फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील पाडळसे येथील कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन आरडाओरड करीत दहशत माजविणाऱ्या पाडळसा येथील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (२८) यास फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी प्रवीण तायडे हा कोसगाव रस्त्यावर तलवार घेऊन दहशत माजवत होता. सपोनि नीलेश वाघ, फौजदार विनोद गाभणे, मोहन लोखंडे, विकास सोनवणे, मोती पवार, बाळू भोई, राहुल महाजन, अरुण नमाईते यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Author: editor desk
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याबाबत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आणि तिची आई त्यांच्या झोपडीत असताना तीन जण आत शिरले आणि त्यांनी या मुलीच्या आईस मारहाण केली. याचवेळी या मुलीचे दोन भाऊही आले. त्यावेळी मुलगी आणि तिच्या दोन भावांनाही मारहाण करीत मुलीचा विनयभंग केला, याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तिसरा अल्पवयीन आहे, पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघन…
जळगाव : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवार, ४ मार्च रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्याहस्ते जळगावनजीक असलेल्या खेडी येथे वारकरी भवनाचे तर मुंढोळदे (खडकाचे) येथे तापीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील मंगळवारी जळगाव येथील युवा संवाद कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सोमवारी सकाळी १०:३० वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होऊन ते हेलिकॉप्टरने वाशिमकडे जाणार आहे. तेथून दुपारी ३:५५ वाजता हेलिकॉप्टरने त्यांचे मुंढोळदे (खडकाचे) ता मुक्ताईनगर येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी मुंढाळदे (खडकाचे) ते सुलवाडी-ऐनपूर या मुक्ताईनगर व रावेर तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे भूमिपूजन होणार आहे. ४:४५ वाजता मुक्ताईनगर येथे…
मेष आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायक ठरेल. जुन्या गुंतवणूकीचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. नियोजन करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.तुमच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. जर तुम्हाला आज कोणाला प्रपोज करायचे असेल तर आजचा दिवस चांगला आहे. आज तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. आज तुम्ही मोकळ्या मनाने बोलाल. इतरांच्या समस्याही समजून घेण्याचा प्रयत्न कराल. वृषभ आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम ठरले. सामाजिक कार्यात तुमचं मन रमेल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीदेखील आजचा दिवस अनुकूल आहे. शिक्षकांकडूनही तुम्हाला अभ्यासात पूर्ण मदत…
जळगाव : प्रतिनिधी रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे.असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात महिलेच्या घरासमोर संशयित गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद) याने महिलेच्या पतीला बघून त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. २९ रोजी सकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. महिला या त्यांच्या घरासमोर उभ्या असतांना गोकुळ बाबुराव लोहार (रा. ममुराबाद, ता. जळगाव) या संशयिताने महिलेच्या पतीला बघुन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने महिलेला देखील अश्लिल शिवीगाळ करीत त्यांच्या विनयभंग केला. दरम्यान, महिलेने तात्काळ तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी एकूण १ लाख २० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहाळ येथील शेतकरी भगवान काशिनाथ मोरे यांनी बँक ऑफ बडोदा चाळीसगाव शाखेतून ८० हजार रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम व पासबुक घेऊन त्यांनी कापडी पिशवीत ठेवले. ही पिशवी घेऊन दुचाकीवरून जात असताना रस्त्यात राष्ट्रीय महाविद्यालयाच्या कॉर्नरजवळ त्यांच्या पाठीला खाज सुटू लागली. त्यांनी हातातील पिशवी भेळच्या गाडीवर बाजूला ठेवून पाणी घेतले. पाणी पिऊन झाल्यावर पिशवी आढळली नाही काही क्षणातच हा प्रकार घडल्याने आजूबाजूला शोध घेतला असता, पैशाची पिशवी अज्ञाताने लंपास केल्याची त्यांची खात्री झाली. दुसऱ्या घटनेतही असाच…
जळगाव : प्रतिनिधी जुन्या वादातून सोहम गोपाळ ठाकरे (१८, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) या तरुणावर गोळीबार करून पसार झालेल्यांना एमआयडीसी पोलिसांनी धुळे येथील देवपूर परिसरातून अटक केली आहे. दीक्षांत उर्फ दादू देवीदास सपकाळे (२०, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) याने गोळी झाडल्यानंतर तो दोन साथीदारांसह धुळे येथे आत्याच्या घरी पोहोचला होता. पोलिसांनी त्याला तेथूनच शनिवार, २ मार्च रोजी ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी नगरातील सोहम ठाकरे व त्याच परिसरात राहणारा दीक्षांत उर्फ दादू सपकाळे या दोघांमध्ये वाद झाले होते. शुक्रवार, १ मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोहम हा त्याचे मित्र भैय्या राजपूत, ऋषिकेश वंजारी, सनी सोनवणे यांच्यासोबत श्रीराम कन्या शाळेजवळ बोलत उभा…
जळगाव : प्रतिनिधी कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने तीन जणांनी कंपनीचे व्यवस्थापक चेतन पुंडलिक सोनवणे (३२, रा. भोकर, ता. जळगाव) यांच्यासह दोन जणांना मारहाण केली. तसेच सोनवणे यांच्यावर धारदार चाकूने वार करत दुखापत केली. ही घटना १ मार्च रोजी कानळदा गावाजवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकर येथील चेतन सोनवणे हे एका कंपनीत व्यवस्थापक आहेत. त्यांनी महेश भरत सोनवणे (रा. कानळदा, ता. जळगाव) याला कंपनीतून काढून टाकले होते. व्यवस्थापक सोनवणे व त्यांचे मित्र विशाल बाबुलाल सोनवणे व सचिन देवीदास सोनवणे हे १ मार्च रोजी कानळदा येथील सरकारी दवाखान्याजवळून जात असताना महेश…
जळगाव : प्रतिनिधी नशेतील एका तरुणाने सांगितल्याप्रमाणे पोलिस पथक त्याच्या घरी एमडी ड्रग्ज शोधायला गेले खरे; मात्र त्याच्या घरात प्रतिबंधित गुटखा आढळून आला. शहर पोलिसांनी ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात १ मार्च रोजी पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकों तेजस मराठे हे पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (२०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. त्याने एमडी ड्रग्जची नशा केली असून, ते घरात ठेवले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस त्याच्या घरी गेले असता, तेथे त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (२२) होता. घर झडतीत एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा मिळाला,…

