Author: editor desk

जळगाव | प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या गंभीर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील कुप्रसिद्ध गावांवर मोठी धडक कारवाई करत ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ राबविले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल २०० पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईत विविध गुन्ह्यांतील ८ आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे ६१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालमोटा, हलवेडा, मथापुरी, जोहेलखेडा आणि चारठाणा ही गावे गेल्या काही वर्षांपासून विविध फसवणूक आणि गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू, खजिना, जुन्या नाण्यांचा व्यापार, काळी हळद, नागमणी, रेड…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील विविध घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना (उबाठा), संजय राऊत, तृणमूल काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर रोखठोक प्रतिक्रिया दिल्या. वृत्तसंस्था एएनआयशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या राजकीय निर्णयावर टीका करताना त्यालाच शिवसेनेच्या आजच्या स्थितीचे मूळ कारण असल्याचे म्हटले. आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महायुतीची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय शिवसेनेच्या मूळ विचारधारेच्या विरोधात होता. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेल्यामुळेच आज अनेक जुने शिवसैनिक आणि नेते पक्षापासून दूर जात आहेत. सुरुवातीपासून एनडीएसोबत युती कायम…

Read More

मुंबई  :  प्रतिनिधी माहितीच्या अधिकाराच्या (आरटीआय) वापरावर नवे निर्बंध आणणारी महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ ही नवी नियमावली राज्य सरकारने १२ जूनपासून लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना जारी करण्यात आली असून, अर्ज शुल्क, अपील शुल्क, शब्दमर्यादा, ओळखपत्राची सक्ती आणि माहिती मागवण्याचे कारण स्पष्ट करण्याची अट अशा अनेक महत्त्वाच्या बदलांचा त्यात समावेश आहे. या नव्या नियमांमुळे माहितीचा अधिकार अधिक जाचक होणार असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. विशेषतः माहिती मागवण्याचे कारण विचारण्याची अट ही माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशालाच छेद देणारी असल्याची टीका होत आहे. माहिती अधिकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नवीन कानळदा रोडवरील राजराजेश्री अपार्टमेंटसमोर गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहनाची तपासणी करणाऱ्या दोन तरुणांवर १० ते १५ जणांच्या जमावाने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू आहेत. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कैलास सोनवणे आणि योगेश साळी यांना शिवाजीनगर परिसरात गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी उस्मानिया पार्क परिसरातील राजराजेश्री अपार्टमेंटसमोर एक छोटा हत्ती वाहन (क्र. एमएच ०४…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक यांचा पुतण्या पवन सुनील पाटील (वय २७, रा. मूळ रा. नशिराबाद, ता. जळगाव, ह.मु. अयोध्या नगर, जळगाव) याने सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही घटना १८ जूनला सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबईतील वर्सोवा भागात घडली. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  नशिराबाद येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक योगेश पाटील यांचा पुतण्या पवन पाटील हा जळगावातील अयोध्या नगरमध्ये वास्तव्याला होता. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पवन पाटील हा मित्रांसोबत…

Read More

जामनेर  : प्रतिनिधी जामनेर तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या ताब्यातील शासकीय वाहनाला तालुका कृषी कार्यालयाच्या आवारातच मध्यरात्री आग लागल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १८) पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. या आगीत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आग अपघाती होती की कोणीतरी मुद्दाम लावली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १५ एए १८० या क्रमांकाचे शासकीय वाहन हे तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या ताब्यात असून, दि. १७ रोजी सायंकाळी वाहनचालकाने नेहमीप्रमाणे ते तालुका कृषी कार्यालयाच्या आवारात उभे केले होते. रात्री सर्व कामकाज आटोपल्यानंतर कार्यालय…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतीही फी न घेता १० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ५ लाख रुपये उकळून व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील एका व्यक्तीविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  चाळीसगावातील शास्त्री नगरात राहणारे गोविंद हिरालाल चौधरी यांचे – चायनिज खाद्यपदार्थांचे दुकान आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी त्यांनी मोठे कर्ज घेण्याचे ठरविले होते. – याचदरम्यान त्यांची ओळख शांताराम मार्तंड संदान पाटील (रा. सह्याद्री अपार्टमेंट, मखमलाबाद, नाशिक) याच्याशी झाली. शांताराम पाटील याने गोविंद चौधरी यांना विश्वासात घेत, राष्ट्रीयकृत बँकेतून कोणतीही फी न घेता १० कोटी रुपयांचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घराच्या खिडकीत उभे राहून डोक्याचे केस विंचरत असतांना संशयिताने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना दि. १५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित सोपान विठ्ठल कोळी (रा. असोदा ता, जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी ही घराच्या खिडकीत उभी राहून डोक्याचे केस विंचरत होती. त्यावेळी संशयिताने त्या तरुणीकडे पाहून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान, पीडितेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी दि. १७ जून रोजी तालुका पोलिसात…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१९ जून २०२६ मेष राशी तुमच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ही अनुकूल वेळ आहे. सामाजिक उपक्रमांबाबत तुम्ही दिलेला सल्ला अत्यंत मोलाचा मानला जाईल. घरातील एखाद्या विषयावर कुटुंबीयांशी केलेली चर्चा सकारात्मक परिणाम देईल. एखाद्या मित्रासोबतच्या वादामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तसेच, आर्थिक बाबींबाबत तुम्हाला नवीन रणनीती आखावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्या आणि त्या पूर्ण करा. मोठ्यांच्या कठोर शब्दांमुळे दुखावण्याऐवजी, त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. वृषभ राशी आज थोडीशी समजदारी आणि सावधगिरी बाळगल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे आणि फाइल्स व्यवस्थित ठेवा आणि ती कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या हाती पडणार नाहीत याची काळजी घ्या. जवळच्या नातेसंबंधांमधील संशयामुळे वाद निर्माण…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत महायुतीने मतदानापूर्वीच मोठा राजकीय डाव साधत 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उर्वरित 11 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगली असून राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना. येथे भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ आणि शिवसेना (ठाकरे गट) समर्थित गणेश लोखंडे यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत होत आहे. या मतदारसंघातील निकालाला राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.…

Read More