जळगाव : प्रतिनिधी मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रावेरहून जळगावला आलेल्या एका ३९ वर्षीय व्यक्तीचा परत रावेरला जात असताना, जळगाव रेल्वेस्थानकात तोल जाऊन रेल्वेखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, रावेर शहरात अनिल जाधव हे पत्नी आणि मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होते. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नी जळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील माहेरी आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्याने ते जळगाव येथे आले होते. मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी रात्री ९ वाजता जळगाव…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील आकाशवाणी चौकात दि. ६ मार्च रोजी, ट्रकखाली येऊन जखमी झालेल्या रागिणी चंपालाल पाटील (वय ४५, रा. भुसावळ) यांचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून पुणे येथे उपचार सुरू होते. दि. ६ मार्च रोजी, सायंकाळी ५ : ३० वाजता भुसावळकडून जळगावातील खोटे नगर परिसरातील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पतीसोबत जात असताना पाटील यांच्या दुचाकीला आकाशवाणी चौकात ट्रकने धडक दिली. रागिणी पाटील खाली पडल्या, त्यांच्या हाता-पायावरून ट्रक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुणे येथे खाजगी रुग्णालयात सुरू होते. मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती चंपालाल पाटील, मुलगा देवेंद्र पाटील व मुलगी असा परिवार…
फैजपूर : प्रतिनिधी येथील तहानगरमध्ये राहणाऱ्या महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी हातसफाई करत लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री घडली. अज्ञात चोरट्यांनी ९३ हजार रुपयाचे सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख असा एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सविस्तर वृत्त असे कि, सातारा जिल्ह्यातील कराड येथे महसूल विभागात नोकरी करीत असताना सेवानिवृत्त झालेले बबन सुभान तडवी हे कराड येथेच सध्या वास्तव्याला आहे व त्यांनी फैजपूर येथेही तहानगर भागात नवीन घर बांधलेले आहे. मुलाच्या लग्नानिमित्त ते एक महिन्यासाठी येथे आले होते. लग्नकार्य आटोपून ते परत कराड येथे गेले असता त्यांनी घराची जबाबदारी त्यांचे…
यावल : प्रतिनिधी पिंप्री येथे प्रेमविवाह केला, त्या रागातून १८ वर्षीय तरुणीवर तिच्या मामाने प्राणघातक हल्ला केला. ही घटना दि. ८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. तर याप्रकरणी चार दिवसांनंतर अखेर यावल पोलिस ठाण्यात तरुणीच्या फिर्यादीवरून मामाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, वैष्णवी विनोद तायडे (१८, रा. उल्हासनगर) हिने प्रेमविवाह केला या रागातून तिचे मामा उमाकांत चिंधू कोळी (रा. पाडळसे, ता. यावल) याने दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजेला पिंप्री येथे जाऊन वैष्णवी तायडेवर हल्ला केला होता. त्यात वैष्णवीला वाचवण्याकरिता तिची नणंद वैशाली स्वप्नील सपकाळे ही समोर आली होती. तिलादेखील दोन्ही हातावर आणि…
मेष राशी आज केलेल्या कामात विनाकारण विलंब होईल. तुमची बुद्धी आणि विवेक वापरा. कामाच्या शोधात इकडून तिकडे भटकावे लागेल. कामाच्या ठिकाणी बॉससोबत विनाकारण वाद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुम्हाला नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. वृषभ राशी आज विरोधक आणि शत्रू तुमचा घात करू शकतात. त्यामुळे शारीरिक इजा होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला खूप सतर्क आणि सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी जास्त धावपळ केल्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. मिथुन राशी आज उधार दिलेले पैसे न मागता परत मिळतील. व्यवसायात प्रियजनांच्या पूर्ण सहकार्यामुळे आर्थिक लाभ होईल. बिझनेस ट्रिप फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कर्क राशी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या वाल्मीक कराडने आवादा कंपनीकडून एकदा नव्हे तर 6 वेळा खंडणी मागितल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. स्वतः आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याचे तपास यंत्रणेने सादर केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद करण्यात आले आहे की, वाल्मीक कराड व त्याच्या गुंडांचे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत फोन येत होते. पैसे द्या, नाहीतर प्रकल्पाचे काम बंद करा, अशा धमक्या ते देत होते. वाल्मीक कराडकडून 28…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भोंग्यांमुळे परिसरातील लोकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विधानसभेत उपस्थित केला. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यात कुठल्याही प्रार्थना स्थळावर भोंगे लावण्याची परवानगी पोलिसांकडून घ्यावी लागेल. जर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना कारवाई करण्यात येईल. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही याची जबाबदारी पोलीस निरीक्षकावर निश्चित केली जाईल. जर पोलीस निरीक्षकाने याकडे दुर्लक्ष केले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे भोंगे आहेत त्याची परवानगी घेतली पाहिजे, हे भोंगे रात्री १० ते सकाळी ६…
मुंबई /जळगांव : प्रतिनिधी विधानभवन येथे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहेत. अन्यायाविरोधातील त्यांचे संघर्षशील जीवन आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान आजही आपल्याला राष्ट्रहितासाठी एकजूट होण्याची प्रेरणा देते. संभाजी महाराजांनी कधीही अन्यायासमोर शरणागती पत्करली नाही. त्यांचा अभिमानास्पद इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहूया
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जळगाव खुर्द पुलाजवळ भीषण अपघात घडला असून रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या तीन परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा हृदयद्रावक प्रकार मंगळवारी (११ मार्च) सकाळी उघडकीस आला.अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. कसा झाला अपघात? जळगाव खुर्द गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे. येथे काम करणारे परप्रांतीय मजूर रात्री लोखंडी पट्टीवर झोपले होते. अंधारामुळे वाहनचालकाला ते दिसले नसल्याने, अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले.मंगळवारी सकाळी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात महाकुंभातील पवित्र स्नानाची खिल्ली उडवली होती. अरे हाड, कोण पिणार ते गंगेचे पाणी, असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बगला घासत राज ठाकरे यांची नक्कल केली. तसेच त्यांच्या त्या विधानाचे कौतूक करत त्यांच्या डेअरींगला सलामही ठोकला. राज ठाकरे यांनी महाकुंभातील स्नानावर भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राज ठाकरे यांनी हिंदुंच्या भावना दुखावल्या, असे समाजातील लोकांचे म्हणणे आहे. त्यांच्या या विधानावर विविध राजकीय, अराजकीय नेत्यांच्या…

