Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्रीडेला चालना देण्यासाठी आणि राज्यातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेला राज्यभरातील बॉक्सिंगपटू, प्रशिक्षक, पंच, अधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून सुमारे 1500 हून अधिक क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा 11 जून ते 15 जून 2026 या कालावधीत सुगोकी लॉन अँड रिसॉर्ट, पाळधी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे पार पडणार आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगाव, सुगोकी ग्रुप ऑफ पाळधी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांचे सहकार्य लाभले आहे. आयोजकांनी दिलेल्या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  भारतीय हवाई दलाच्या AN-32 मालवाहू विमानाचा शनिवारी सकाळी आसाममधील जोरहाट येथील रौरिया एअरबेसवर भीषण अपघात झाला. विमान उतरण्याच्या प्रयत्नात असताना ते कोसळून त्याला आग लागली. या दुर्घटनेत वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाला असून एक सह-वैमानिक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे हवाई दलासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त AN-32 विमान नियमित उड्डाणावर होते. रौरिया एअरबेसवर लँडिंग करत असताना अचानक विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीजवळ कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानाला तात्काळ आग लागून त्याचे दोन तुकडे झाले. घटनास्थळी बचाव पथक आणि अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली. या अपघातात स्क्वॉड्रन…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील वरणगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बोहर्डी गावाजवळील फौजी ढाब्याजवळ शुक्रवारी (दि.१२) सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि ट्राला यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून वाहनाच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र वरणगाव पोलीस, पाळधी महामार्ग पोलीस तसेच महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परता, धाडस आणि समन्वयामुळे चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्राला (एच आर ५८ डी ०१९०) मुक्ताईनगरच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने (आरजे ०२ सी जी ७१२७) जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील लकीबा नगर परिसरात गुरुवारी (दि. ११) एका अनोळखी तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आत्महत्येसह घातपाताचीही शक्यता व्यक्त केली जात असून बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा मृतदेह हिरव्या रंगाच्या ओढणीच्या सहाय्याने झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. विशेष बाब म्हणजे ज्या झाडाला मृतदेह लटकलेला होता सुमारे २० ते २५ वर्षांपासून बंद असलेल्या घराच्या छतावरून जावे लागते. त्यामुळे मृतदेह झाडाला लटकविण्यात आला असावा, अशी शक्यता नाकारता त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळच असलेल्या येत नसल्याने प्रकरण अधिक गूढ बनले आहे. सदर घराचे मालक श्रीकांत पाठक असून ते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या संघटित अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्याबाबतचे निर्देश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित प्रत्येक कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी व नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोकासाठी आवश्यक प्रक्रिया काटेकोरपणे पाळावी, असे मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभा राहिलेला बंडखोरीचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीत रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील या निवडणुकीत बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवारासमोरील अडचणी वाढल्या होत्या. मात्र, पक्षश्रेष्ठींकडून सुरू असलेल्या समन्वयाच्या प्रयत्नांना…

Read More

आजचे राशिभविष्य दि.१३ जून २०२६ मेष राशी आजचा दिवस ठीकठाक असेल, परंतु तुमच्या सकारात्मक विचाररणीमुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करणे सोपे जाईल. मत्सर किंवा नकारात्मक विचार मनात बाळगणे टाळा. आरोग्याशी संबंधित एखादी जुनी समस्या दुर्लक्षित करणे आता महागात पडू शकते. तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबतचे जुने गैरसमज दूर होतील आणि तुम्ही कदाचित एकत्र बाहेर जाण्याचे नियोजनही कराल. वृषभ राशी आज नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल आणि उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने झुकू शकतात. संवादातून तणावपूर्ण संबंध सुधारतील. भावंडांकडून मिळणारा पाठिंबा फायदेशीर ठरेल. मित्रपरिवाराचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीसमोरील बंडखोरीचे संकट अद्याप कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नाशिकमधील बंडखोरीचा तिढा सुटल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावचाही पेच मार्गी लागल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांतच शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या अचानक नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा काळे या गुरुवारी सकाळपासून कोणाच्याही संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानीही शांतता असून त्या घरी नसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे त्यांचे सर्व मोबाईल क्रमांकही बंद…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कर्जमाफी, हवामान बदल आणि शेतीसमोरील वाढत्या आव्हानांबाबत सविस्तर भूमिका मांडली. कर्जमाफी योजनेवर सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना त्यांनी सरकारच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली तसेच शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेती क्षेत्रासमोर हवामान बदलाचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे शेतीचे नुकसान वाढत असून भविष्यात ‘क्लायमेट प्रूफ’ शेतीकडे वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. यासाठी सरकार विविध उपाययोजना राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्जमाफी योजनेबाबत बोलताना फडणवीस यांनी…

Read More

चोपडा : प्रतिनिधी  शहरातील मेन रोडवरील गोल्ड हाऊस महावीर ब्रदर्स या सराफा दुकानातून तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचे ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लेडीज पेंडल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुकान मालक महावीर उमेदमल जैन यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सविस्तर वृत्त असे की, ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती दुकानात आले होते. त्यांनी विविध प्रकारचे सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने कर्मचाऱ्याकडून अनेक डिझाईनचे पेंडल मागवून घेतले. या वेळी त्यांनी कर्मचाऱ्याचे लक्ष विचलित करत गोंधळाचे वातावरण निर्माण केले. दरम्यान, काही वेळानंतर संबंधित व्यक्ती दुकानातून निघून गेले. त्यानंतर कर्मचाऱ्याने पेंडलच्या बॉक्सची…

Read More