अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात ७४ वर्षीय आजोबांनी आपल्याच ८ वर्षीय नातीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावातील ८ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ७ रोजी दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास क्लासवरून घरी परतत होती. त्यावेळी आरोपी आजोबाने (वय ७४) या बालिकेला आपल्या खळ्यात नेत तिचा विनयभंग केला. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आरोपीच्या विरोधात अल्पवयीन बालकांचे लैंगिक शोषण कायदा कलम ७४, ११, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आरोपीला दि. ८ रोजी न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.