Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ
    क्राईम

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    केवळ ८०० रुपयांच्या क्षुल्लक वादातून एका मजुराची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक घटना नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात घडली. या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील निपाणे रस्तावर राहणारे मयत जुगा कांतीलाल पवार (वय ४०) हे मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. २१ सप्टेंबरला रात्री ते नगरदेवळा येथील वस्तीजवळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला उभे होते. या वेळी त्यांच्याच गल्लीत राहणारा धर्मा भाता पवार याने जुगा पवार यांच्याजवळील ८०० रुपये हिसकावण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर अचानक दगडाने प्राणघातक हल्ला केला. दगडाच्या गंभीर हल्ल्यात जुगा पवार हे गंभीर जखमी झाले अन् त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी मयताची ६५ वर्षीय वृद्ध आई आशाबाई कांतीलाल पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात २२ सप्टेंबरला पहाटे ४.५७ वाजता संशयित धर्मा भाता पवार याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे नगरदेवळासह परिसरात शोककळा पसरली आहे.

    या गंभीर हत्याकांडाचा तपास पो.नि. महेश टाक याच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुशील सोनवणे, प्रवीण परदेशी, नीलेश ब्राह्मणकर, गोवर्धन बोरसे, भूषण पाटील, सुनील राजपूत, दीपक पाटील, मनोज माळी, मनोहर पाटील, जितू राजपूत, महेंद्र चव्हाण, संदीप सोनवणे करत आहेत. हत्येसाठी वापरलेला दगड जप्त केला असून घटनेमागील नेमका पैशांचा व्यवहार, हल्ल्याची वेळ आणि परिस्थितीबाबत पोलीस तपास करत आहेत. अवघ्या ८०० रुपयांच्या कारणावरून एका निष्पाप मजुराचा जीव गेल्याने नगरदेवळा व भडगाव परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व चिंता व्यक्त केली जात आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026

    दीपनगर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू !

    September 23, 2026

    दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; धक्काबुक्की करत दगडफेक !

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.