Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुंबईत जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबादवर शोककळा
    क्राईम

    मुंबईत जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबादवर शोककळा

    editor deskBy editor deskJune 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक यांचा पुतण्या पवन सुनील पाटील (वय २७, रा. मूळ रा. नशिराबाद, ता. जळगाव, ह.मु. अयोध्या नगर, जळगाव) याने सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. ही घटना १८ जूनला सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुंबईतील वर्सोवा भागात घडली. या तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  नशिराबाद येथील नगर परिषदेचे नगराध्यक्ष तथा हॉटेल व्यावसायिक योगेश पाटील यांचा पुतण्या पवन पाटील हा जळगावातील अयोध्या नगरमध्ये वास्तव्याला होता. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी पवन पाटील हा मित्रांसोबत मुंबई येथे फिरण्यासाठी गेला होता. दरम्यान, १८ जूनला सकाळी ८ वाजेच्या सुमारास पवन पाटील याने मुंबईतील वर्सोवा भागात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना. तर, या घटनेची माहिती मिळताच नशिराबादसह जळगावात राहणाऱ्या त्याचे नातेवाईक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, पवन पाटील याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरण पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.

    पवन पाटील यांचे कुटुंबीय राजकारणासह हॉटेल व्यवसायात सक्रिय आहेत. तर, घरची आर्थिक परिस्थिती उत्तम असताना त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे नशिराबादसह जळगावात शोककळ पसरली आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तणाव; तरुणांवर जीवघेणा हल्ला

    June 19, 2026

    कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला मध्यरात्री आग; घातपाताचा संशय, अज्ञातांविरुद्ध गुन्हा !

    June 19, 2026

    कर्ज मंजुरीच्या आमिषाने व्यापाऱ्याची ५ लाखांची फसवणूक

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.