Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी
    क्राईम

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रायसोनी नगर येथून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बॉल खरेदी केल्यानतर पैसे परत देत असतांना सुमित्रा मनोहर खर्चे (वय ४९, रा. रायसोनी नगर) या महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची सोन्याची पोत जबरीने चोरुन नेत चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. ही घटना दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रायसोनी नगरात सुमित्रा खर्चे या वास्तव्यास असून त्यांच्या घराच्या कंपाऊंटमध्ये ओम प्रोव्हीजन नावाने किराणा दुकान सुरु केले आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सुमित्रा खर्चे या दुकानात असतांना दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण त्यांच्या दुकानावर आले. त्यातील एकाने बॉल चाहिए म्हणत काऊंटवर ठेवलेल्या बरणीतून एक बॉल काढला आणि बरणीतून सळी बॉल बाहर निकालो म्हणाला त्यावर सुमित्रा खर्चे यांनी तसे होणार नाही तू यातील एक बॉल निवडून घे असे म्हटल्यानंतर त्या तरुणाने साठ रुपये दिले. सुमित्रा खर्चे यांनी बॉलचे ५० रुपये घेतल्यानंतर दहा रुपये काऊंटरवरील बरणीवर ठेवले. त्यावेळी संशयिताने काऊंटरच्या आतमध्ये वाकून खर्चे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओढून ते दुचाकीवरुन पसार झाले.

    महिलेने चोर चोर म्हणत आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे भरधाव वेगाने तेथून मिळून आले. दरम्यान, सुमित्रा खर्चे यांनी रामानंद नगर पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    September 23, 2026

    दीपनगर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू !

    September 23, 2026

    दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; धक्काबुक्की करत दगडफेक !

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.