Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव आणि कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार १२ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या व बदली आदेश जारी करण्यात आले आहेत. हा आदेश पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी काढला आहे. आदेशानुसार नाशिक, धुळे, अहमदनगर, यवतमाळ, अकोला तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या अधिकाऱ्यांना जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे व शाखांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. धरणगाव, पारोळा, चोपडा ग्रामीण, शहर वाहतूक शाखा, भुसावळ तालुका, एमआयडीसी व स्थगुशा जळगाव येथे नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. धरणगाव पोलीस स्थानकाचा पदभार पोलीस निरीक्षक…

Read More

पुणे :  वृत्तसंस्था  इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. होर्मुज खाडीतील तणावामुळे तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरू लागल्याने पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या दरात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशा परिस्थितीत पुणे परिसरातील सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांना मात्र दरवाढीचा मोठा धक्का बसला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरात सीएनजीच्या दरात प्रति किलो 1 रुपयाची वाढ करण्यात आली असून नवीन दर 95.75 रुपये प्रति किलो झाला आहे. याशिवाय घरगुती पाईप नॅचरल गॅस (पीएनजी)च्या दरातही 85 पैशांची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा पोलीस दलाने आज पहाटेपासून जळगाव शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात मोठी विशेष धडक कारवाई हाती घेतली आहे. पहाटे सुमारे ४ वाजता सुरू झालेल्या या मोहिमेत सराईत गुन्हेगार, टोळ्या (गँग्स) तसेच विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयित व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच RCP (रायट कंट्रोल पथक) यांचा सहभाग असून शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. कारवाईदरम्यान अनेक संशयित व सराईत गुन्हेगारांच्या निवासस्थानांची झडती घेण्यात आली. तसेच शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करण्यात…

Read More

सावदा : प्रतिनिधी  परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कुटुंबाला उडविल्याने हा थरारक अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज समशेर तडवी (रा. वडगाव, ता. रावेर) हा त्याच्या हुंडाई कार (एमएच ०१ एआर २७०६) मधून सावदा-वाघोदा मार्गावरून भरधाव वेगाने जात होता. वाहन चालविताना त्याचे नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीवरील चार जणांना कारने जोरदार धडक दिली. धडकेनंतरही कारचा वेग कमी न झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  अडावद येथील वरच्या माळी वाड्यातील अल्पभूधारक शेतकरी गोविंदा चैत्राम गंभीर (वय ६५) हे गतवर्षी आलेले अल्प उत्पन्न, यंदाच्या हंगामाने भरून काढू म्हणून पावसाची वाट पाहत होता. परंतु पाऊस लांबल्याने लोकांची देणी कशी फेडायची? आता आपला प्रपंच कसा चालवायचा? या विवंचनेत त्यांनी १५ रोजी पहाटे छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार,  शेतकरी गोविंदा गंभीर यांनी १५ रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान गोविंदा गंभीर यांच्याकडे ५ एकर कोरडवाहू शेतकरी असून त्यांनी गतवर्षी मका लावला होता. त्यात त्यांना अपेक्षित उत्पन्न…

Read More

जगळव : प्रतिनिधी  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरुन आलेले संशयित चोरटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या मंगला शांताराम चौधरी (वय ७५, रा. आयोध्यानगर) या वृद्धेजवळ आले. त्यांनी वृद्धेला बोलण्यात गुंतवूण ठेवत त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीची तीन तोळे सोन्याची सोनपोत लांबवली. ही घटना दि. १४ जून रोजी आयोध्या नगरात घडली. या प्रकरणी सादीक शेख इबाबत शेख इराणी (वय २३, रा. पापा नगर, भुसावळ) व त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील आयोध्या नगरमधील रहिवासी मंगला चौधरी या नेहमीप्रमाणे दि. १४ जून रोजी सकाळी मार्निंग वॉक करीत असताना समोरून एका दुचाकीवरुन दोन संशयित हे वृद्धेजवळ आले. त्यांच्यातील दुचाकी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सावकारी व्यवसायाचा परवाना मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सहकार अधिकारी आणि दोन प्रमाणित लेखापरीक्षकांविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई केली. या कारवाईमुळे सहकार विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी (वर्ग-३) विजय विनायकराव गरुड, प्रमाणित लेखापरीक्षक सुरेश जनार्दन विसपुते आणि प्रमाणित लेखापरीक्षक हेमंत प्रकाश काळे यांचा समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसायासाठी परवाना काढायचा होता. यासाठी त्यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, भुसावळ येथे अर्ज केला होता. परवाना मंजूर करून देण्याच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आसोदा रेल्वेपुलाखाली पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या विक्की ऊर्फ छोटा माया गणेश शिंदे (२२, मूळ रा. चौगुले प्लॉट, ह. मु कुसुंबा, ता. जळगाव) याच्यासह तलवार घेऊन फिरणाऱ्या अल्पवयीन मुलावर शनिपेठ पोलिसांनी कारवाई करीत शस्त्र जप्त केले. ही कारवाई १४ जून रोजी करण्यात आली. या प्रकरणी या दोघांसह शस्त्र विक्री करणारा ज्ञानेश्वर ऊर्फ नन्या हडकर/काळनोर (ऊर्फ हटकर ऊर्फ गवळी), रा. तांबापुरा याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. यातील विक्की शिंदे हा १३ जून रोजीच कारागृहातून बाहेर पडला व पुन्हा तो शस्त्रासह हाती लागला. शनिपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी साजिद मन्सुरी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यासह पोकॉ. पराग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाच्या वाहनाला संशयित कारचालकाने धडक दिल्याची घटना १३ जून रोजी रात्री शिरसोली रस्त्यावर घडली. या घटनेत दामिनी पथकातील महिला अंमलदार वैष्णवी कोरडे या जखमी झाल्या असून धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामिनी पथकातील महिला अंमलदार वैष्णवी कोरडे आणि सुशीला सूर्यवंशी या त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच १९ ईडी २१८९) शिरसोली परिसरात नियमित गस्त घालत होत्या. रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्या रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल परिसरात पेट्रोलिंग करीत असताना शाळेच्या मागील बाजूस एक कार (क्र. एमएच १९ डीव्ही ७४८४) संशयास्पदरीत्या उभी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१६ जून २०२६ मेष राशी आज व्यवसाय आणि आर्थिक बाबींमध्ये सावधगिरीने वागा, घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो. आपलीच लोकं भावना समजून घेऊ शकणार नाहीत, दु:ख होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेतल्याने तुमचं नातं अधिक दृढ व मधुर होईल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या—विशेषतः मुलांच्या लग्नाशी संबंधित समस्या हळूहळू सुटू लागतील. योग्य तयारीशिवाय कोणताही नवीन उपक्रम हाती घेणे टाळा, कारण सावधगिरीच तुम्हाला मोठ्या अडचणींपासून वाचवू शकेल. वृषभ राशी आज तुमच्या कष्टाचे फळ मिळाल्याने तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दिसून येईल. तुम्हाला घरी एखादा धार्मिक कार्यक्रम आयोजित करावा किंवा आध्यात्मिक वातावरण निर्माण करावेसे वाटू शकते.…

Read More