मेष राशी काही अप्रिय घटना घडू शकते. कामाच्या ठिकाणी कोणतेही चुकीचे काम करणे टाळा. अडचणीत येऊ शकतात. महत्त्वाच्या कामात संघर्ष होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला वाईट वाटेल. वृषभ राशी आज कोणतीही गंभीर आरोग्य समस्या येण्याची शक्यता कमी आहे. गुडघ्याशी संबंधित समस्यांना थोडा त्रास होईल. आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या निर्माण होतील. मिथुन राशी आज पैशाचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. जमीन, इमारती आणि वाहनांच्या विक्रीत गुंतलेल्या लोकांना भरपूर पैसे मिळतील. आर्थिक बाबतीत हुशारीने निर्णय घ्या. कर्क राशी आज आरोग्याशी संबंधित कोणतीही गंभीर समस्या येण्याची शक्यता कमी आहे. आधीपासून असलेल्या आजारांपासून सावध…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. तर आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात सजरा होत असताना जळगाव मनपात महिला दिनाचा कार्यकम घेण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटलांची याठिकाणी उपस्थिती लाभली होती. यावेळी पालकमंत्री पाटील यांचे भाषण चांगलेच गाजले आहे. महिलांच्या सुरक्षेवर बोलताना, महिलांनी आपल्या पर्समध्ये लाली पावडर न ठेवता मिरचीची पूड व चाकू ठेवायला हवा असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. यावरुन त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता खरोखर बाळासाहेब म्हणाले होते तसे करण्याची वेळ महिलांवर आल्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा गुन्हेगारी घटनामुळे चर्चेत येत असतांना आता गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या प्रचंड चर्चेत आला असून यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहेत. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश अण्णा धस यांना पोहोचत केले जाते. त्यामुळेच सतीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा आरोप त्यांनी केला. असा प्रकार जर होत असेल तर सतीश भोसले वर कसा गुन्हा दाखल होईल, असा…
बुलढाणा : वृत्तसंस्था येथील समृध्दी महामार्गावर यवतमाळहून शिर्डीकडे जात असलेल्या क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यात दोन प्रवासी जागीच ठार झाले, तर सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. समृध्दी महामार्गाच्या मुंबई कॉरिडॉर चॅनेल क्र.३४४.६ वर सिंदखेडराजानजीक माळ सावरगाव शिवारात आज सकाळी ९ च्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या साबळे आणि मोतीराम बोरकर अशी मृतांची नावे आहेत. क्रुझर गाडी क्र. एमएच २५ आर ३६७९ चे टायर फुटल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून गाडी पलटी झाली. त्याचवेळी मागच्या बाजूने भरधाव आलेली एक कार या अपघातग्रस्त क्रुझर…
पुणे ; वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुणे शहर गुन्हेगारी घटनेने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा पुणे शहरातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना घडली आहे. या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू घेण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील सिग्नलवरती गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली. जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीनं समोर देखील या तरुणांनी अश्लील कृत्य केले आहे. पुणे नगर रोडवरती शास्त्रीनगर चौकातील ही संतापजनक घटना आहे. व्हिडिओ काढण्यापेक्षा पोलिसांना बोलवत जाब विचारायला हवा.…
मुंबई : वृत्तसंस्था आज जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे एक मागणी केली आहे. एक खुन माफ करण्यात यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींकडे थेट पत्राद्वारे केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे. मात्र त्यांनी अशी आगळीवेगळी मागणी करण्याचे नेमकं कारण काय? तर महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या प्रकरणांवर संताप व्यक्त करत रोहिणी खडसेंनी ही मागणी केली आहे. रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या? रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले की, सर्वात प्रथम आपल्याला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपला देश हा महात्मा बुद्ध आणि महात्मा गांधींचा देश…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा होत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चाही सातत्याने सुरू आहे. त्यातच एकनाथ शिंदेंचे जवळचे मानले जाणारे अजय अशर यांना ‘मित्रा’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्याने पुन्हा या चर्चेने वेग पकडला. मात्र, आमची कामे पाहूनच विरोधकांना अंदाज आल्याने ते नाराज असल्याच्या बातम्या पसरवत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच, त्यांनी महायुतीत कोणीही नाराज नसल्याचेही स्पष्ट केले. राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी नाराजी नाट्यावर देखील ते बोलले. ‘सरकारला मिळालेल्या प्रचंड…
पाचोरा : प्रतिनिधी ‘आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना’ याचा प्रत्यय वरखेडीसह पंचक्रोशीत आला. आजारी असलेल्या वडिलांचा निरोप घेऊन तो दहावीच्या पेपरला गेला आणि तिथून परतल्यावर त्याला वडिलांच्या मृत्यूची वार्ताच समजली. मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी खुर्द येथील रहिवासी दशरथ हरी पाटील (४१) यांचे शुक्रवारी सकाळी ९ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचा मुलगा शुभम हा लोहारा येथील परीक्षा केंद्रावर १० वीची परीक्षा देत आहे. शुक्रवारी त्याचा भूमितीचा पेपर असल्याने तो सकाळी ८:३० वाजता पेपर देण्यास गेला. जाण्यापूर्वी त्याने वडील दशरथ पाटील यांची भेट घेतली आणि मन घट्ट करीत तो पेपर देण्यासाठी पोहोचला. तिकडे शुभम हा परीक्षा देण्यासाठी गेला आणि इकडे वडील…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळातून डिझेलची चोरी करून मध्य प्रदेशाकडे पळणाऱ्या चोरट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाइलने अटक केली. पोलिसांच्या सापळ्यात तिघे अडकले आहेत. त्यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे काही चोरटे कारमधून ४०० लिटर डिझेल भरून भुसावळहून पळाले. ही माहिती भुसावळ पोलिसांकडून मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागेश मोहिते यांना मिळाली. चोरी करणारे मध्यप्रदेशाकडे जाण्याची शक्यता ओळखून त्यांनी मुक्ताईनगर चौकात नाकाबंदी करण्याचा आदेश दिला. पोलिस कर्मचारी सोपान वंजारी यांनी तातडीने कार्यवाही करत या ठिकाणी एक ट्रक रस्त्यावर आडवा लावला. यामुळे चोरट्यांना पकडने पोलिसांना सोपे झाले.मुक्ताईनगर येथे पोलिसांनी रस्त्यावर ट्रक आडवा लावल्यामुळे समांतर रस्त्यावरून वेगाने येणारी चोरट्यांची गाडी…
भुसावळ : प्रतिनिधी सेवानिवृत्तीच्या रकमेतून दोन लाख रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकूड मारून गंभीर जखमी केल्याची घटना कंडारी येथे ६ मार्च दुपारी २.३० वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात दिलीप गणपत महाजन (वय ६२) यांनी तक्रार दाखल केली. त्यांचा मुलगा हेमंत महाजन याने घर बांधकामासाठी वडिलांकडे पैसे मागितले, परंतु त्यांनी नकार दिल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. तपास पो. कॉ. विकास बाविस्कर करीत आहेत. दरम्यान, या घटेनबाबत परिसरातील रहिवाशांनी मुलाच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

