपनीचा मोबाईल हिसकावून पळून गेली. हा प्रकार मंगळवारी दि.२७ सकाळी अकराच्या सुमारास पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे घडली आहे. याबाबत तेजसिंग मानसिंग आदियाल (वय-21 रा. जवळकर नगर, पिंपळे सौदागर) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका तरुणीवर आयपीसी 392 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तेजससिंग हा शिक्षण घेत असून त्याची आणि आरोपी तरुणीची इन्स्टाग्रमवर ओळख झाली. तरुणीने फिर्यादी याला इंन्स्टाग्रामवर मेसेज करुन पिंपरी येथील समृद्धी हॉटेल येथे भेटण्यासाठी बोलवले. फिर्यादी तरुणीला भेटण्यासाठी गेले असता तरुणीने त्याच्याकडे मोबाईल फोनची मागणी…
दिंडोरी : वृत्तसंस्था आज पहाटे मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे पिकअप गाडी उलटून 14 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सामुदायिक आरोग्य केंद्र शाहपुरा येथे दाखल करण्यात आले आहे. गाडीत सुमारे 45 जण होते. बिचिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान हा अपघात झाला. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. सर्वांचे वय 16 ते 60 वर्षे दरम्यान आहे. पिकअप मालक अजमेर टेकम याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघाताच्या वेळी अजमेर हा वाहन चालवत होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक जगन्नाथ मरकाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकरी अमाही देवरी गावातून मंडला जिल्ह्यातील मसूर घुगरी…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक गावात सध्या लग्नाची धामधूम सुरु असतांना अशाच एका लग्नाच्या अगोदर असलेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी दि.२८ रात्रीच्या सुमारास घडली. जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. विषबाधा झालेल्यांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनं अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावात बुधवारी नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवरदेवाच्या नातेवाईकांसह गावातील काही मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, जेवणानंतर रात्री अनेकांना…
जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्या सुमारास घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार रात्री करण्यात आली असून दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कस्तुरी हॉटेजवळ मंगळवार दि. २७ रोजी रात्रीच्या सुमारास महेश संतोष भोई (वय २०, रा. रामेश्वर कॉलनी) हा चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळून आला होता. तसेच मेहरुण स्मशानभूमीजवळ राजेश माणिकराव राठोड (वय २३, तांबापुरा) हा देखील चोरी आणि घरफोडीच्या उद्देशाने चेहरा झाकून संशयास्पदरित्या फिरताना रात्री आढळला होता. या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक…
जळगाव : प्रतिनिधी घरात झोक्यावर बसलेले असताना तोल जाऊन खाली पडल्याने सेवानिवृत्त सैनिक चंद्रशेखर सखाराम काळे (४०, रा. वाघ नगर) यांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२७) रात्री घडली. या प्रकरणी तालुका पोलिसात नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्यातून निवृत्त झालेले चंद्रशेखर काळे हे सध्या वाघनगरमध्ये श्री दत्त मंदिरामागे राहत होते. मंगळवारी, (दि.२७) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी असताना झोक्यावर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार…

