Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत दगाफटका केला म्हणून त्यांना धडा शिकवला. 2019 च्या विधानसभा निकालानंतर झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी तुमच्यासोबत येतो, असे सांगून भाजपला धोका दिला. त्यामुळे त्यांना आम्ही धडा शिकवला, असे स्पष्ट मत भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी मांडले. शेलार म्हणाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला स्पष्ट जनादेश दिला होता. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला. अजित पवारांसोबतच्या शपथविधीचे काय? या प्रश्नावर शेलार म्हणाले, ज्यांनी धोका केला त्याला दंडीत करणे ही कृष्णनीती आहेे. शरद पवारांनी धोका दिला म्हत्यांना धक्का देण्याच्या रणनीतीचा तो भाग होता. आम्ही शरद…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक खाली कोसळली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने तिला चिरडलं. रितीका निनावे (वय २१) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितीका निनावे ही हिंगणा येथील वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. रितीका बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती. सोमवारी (४ मार्च) महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती. त्याचवेळी रितीकाची ओढणी दुचाकीच्या चाकात अडकली. काही क्षणात रितीका जमिनीवर कोसळली. पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने तिला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशात नुकतेच भाजपची लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यावर आता राज्यातील ठाकरे गटाने टीकास्त्र सोडले आहे. ”भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मुंबईतील कृपाशंकर सिंहांचे नाव आहे. अनेक ऐरेगैरे यांची नावे भाजपच्या पहिल्या यादीत आहेत, पण नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत डावलण्यात आले. नितीन गडकरी, वसुंधराराजे शिंदे, शिवराजसिंह चौहान हे भाजपचे मूळ नेते आहेत. वाजपेयी-आडवाणींच्या नेतृत्वाखाली त्यांनी प्रदीर्घ कार्य केले. देशभक्तीचा व्यापार त्यांनी होऊ दिला नाही व भाजपचे वैचारिक अधःपतन रोखण्यात या नेत्यांनी पुढाकार घेतला. या सगळय़ांचेच पंख कातरले. गडकरी तर छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त. गडकरींच्या पाठीत वार करण्याचे षड्यंत्र रचले गेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रुग्णालयात दाखल असलेल्या चुलत भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी येत असताना दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने संजोग सुरेश सपकाळे (२०, रा. गाढोदा, ता. जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे काका नवल बिसन सपकाळे (४७, रा. गाढोदा, ता. जळगाव) हे जखमी झाले आहे. हा अपघात सोमवार, ४ रोजी सायंकाळी ७ वाजता मानराजपार्क जवळ झाला. अपघातानंतर ट्रकसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गाढोदा येथील नवल सपकाळे यांचा मुलगा जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल असल्याने त्याला डबा देण्यासाठी नवल सपकाळे व त्यांचा पुतण्या संजोग सपकाळे हे दुचाकीने जळगावला येत होते. खोटेनगरकडून…

Read More

मेष दिवसाची सुरुवात खराब होईल. पण संध्याकाळ होईपर्यतं परिस्थिती सामान्य होईल. व्यापारात नरमगरम परिस्थिती राहील. प्रकृतीतही चढउतार राहील. चांगल्या बातम्याही मिळतील. प्रवासाची शक्यता आहे. व्यापारीवर्गाला आज प्रवास संभवतो. कामावर वेळेवर जा, उशिरा कामावर पोहोचल्याने त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी टाइमपास करणं टाळा. वृषभ नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कामातील सर्व अडथळे दूर होतील. तुमच्या कामात प्रगती दिसेल. अडलेली कामे मार्गी लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. तुमचे प्रेमसंबंध सुरू असतील तर तुम्हाला पार्टनरकडून चांगली बातमी मिळेल. पार्टनरशी भेट होण्याची शक्यता. मिथुन मित्रांसोबत वेळ घालवाल. अशावेळी खर्चही होईल. त्यामुळे खर्चापासून सावध राहा. कोणत्याही वादात अडकू नका. बाहेरचं खाल्ल्याने पोटाची समस्या उद्भवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील चोरीच्या तीन दुचाकींसह दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव तालुक्यातील रिधुर या गावातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी आणि जळगाव जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात विशेष मोहीम आखली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना गुप्त माहिती नुसार दुचाकी चोरीतील गुन्हेगार हे जळगाव तालुक्यातील रिधुर गावात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथक रवाना केले होते. पथकाने जळगांव तालुक्यातील रिधुर गावातील दोन संशयीत आकाश गोरखनाथ सोनवणे वय २३…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील दुध फेडरेशन रोड वरील नवीन कानळदा रोड परिसरातील इंद्रप्रस्थ नगर, राधाकृष्ण नगर या परिसरात अनोळखी टवाळखोरांनी तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्याच्या काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन कानळदा रोड परिसरात दि.२ व ३ रोजी रात्री ७ ते ९ वाजेच्या सुमारास राधाकृष्ण नगर व इंद्रप्रस्थ नगरातील तब्बल ७ ते ८ चारचाकी गाड्यांचे काचा फोडत नुकसान केल्याची घटना घडल्याने परिसरातील चारचाकी मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. घटना उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी लागलीच शहर पोलिसात धाव घेतली होती. MH.19.CZ.5638 , MH.19.AE.1834, MH.02.BR.4136,…

Read More

लातूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या मालिका सुरु असतांना नुकतेच देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची कारने ऊसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी ३ मार्च पहाटेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहन बालाजी कोतवाल (वय २७) शिवराज हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) कृष्णा विठ्ठल मंडले (वय २४) आणि नर्मन राजाराम कात्रे (वय ३३) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. मृत तरुण नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. नांदेड येथील मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके, शुभम किशोर लंकाढाई हे चौघे तरुण…

Read More

भुसावळ : प्रातिनिधी शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या महेश नगर भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना मिळाली होती. पोलिसांनी पाळत ठेवून गोपनीयपणे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर रविवार, दि.३ मार्च रोजी धाड टाकत सहा तरुणींची सुटका केली तर दाम्पत्याला अटक केली आहे. विशाल शांताराम बहाटे व पल्लवी विशाल बहाटे (महेश नगर, भुसावळ) अशी अटकेतील दाम्पत्याची नावे असून त्यांच्याविरोधात पीटा अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातील अनेक बडे शौकीन ग्राहक दाम्पत्याच्या संपर्कात होते शिवाय त्यांचे फोनवर संभाषण व चॅटींग झाल्याचे समजते. पोलीस आता कुणा-कुणावर कारवाई करतात ? याकडे लक्ष…

Read More

जळगाव : प्रतिनिधी बहिणीकडे जेवणासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी एक लाख ६० हजारांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख १४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी दि.२ बळीराम पेठेतील एजीएम प्लाझामध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठेतील मुजाईद खान अय्युब खान हे २ रोजी रात्रीच्या सुमारास उस्मानिया पार्कमध्ये बहिणीकडे जेवणासाठी गेले होते. रात्री पावसाचे वातावरण असल्याने ते तेथेच मुक्कामी थांबले होते. दुसऱ्या दिवशी भाऊ अबुबकार खान हे घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडाच दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी एक लाख…

Read More