Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पात शेती, शेतकरी आणि महिलांसाठी भरीव तरतुदी करून त्यांना बळ देणारे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच मराठी भाषेच्या जतनासाठी आणि गौरवासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली असून, यामुळे मराठी अस्मिता अधिक बळकट होणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले. मराठी भाषेचा सन्मान – ‘प्रेरणा गीत’ पुरस्काराची घोषणा  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर तिच्या सन्मानासाठी राज्य शासनाने दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार’ जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “मराठी अस्मितेचा अभिमान वाढविणारा हा निर्णय सर्व मराठी भाषिकांसाठी गौरवाचा…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथे एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील बांबरुड महादेवाचे येथील रहिवासी शशिकांत विठ्ठल पाटील (वय २५) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे. हा प्रकार घरच्या मंडळींच्या लक्षात येताच शशिकांत पाटील यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी शशिकांत पाटील यांना मृत घोषित केले. मयत शशिकांत पाटील याच्या पश्चात्य वृद्ध आई, वडिल, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. शशिकांत पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शाहूनगर भागातील शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर आलेल्या एका ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून ग्राहकाला दोन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी १२:३० वाजता घडली. याप्रकरणी ग्राहकाच्या तक्रारीवरून दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र गजानन पाटील (वय २२, रा. गरताड, ता. चोपडा, ह. मु. जळगाव) हा युवक रविवारी दुपारी शाहू कॉम्प्लेक्समधील एका पानटपरीवर गेला. त्याठिकाणी एक वस्तू घेतली. मात्र, संबधित ग्राहकाने फाटकी नोट दिल्याच्या संशयावरून अरमान ऊर्फ शहदाब हारुण भिस्ती व हारुण फारुक भिस्ती या दोघांनी संबंधिताला शिवीगाळ केली

Read More

मेष राशी आज राजकारणात वर्चस्व प्रस्थापित होईल. जुन्या मित्राची भेट होईल. कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण सतर्कतेने आणि सावधगिरीने करा. काम बिघडू शकते. व्यवसायात मित्र उपयोगी पडतील. व्यावसायिक प्रवास यशस्वी होईल. वृषभ राशी आज मालमत्ता विक्रीशी संबंधित कामात सावधगिरी बाळगा. या संदर्भात घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. संपत्ती जमा करा. अनावश्यक पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा होईल. मिथुन राशी आज मुलांच्या चांगल्या कर्माने मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंधात गोडवा राहील. कुटुंबात शुभ कार्ये पूर्ण होतील. अध्यात्मिक विचारांनी भरून राहाल. तुमच्या पालकांना बऱ्याच काळानंतर भेटल्यामुळे तुम्ही भावूक होऊ शकता. कर्क राशी वैवाहिक जीवनात घरगुती बाबींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यातील विमानतळाच्या आधुनिकीकरणावर सरकारकडून भर दिला जात आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी विमानतळ उभारण्यापासून ते पायाभूत सुविधांपर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहे. राज्यातील विमानतळांच्या आधुनिकीकरणाबाबत अर्थसंकल्पात करण्यात आल्या ‘या’ घोषणा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार. नवी मुंबईतील उलवे येथे 1 हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 85…

Read More

बीड : वृत्तसंस्था गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील बीड जिल्हा खुनाच्या घटनेने देशभर चर्चेत असतांना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या PA ने एका शोरूमच्या सेल्स मॅनेजरला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 12 डिसेंबरचा आहे. पण तो आता व्हायरल झाला आहे. यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यानंतर आता संदीप क्षीरसागरही अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील कथित गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वाल्मीक कराडला अटक झाल्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या दोघांवरही भाजप आमदार सुरेश धस यांनी आका व आकाचे आका…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे हे मुख्य आरोपी आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुद्दाम त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पोलिस व तपास यंत्रणेलाही या विषयाला फुलस्टॉप देण्याचे गुप्त आदेश दिलेत, असा खळबळजनक आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केला आहे. धनंजय मुंडे हे देशमुख हत्या प्रकरणात 302 चे आरोपी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. मनोज जरांगे पाटील सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकारकडे सगळ्या यंत्रणा आहेत. पण जे जनतेला कळते, ते सरकारला का कळत नाही. धनंजय मुंडे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे जाणिवपूर्वक त्यांना…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. कन्नडच्या पिशोरजवळ ऊसाच्या ट्रक उलटून 17 मजूर दबले गेले, त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले. मात्र दुर्देवाने 4 मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या अपघातानंतर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगरच्या कन्नडमधील पिशोर खांडीत ऊसाच्या ट्रकला अपघात झाला. ट्रकमध्ये असलेल्या ऊसावर बसून १७ कामगार प्रवास करत होते. अचानक पिशोर खांडीत ट्रक उलटला आणि ऊसाखाली १७ कामगार दबले गेले. या भीषण अपघातामध्ये ४ कामगारांचा जागीच मृत्यू झाला.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा कृषी औद्योगिंक सर्व सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक जिल्हा दुध संघाचे संचालक रोहीत दिलीपराव निकम यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली.बिनविरोध निवडणुक होण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे,पदमश्री ॲड.उज्वल निकम,आ.मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून निवडणुक बिनविरोध झाली. रोहित निकम यांनी सहकारातील राजकीय चक्रीय या निमित्ताने तोडल्याचे दिसून आले तसेच भाजपाचा धबधबा सहकारात वाढला आहे. सहकार व पणन क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील पहिली व सातत्याने ‘अ’ वर्गात असलेली संस्थेची स्थापना १९५६ मध्ये झाली. यासंस्थेच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी प्रत्येक समाजाला स्थान देवून सहकारात समन्वयाचा नविन आदर्श उभा केला आहे. नवनिर्वाचित…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी येथे राहणाऱ्या एका महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून ९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिस प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, पीडित महिला ही राहुल कचरू आल्हाट याची पत्नी असून तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यामुळे पीडित महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल कचरु आल्हाट पती, मायाबाई कचरु आल्हाट सासू, तेजस कचरु आल्हाट दीर (सर्व…

Read More