Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जनगणना २०२७ प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र
    जळगाव

    जनगणना २०२७ प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र

    editor deskBy editor deskSeptember 23, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    ‘जनगणना २०२७’ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले होते. राज्य शासनाच्या जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रधान जनगणना अधिकारी रोहन घुगे यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी महेश चौधरी यांच्या समन्वयातून हे प्रशिक्षण झाले. जनगणना संचालनालयाचे सहायक संचालक अजय ठाकूर व श्रीकांत बनकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील तहसिलदार तथा चार्ज अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी, नगरपंचायत अधिकारी तथा चार्ज अधिकारी, महसूल सहायक अधिकारी, तांत्रिक सहायक, चार्ज अधिकारी यांचे लिपिक आदी उपस्थित होते.

    प्रशिक्षणात घरयादी व घरगणना तयार करणे, प्रगणक गट निश्चित करण्याची सर्वसाधारण तत्त्वे, सीएमएमएस प्रणालीमध्ये प्रगणक गट तयार करण्याची कार्यपद्धती, घरयादी गटांची यादी व उपगट तयार करणे, मांडणी दर्शक नकाशाचे पुनरावलोकन, गणना घरांची निवड व वाटप, प्रगणक गट ‘फ्रीज’ करणे, उपगटांचा समावेश, तसेच उपगटांचे सीमांकन व जिओ-टॅगिंग याबाबत पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर माहिती देण्यात आली.

    या जनगणनेत नैसर्गिक सीमांच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात येणार आहे. मागील जनगणनेच्या तुलनेत प्रश्नावलीतील प्रश्नांची संख्या २८ वरून ४० करण्यात आली असून प्रश्नावली व्यक्तिनिहाय असणार आहे. अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा वापर करण्यात येणार आहे.

    जनगणना कामात अचूकता राहावी यासाठी प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी गावनिहाय लोकसंख्या, घरांची संख्या आणि प्रत्येक गटाची माहिती कागदावर व्यवस्थित नोंदवून नियोजन करावे. त्यामुळे पोर्टलवर काम करताना अडचणी टाळून प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करता येईल, असे प्रशिक्षणात सांगण्यात आले.

    पूर्वीच्या एक हजार लोकसंख्येच्या प्रगणक गटांची मर्यादा आता ८०० करण्यात आली आहे. कामाचा अतिरिक्त ताण टाळून योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हा बदल करण्यात आला आहे. जनगणनेतील प्रत्येक टप्पा निर्धारित वेळेत पूर्ण करून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळावी, अशा सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

    प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांनी जनगणना प्रक्रियेबाबत विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. सर्व संबंधित यंत्रणांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार आणि निर्धारित कार्यपद्धतीनुसार अचूकपणे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले.

    प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयालयाच्या जनगणना शाखेतील सहायक महसूल अधिकारी ए पी जोशी, सुनिता खडके, किशोर पाटील, राजेश जाधव, हर्षदा वैद्य, उदय लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश !

    September 23, 2026

    निंभोरा पोलिसांचा धडाका; घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश, ५ संशयित आरोपी अटकेत !

    September 23, 2026

    बॉल घेतला, पैसे दिले अन् क्षणात सोन्याची पोत हिसकावली : रायसोनी नगरात धक्कादायक चोरी

    September 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.