Author: editor desk

बुलढाणा :  वृत्तसंस्था राज्यातील बुलढाणा जिह्यातील पिंपळगाव‎सैलानी येथे गुरुवारी १३ मार्च रोजी हजारो नारळाच्या होळींची प्रथा असलेल्या हाेळीचा उत्सव‎साजरा केला जाणार आहे. या होळीत नारळाला‎बाहुले, गोटे, बिबे, लिंबू, खिळे ठोकून ते मनोरुग्णाच्या‎अंगावरुन आेवाळून होळीत टाकले जातात. अंगावरील‎कपडेही या होळीत टाकण्याची पंरपरा अाजवर चालत‎अाली अाहे. मागील वर्षी एका अज्ञाताने ही होळी‎पेटवली होती.‎ मागील चार दिवसांपासून या यात्रेसाठी भाविकांची‎वर्दळ वाढली अाहे. या भाविकांच्या उपस्थितीत‎ गुरुवारी दुपारी तीन वाजता मुजावर यांच्या हस्ते पूजा‎विधी करुन होळी पेटवली जाणार आहे. या ठिकाणी‎यात्रेकरुंचे मात्र हाल होत असतात. पिण्याच्या पाण्याची‎व्यवस्था नसते, प्रसाधन गृह नसल्याने उघडयावरच‎घाण करत भाविक निघून जातात. तर १९ मार्च रोजीच्या‎संदलसाठीही भाविक थांबतात. काही भाविक…

Read More

चोपडा : प्रतिनिधी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अमित दिलीप सुलक्षणे (३५) यांना दि. १२ रोजी साडेचार हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांच्या घरी नवीन वीजमिटर बसवून देण्याकरीता अधिकारी अमित सुलक्षणे यांनी साडेपाच हजार रूपये लाचेची मागणी केली. याबाबत केलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदारांच्या घराचे विज मिटर बसवून देण्यासाठी प्रथम ५५०० व तडजोडअंती ४५०० रुपयाची मागणी केल्याचे दिसून आले. ही लाच स्विकारताना बुधवारी त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुध्द चोपडा शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शेतातील मका का तोडला याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एकाला जबर मारहाण करून त्याच्या पत्नीलाही मारहाण व मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील एक शेतकरी ८ रोजी सायंकाळी आपल्या शेतात काम करीत असताना गोपीचंद नारायण पाटील, सचिन गोपीचंद पाटील, चंद्रकांत गोपीचंद पाटील हे तिघे आले व त्यांनी शेतातील मका पिकाची मोडतोड करून नुकसान केले. ९ रोजी सायंकाळी पुन्हा तिघांनी तोच प्रकार केल्याने शेतमालक त्यांना बोलायला गेले असता त्यांनी शिवीगाळ मारहाण केली. चंद्रकांत पाटील याने वर उचलून फेकून दिले. त्यामुळे शेतमालकाच्या छातीवर पोटावर मुका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरात १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या विवाहसमारंभातून १२ लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या सहाय्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून, चोरटे मध्य प्रदेशातील असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी नऊ दिवस मध्य प्रदेशात थांबून चाळीसगावच्या चोरीसह जिल्ह्यातील इतर तीन चोऱ्यांमधील तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत चोरटे पोलिसांच्या हाती लागले नसले तरी मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली. चाळीसगाव येथील विवाहस्थळावरून तांत्रिक पुरावे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुलखेडी, ता. नरसिंहगढ, जि.राजगढ, मध्य…

Read More

मेष राशी श्रीगणेश म्‍हणतात की, आज सकारात्मक विचारसरणीमुळे काही काळापासून सुरू असलेल्या समस्या सोडवता येतील. तुम्ही तुमच्या कामांवर नवीन उर्जेने लक्ष केंद्रित करू शकाल. शेजारी किंवा बाहेरील व्यक्तीशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. भावांसोबत सुरू असलेला कोणताही वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ फारसा फायदेशीर नाही, परंतु तुम्ही कामांमध्ये काही सुधारणा घडवून आणाल. वृषभ राशी श्रीगणेश सांगतात की, सर्जनशील आणि धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. आव्हान स्वीकारल्याने तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सामाजिक कार्यातही तुमचा आदर राखला जाईल. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. परिस्‍थिती संयमाने हाताळा.…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील तरुण तरुणीना नेहमीच पाणीपुरी खाणे खूप आवडत असते मात्र याच तरुण तरुणीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी आयोजित एका समारंभात अन्न व पाणीपुरी विकणाऱ्या कडून पाणीपुरी खाल्ल्याने जवळपास ३० जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार १० मार्च रोजी सकाळी समोर आला. यात २२ जणांना उपचारार्थ बेटाळा व देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर उर्वरित आठ जणांना आंधळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सुट्टी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी (दे) येथे ९ मार्च रोजी एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी अन्न वितरण करण्यात आले. काहींनी कार्यक्रमाजवळ असलेल्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी बोलणे महत्वाचे केले असतांना आता मुंबईतील एअरटेलच्या एका कार्यालयातील हिंदी भाषिक महिला कर्मचाऱ्याने मराठीच्या मुद्यावरून मराठी तरुणाशी हुज्जत घातल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सदर कर्मचारी मराठी का आली पाहिजे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असे कुठे लिहिले आहे का? असे विविध प्रश्न विचारत मला मराठी येत नाही व मी बोलणारही नाही अशी उद्दाम भाषा वापरताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी एअरटेलला निर्वाणीचा इशारा दिला आहे. गत काही महिन्यांपासून परप्रांतीयाच्या मुजोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एअरटेलच्या कार्यालयातील ही घटना समोर आली आहे. सदर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ व्यक्तींना १२ मार्चपासून १५ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी हा आदेश जारी केला आहे. रामानंद नगर पोलिस ठाण्याने या १४ व्यक्तींविरोधात अहवाल तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी गोसावी यांच्याकडे पाठवला होता. धुलिवंदनाच्या सणादरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दपारीच्या कालावधीत हे व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. हद्दपार व्यक्तींची यादी: राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा) किरण अशोक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लीम कुटुंबाला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही घटना वर्षभरापूर्वीची आहे. पण आज हे पीडित कुटुंब न्यायाच्या मागणीसाठी विधानभवनावर आले होते. तिथे त्यांनी आपल्याला जय श्रीराम म्हणण्याची धमकी देत मारहाण करण्यात आल्याचा दावा केला. त्यांनी मंत्री नीतेश राणे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अशरफ शेख असे पीडित कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे नाव आहे. ते आज आपल्या पत्नी व मुलीसह विधान भवनाबाहेर आले होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही कणकवली येथे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथून परत येताना पनवेल येथे मारहाणीची घटना घडली. तिथे…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली असतांना आता पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. सतीश भोसले याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे. बीड आणि युपी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. सतीश भोसले हा गेली काही दिवस पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. गेल्या 7 दिवसांमध्ये त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल झाले. पण एका मराठी वृत्तवाहिलीला मुलाखत देणारा भोसले पोलिसांना सापडत नव्हता. आज त्याला प्रयागराजमधून पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी यांनी आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या सतीश भोसले याच्यावर अनेक आरोप होत आहेत. मात्र, तो पोलिसांना…

Read More