Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बहिणीला भेटून निघाला अन् काळाने घातला घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू!
    क्राईम

    बहिणीला भेटून निघाला अन् काळाने घातला घाला; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू!

    editor deskBy editor deskSeptember 24, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    लहान बहिणीला भेटल्यानंतर मित्रासोबत मोठ्या बहीणीच्या भेटीसाठी जात असलेल्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने जोरदार घडक दिली. या अपघातात पवन अनिल चौधरी (वय २९) व त्याचा मित्र युवराज भिका सोनवणे (वय ३४, दोघ रा. बिरोदा, जि. बऱ्हाणपुर, मध्यप्रदेश) हे दोघे ठार झाले. हा अपघात दि. २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पाळधी ते तरसोद बायपासवर झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  मध्यप्रदेशातील बिरोदा येथील पवन चौधरी हा त्याचा मित्र युवराज सोनवणे याच्या (एमपी ६८, झेडडी ९२३२) क्रमांकाच्या दुचाकीवरुन यावल तालुक्यातील पाडळसे येथे लहान बहिणीच्या भेटीसाठी आला होता. सायंकाळी भेट घेतल्यानंतर ते दोघ सुरत येथे राहत असलेल्या पवनच्या मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघाले. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ते जळगावनजीक आल्यानंतर ते तरसोद ते पाळधी बायपासने जात असताना आसोदा उड्डाणपुलाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.भरधाव वाहनाने धडक दिल्यानंतर पवन चौधरी याचा जागीच मृत्यू झाला, तर युवराज सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. त्यांना पोलिसांनी रुग्णवाहिकेतून तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना जखमी युवराजचा मृत्यू झाला.

    भरधाव वाहनाने दुचाकीला इतक्या जोरात धडक दिली की, दुचाकीच्या समोरील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. तसेच धडक दिल्यानंतर वाहन तेथून पसार झाले. याप्रकरणी कुमुद अनिल चौधरी यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अपघाताच्या काही तासांपुर्वीच पवन चौधरी हा लहान बहिणीची भेट घेवून मोठ्या बहिणीकडे जाण्याकरीता निघाला होता. परंतू काही तासातच त्याच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली आणि यामध्ये त्याच्यासह मित्राचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लहान बहिणीची भावासोबतची भेट अखेरची ठरल्याचे सांगत कुटुंबियाना अश्रू अनावर झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    साकरे शिवारात विजेचा कहर : कडकडाटासह वीज कोसळली; १५ शेळ्या जागीच ठार !

    September 24, 2026

    बंद घराचे कुलूप तोडले, कपाट फोडले; ५१ हजारांची रोकडसह सोन्याचे दागिने लंपास!

    September 24, 2026

    पैशांसाठी वृद्ध महिलेचा गळा आवळून खून; सालगडी तरुणाला अटक

    September 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.