Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; धक्काबुक्की करत दगडफेक !
    क्राईम

    दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; धक्काबुक्की करत दगडफेक !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दारुच्या नशेत असलेल्याला रस्त्याच्या बाजूने चालण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने महेंद्र पांडुरंग जाधव (मराठे) (वय ३५, रा. शिरसोली प्र. न. ता. जळगाव) याने पोलिसांना दगड मारुन फेकला. तसेच शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेला. ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी रात्री पावणेअकरा वाजता शिरसोली रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील शिरसोली गावात गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार प्रदीप पाटील हे हजर होते. दरम्यान, दि. २० सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास विसर्जन मिरवणुक संपल्यानंतर वाहतुक सुरळीत करीत असतांना शिरसोली प्र. बो ते शिरसोली प्र. न दरम्यान असलेल्या मुख्य रस्त्यावरुन संशयित महेंद्र जाधव हा दारुच्या नशेत रस्त्याच्या मध्यभागी चालून वाहतुकीत अडथळा निर्माण करीत होता.

    पोलिसांनी मद्यपी महेंद्र जाधव याला रस्त्याच्या कडेला चालण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने महेंद्र जाधव याने पोलिसांना धक्काबुक्की करीत त्यांना दुखापत होईल या उद्देशाने त्यांना दगड मारुन फेकला. तसेच त्यांच्या अंगावर जावून शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    September 23, 2026

    दीपनगर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू !

    September 23, 2026

    उसने पैसे मागितले अन् महिलेच्या गळ्यावर ब्लेडने वार! निवृत्तीनगरात थरार !

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.