आजचे राशिभविष्य दि.१८ जून २०२६ मेष राशी आजचा दिवस धावपळीचा आणि व्यस्त असू शकतो, कारण अनेक कामे एकाच वेळी तुमच्याकडे लक्ष देण्याची वाट पाहत असतील. तरीही, प्रत्येक कामाला तितकेच तातडीचे मानून स्वतःवर अनावश्यक ताण घेण्याची गरज नाही; त्याऐवजी, महत्त्वाची कामे प्राधान्यक्रमाने करणे हाच शहाणपणाचा मार्ग ठरेल. मुलांविषयीची एखादी चांगली बातमी तुमच्या मनाला शांती देईल आणि चेहऱ्यावर हास्य फुलवेल. बऱ्याच काळापासून असलेली एखादी इच्छा आज अखेर पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला मनापासूनचे समाधान मिळेल. वृषभ राशी आज आळस झटका आणि पूर्ण उत्साहाने काम करा. जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि एखाद्या महत्त्वाच्या नवीन कामामुळे सुरुवातीला थोडी चिंता वाटू शकते, परंतु सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्या : नगराध्यक्ष योगेश पाटील नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व…
नांदेड : वृत्तसंस्था शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या कथित फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, शिंदे गटाचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर जोरदार टीका केली आहे. पक्षातील लोकप्रतिनिधींशी संवादाचा अभाव आणि त्यांना भेटण्यासाठी वेळ न देणे हीच पक्षातील असंतोषाची प्रमुख कारणे असल्याचा दावा करत सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी ठाकरे गटातील खासदारांच्या कथित बंडाबाबत सावध भूमिका घेतली. “सध्या कोणतेही बंड अधिकृतपणे झाल्याचे दिसत नाही. ना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तसे काही समोर आले आहे, ना सोशल मीडियावर. त्यामुळे या टप्प्यावर थेट बंड झाले आहे, असे म्हणणे…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा खासदारांनी बुधवारी सकाळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून शिंदे गटात विलीन होण्याची विनंती केली आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली असून पक्ष नेतृत्वाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. पत्र पाठविणाऱ्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर आणि संजय दिना पाटील यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या चर्चांचे खंडन करत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले…
जळगाव : प्रतिनिधी उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे कुटुंबीय घराऐवजी गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी संधी साधत घरफोडी केल्याची घटना तालुक्यातील करंज येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंज येथील रहिवासी सागर बाळू धनगर (वय २६) हे आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्यातील तीव्र उकाड्यामुळे ते कुटुंबीयांसह घराच्या गच्चीवर झोपले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट आणि सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी रोख ३७ हजार…
अमळनेर : प्रतिनिधी रेल्वे स्थानकावर १६ रोजी मध्यरात्री १२ ते १ वाजेदरम्यान कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ विभागातील एएसआय जयपाल सिंग यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉलव्हरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दरम्यान, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफ जयपाल सिंग यांची १५ रोजी रात्री ८ ते १६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अमळनेर स्टेशनवर ड्युटी होती. रात्री १२ ते १ वाजेदरम्यान सिंग यांनी रिव्हॉलव्हर आपल्या उजव्या बाजूला कपाळावर लावले आणि त्यातून गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या कपाळातून आरपार डाव्या बाजूला निघाली. त्यानंतर ते धाडकन खाली कोसळले. त्यांच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहत होते.…
रावेर : प्रतिनिधी बेदरकारपणे भरधाव वेगाने कार चालवणाऱ्या चालकामुळे रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. कारने प्रथम समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसली. या दुहेरी अपघातात आत्माराम बाबूराव ढिवरे (वय ५३, रा. मोरगाव बु., ता. रावेर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सावदा नजीक घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज समशेर तडवी हा आपल्या कारने वाघोदा बुद्रूकहून सावद्याकडे जात होता. यावेळी त्याने भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवत सावद्याहून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेत तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले शैक्षणिक शुल्क तसेच संस्थेच्या नावे आलेले धनादेश संस्थेच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी संस्थेचा लेखापाल लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या शिरसोली रोडवरील महाविद्यालयात लोकेश कोल्हे हा लेखापाल म्हणून कार्यरत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) एटीएममधील लाखो रुपयांची चोरी होण्यापासून वाचली. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांना वेळेवर माहिती मिळाल्याने आरोपींना घटनास्थळावरून पळ काढावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे ३.४५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील जारगाव गावातील सारोळा रोडवरील एसबीआय एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न सुरू होता. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड असलेले कॅबिनेट बाहेर काढले होते. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे आणि पोलीस शिपाई बंजारा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.…
आजचे राशिभविष्य दि. १७ जून २०२६ मेष राशी आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या चिंता आणि तणावातून दिलासा मिळेल. तसेच, अडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला एखाद्या जवळच्या नातेवाईकाकडून योग्य सहकार्य मिळेल. जर घराची देखभाल किंवा नूतनीकरणाची कामे सुरू असतील, तर वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने घरात शांतता आणि सुसंवाद वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवा; कारण दुसऱ्याच्या चुकीची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. व्यवसायाच्या विस्ताराच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. रखडलेल्या कामांनाही गती मिळेल. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. वृषभ राशी कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वैवाहिक जीवनाबाबत काही तणाव निर्माण होऊ शकतो. ही समस्या सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. खरेदी करताना किंवा आर्थिक व्यवहार…

