जळगाव : प्रतिनिधी महामार्गावर असलेल्या चौधरी टोयाटो व सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये झालेल्या चोरीप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी मध्य प्रदेशातील तीन जणांना अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगाव ते भुसावळ दरम्यान तरसोद फाट्यासमोर असलेल्या चौधरी टोयाटो सातपुडा ऑटोमोबाइल या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये गेल्या महिन्यात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली होती. यात चोरट्यांच्या हाती जास्त मुद्देमाल लागला नव्हता, मात्र शोरूममध्ये तोडफोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले होते. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ही चोरी मध्य प्रदेशातील चोरट्यांनी केल्याची माहिती सपोनि ए. सी. मनोरे यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मेवालाल पिसीलाल मोहिते…
Author: editor desk
यावल : प्रतिनिधी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १२ तासांपासून वन विभागाची शोध मोहीम सुरू असली तरी बिबट्या अद्याप सापडलेला नाही. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. बिबट्या व इतर हिंसक प्राण्यांपासून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी केले आहे. यावल तालुक्यातील साकळीच्या मानकी शिवारात चार दिवसांपूर्वी बिबट्याने एका सात वर्षीय आदिवासी मुलावर हल्ला करून त्याचा बळी घेतला. या दुर्दैवी घटनेनंतर तालुक्यात सातोद स्त्यावर नीलेश गडे यांच्या गव्हाच्या शेतात तडसाचा फडशा पाडला. विविध भागांमध्ये बिबट्या दिसल्याने यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे…
वरणगाव : प्रतिनिधी वरणगावहून आचेगावकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने आचेगाव येथील शरद भास्कर पाटील (७०) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिराचे पुढे काही अंतरावर घडली. शरद पाटील (वय ७०, रा. आंचेगाव) हे दुचाकीने (एमएच १९/ एएस ६९९१) आचेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी (एमएच २८/बीएस ९१४१) धडक झाली. या अपघातात चालक शेख गनी शेख मौलाना (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५) दोघे रा. बोदवड यांचे सह शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद…
मेष राशी आज अभिनय क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष यश आणि सन्मान मिळेल. नोकरीच्या शोधात घरापासून दूर जावे लागेल. तुम्हाला नोकरी मिळेल. तुम्हाला काही सरकारी योजनेची जबाबदारी मिळू शकते. राजकारणात विशिष्ट व्यक्तीशी जवळीक केल्याने फायदा होईल. वृषभ राशी आज तुमचे आरोग्य सुधारेल. कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या आरोग्याशी संबंधित खूप चांगली बातमी मिळेल. निरोगी लोकांना त्यांच्या शारीरिक शक्ती आणि मनोबलात मोठी वाढ जाणवेल. यामुळे ते जोश आणि उत्साहाने भरलेला असतील. मिथुन राशी आज आर्थिक क्षेत्रात चढ-उतार जाणवतील. जमिनीशी संबंधित जुना वाद मिटवून मोठी रक्कम प्राप्त होईल. आर्थिक क्षेत्रातील आर्थिक धोरणे चांगल्या प्रकारे समजून घ्या. काही नवीन योजनांवर पैसा खर्च…
मुंबई : वृत्तसंस्था महिला दिनाच्या दिवशी राज्यातील लाडकी बहिण योजनेत वाढ होणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत सध्या पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० दिले जातात. मागील निवडणुकीत या रकमेत वाढ करून ₹२,१०० करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, राज्याच्या आर्थिक स्थितीमुळे या रकमेत वाढ करणे सध्या शक्य नसल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सरकारने पात्र लाभार्थींच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत या महिलांच्या बँक खात्यात एकूण ₹३,००० जमा केले जातील, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे…
पुणे : वृत्तसंस्था जगभर महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना पुण्यातील रूबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उषा काकडे यांनी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला. उषा काकडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. उषा काकडे या ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करतात.…
मुंबई : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावर दूर जावे लागले होते तर आता बीडमधील शिरूर कासार येथे एका व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहे. तेव्हापासून या सतीश भोसले उर्फ ‘खोक्या’ची चर्चा सुरू आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे खुद्द सुरेश धस यांनी हे मान्य केले होते. सतीश भोसलेचे सुरेश धसांसोबतचे फोटो, त्याच्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा, तसेच तो दाखवत असलेले पैसे या सर्वांवर सुरेश धस यांनी ‘एका मराठी वृत्तवाहिनी’ने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना खुलासा केला आहे. सुरेश धस म्हणाले,…
जळगाव : प्रतिनिधी रिक्षामध्ये ठेवलेल्या बॅगेमधून वैजयंताबाई कौतिक साळुंखे (७५, रा. चौघुले प्लॉट) यांचे तीन तोळे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाले. ही घटना ७ मार्च रोजी गांधी मार्केटसमोर घडली. या प्रकरणी रिक्षात बसलेल्या तीन अनोळखी महिलांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भाजीपाला विक्री करणाऱ्या वैजयंताबाई साळुंके या आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे मुलीकडे गेल्या होत्या. तेथून त्या ७ मार्च रोजी जळगावला परतल्या व अजिंठा चौफलीतर उतरुन रिक्षात बसल्या त्या वेळी रिक्षाचालकाने त्यांची बॅग रिक्षात अगोदरच बसलेल्या तीन महिलांच्या पायाजवळ ठेवली. त्यादरम्यान महिलांनी त्या बॅगवर स्कार्फ टाकला होता. गांधी मार्केटसमोरील प्रकाश मेडिकलजवळ…
जळगाव : प्रतिनिधी घरातील सदस्य झोपलेले असताना विजय उर्फ सनी मनोज छाबडिया (२३, रा. सिंधी कॉलनी) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (८ मार्च) मध्यरात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील रहिवासी विजय छाबडिया हा तरुण शुक्रवारी (७ मार्च) रात्री जेवण झाल्यानंतर तो घरीच होता. मध्यरात्री त्याने छताला गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी शेजारील मंडळींच्या मदतीने विजयला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रावेर : प्रतिनिधी वाघोद्याहून निंभोऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कपील अशोल वारके (३०) हा युवक ठार झाला आहे. कपिल याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दि. ७ रोजी सायंकाळी धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मयत कपिल वारके यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन रावेर येथे करण्यात आले. यानंतर दि. ८ मार्च शनिवार रोजी सकाळी १० वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पक्षात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

