Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दीपनगर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    दीपनगर उड्डाणपुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी दुपारी काळजाचा थरकाप उडविणारा भीषण अपघात झाला. दीपनगर उड्डाणपुलाजवळ वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येणाऱ्या टिव्हीएस मोपेडला मागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोपेड ट्रकच्या पुढील भागात अडकली आणि ट्रकने ती दीपनगर उड्डाणपुलापासून दोन किलो मिटर शेरे पंजाब हॉटेलजवळपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    या दुर्घटनेत देवेन चौधरी आणि सलीम मिर्जा बेग या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही वरणगाव येथून भुसावळच्या दिशेने टिव्हीएस मोपेडवरून येत होते. याचवेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोपेड ट्रकच्या पुढील भागात अडकल्याने काही अंतरापर्यंत रस्त्यावरून फरफटत गेली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ एकच खळबळ उडाली.

    या भीषण अपघातात देवेन चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या सलीम मिर्जा बेग यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघे रेलवे ठेकेदारीत काम करीत असल्याचे समजते, दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.अपघाताच्या वेळी योगायोगाने याच मार्गावरून आरटीओ विभागातील पोलीस कर्मचारी जात होते. त्यांच्या निदर्शनास अपघाताची घटना येताच त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले तसेच संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. गंभीर अवस्थेतील जखमीला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता ट्रक घेऊन पुढे निघून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तत्परतेने शोध घेत संबंधित ट्रक व चालकाला नशिराबाद टोलनाक्याजवळ पकडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत तपशील पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

    नेहमीप्रमाणे घराबाहेर पडलेले दोन तरुण पुन्हा घरी परतलेच नाहीत. या एका अपघाताने दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेन चौधरी, सलीम मिर्जा बेग दोघे रेल्वे ठेकेदारीच्या कामाला होते. दोघेही भुसावळ येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने दोन कुटुंबांचा आधार हिरावला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026

    अवघ्या ८०० रुपयांसाठी मजुराचा दगडाने ठेचून खून : नगरदेवळा रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ

    September 23, 2026

    दारूच्या नशेत पोलिसांशी हुज्जत; धक्काबुक्की करत दगडफेक !

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.