जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील फुपनगरी येथे घरी एकटे असलेल्या नवलसिंग विजयसिंग सोनवणे (वय ४७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (८ फेब्रुवारी) दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मजुरी काम करणारे नवलसिंग सोनवणे यांच्या पत्नी कामावर तर मुले बाहेर गेलेले असल्याने ते घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी गळफास घेतला. दुपारी त्यांच्या पत्नी घरी आल्या त्यावेळी ही घटना उघडकीस आली. इसमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिसांत नोंद आहे. तपास सुरू आहे.