मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाला वेगळीच ऑफर दिली आहे. धर्मरावबाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असे आवाहन केले. “शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेल्यास ते डुबत्या नावेत बसल्यासारखे ठरेल. काँग्रेसमध्ये जाऊन कोणताही राजकीय फायदा होणार नाही. आमचा पक्ष मोठा भाऊ असून सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाने एकत्र यावे,” असे…
Author: editor desk
कोल्हापूर : वृत्तसंस्था मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान राजर्षी शाहू महाराज यांची भेट घेत मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि कोल्हापूर गॅझेट यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारला आठ दिवसांच्या आत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची मागणी केली. कोल्हापूर दौऱ्याच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरच्या नवीन राजवाड्यात राजर्षी शाहू महाराजांची भेट घेतली. दोघांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, “या राज्याला आणि देशाला आरक्षणाची दिशा देण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. त्यांच्या काळातील गॅझेट आणि ऐतिहासिक नोंदी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाने मोठे स्पष्टीकरण दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार उपस्थित होते आणि पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा खासदार संजय राउत यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. काही खासदारांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे ठाकरे गटात मोठी फुट पडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संसदीय गटाची…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेला नैऋत्य मॉन्सून अरबी समुद्रात दाखल झाला असला, तरी त्याची पुढील वाटचाल सध्या मंदावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मॉन्सून पुन्हा सक्रिय होऊन पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या करू नयेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात मॉन्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र मॉन्सून अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर त्याची गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेती मशागतीची…
जळगाव : प्रतिनिधी ‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडून घेता येईल, असे आमिष दाखवून एका सुवर्ण व्यावसायिकाची तब्बल १८ लाख १ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा भगवान शिंदे (वय ४४, रा. अयोध्यानगर, जळगाव) हे सुवर्ण व्यवसाय करतात. सुमारे महिनाभरापूर्वी त्यांची ओम संजय महाजन (रा. गायत्री नगर, मेहरुण तलाव परिसर, जळगाव) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेत महाजन याने शिंदे यांना एका व्यक्तीचे १९८ ग्रॅम सोने ‘गोल्ड लोन’साठी तारण ठेवले असल्याचे सांगितले. या सोन्यावर सुमारे १९ लाख…
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूरमधील माळशिरसमधील एका शेतात असलेल्या विहिरीत एक पिकअप टेम्पो कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून त्यातून ८ जणांचे मृतदेह विहिरीत बाहेर काढण्यात आली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार टेम्पोमधील सर्वजण देवदर्शनाला गेले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे होते. दरम्यान क्रेनद्वारे विहिरीतून पिकअप टेम्पो बाहेर काढली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मदतीसाठी अग्निशामक दलाची यंत्रणा बोलावली होती. प्रांताधिकारी, जिल्हा प्रशासनाची टीम रवाना झाली. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु होते. माहिती कळतच आमदार उत्तम जानकर हे घटनास्थळाकडे निघाले. या अपघाताबाबत…
आजचे राशिभविष्य दि.१५ जून २०२६ मेष राशी कामाबाबत नवीन कल्पना तुमच्या सुचतील आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही पूर्ण निष्ठेने व मेहनतीने प्रयत्न कराल. जबाबदाऱ्या वाढू शकतात, परंतु तुमच्या कठोर परिश्रमांमुळे तुम्ही डगमगणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मालमत्तेशी संबंधित एखादा निर्णय फायदेशीर ठरू शकतो. अविवाहित व्यक्तींच्या आयुष्यात नवीन नातेसंबंधाचे आगमन आनंद घेऊन येऊ शकते. वृषभ राशी आजचा दिवस समतोल आणि संयमाने पुढे जाण्याचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्यांना नवी ओळख मिळू शकते. तुमचे नेतृत्वगुण इतरांवर प्रभाव पाडतील. नवीन संपर्कांमुळे भविष्यात लाभ होऊ शकतो. जोडीदारासोबतचे जुने मतभेद संवादातून दूर…
जळगाव : प्रतिनिधी घरकामास असलेल्या मोलकरणीने सुधा पुरुषोत्तम काबरा (वय ५९) व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पियूष दीपक संघवी (दोघ रा. लेकसाईट रेसिडेन्सी गणेश घाट) यांच्या घरातून ३ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. ही घटना दि. ९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोलकरीण समोतीबाई धर्मराज धांडेकर (वय ३९, मूळ रा. धारणी, ता. अमरोद, जि. अमरावती, ह.मु. रेणुकानगर, रामेश्वर कॉलनी) हीच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण तलाव परिसरात असलेल्या लेक साईट रेसिडेन्सी येथे सुधा काबरा या वास्तव्यास आहे. त्यांची प्रकृती खराब असल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरीता समोतीबाई धांडेकर या…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील गंगाराम प्लॉट परिसरात राहणाऱ्या १६ वर्षीय प्रतीक अनिल महाजन या विद्यार्थ्याचा तापी नदीत बुडून शनिवारी दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक महाजन हा आपल्या एका मित्रासोबत शहरातील पूजा कॉम्प्लेक्सजवळील तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास दोघेही नदीत पोहत असताना प्रतीक अचानक खोल पाण्यात गेला. पोहण्याचा अंदाज चुकल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या मित्राने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला, मात्र प्रतीकचा पाण्यात शोध लागत नव्हता. घटनेची माहिती मिळताच भुसावळ नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव…
आजचे राशिभविष्य दि.१४ जून २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्या आर्थिक बाबींच्या दृष्टीने नवी आशा घेऊन आला आहे. गुंतवणूक आणि आर्थिक निर्णयांबाबत संयम बाळगल्यास चांगला नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा असेल आणि तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पूर्णपणे समर्पित राहाल. जोडीदारासोबत घालवलेले आनंदाचे क्षण तुमच्या नात्यात अधिक गोडवा निर्माण करतील. व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील. आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ राशी आजचा दिवस तुम्हाला विचारपूर्वक पावले उचलण्यास प्रवृत्त करणारा आहे. तुम्ही जितक्या समंजसपणे वागाल, तितकेच यशाच्या जवळ जाल. वाढलेला मान-सन्मान आणि आत्मविश्वास तुमच्या मनोबलात भर घालेल. कुटुंबातील विवाहाशी संबंधित…

