जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका निर्जनस्थळी २ जून रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. पोलिस उपअधीक्षक बापू रोहम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फत्तेपूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका निर्जन ठिकाणी एक महिला तिच्या मित्रासोबत बसलेली होती. त्याचवेळी १४ ते १५ तरुण याठिकाणी आले. यापैकी युसूफ नामदार तडवी आणि अशपाक इमाम तडवी या दोन जणांनी महिलेवर बलात्कार केला. इतर दोन जणांनी तिच्या मित्राला धमकावले. काहींनी मोबाइलवर या घटनेचे व्हिडीओ चित्रण केले. त्यानंतर त्यातील एका संशयिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित…
Author: editor desk
आजचे राशिभविष्य दि.३० जून २०२६ मेष राशी आज तुमच्या मनात विविध भावनांची दाटी होऊ शकते. दूर राहणाऱ्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी अचानक तुमच्या मनाला स्पर्श करू शकतात, ज्यामुळे तुम्ही काहीसे भावूक होऊ शकता. अशा वेळी, आपल्या खाजगी गोष्टी सर्वांसोबत शेअर करण्याऐवजी, स्वतःला समजून घेण्यावर आणि मनःस्थिती स्थिर ठेवण्यावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस आशादायक आहे; उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. वृषभ राशी आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की, छोट्या बचतीतूनच मोठ्या स्वप्नांचा पाया रचला जातो. खर्चावर नियंत्रण ठेवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, कारण…
जळगाव : प्रतिनिधी तक्रारदाराचा विश्वास संपादन करत नफ्याचे अमिष दाखवित 30 वषय तरुणाला सायबर ठगाने 97 लाख 50 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने तक्रारीनुसार याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार तरुण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असुन खाजगी नोकरीनिमित्त ते भुसावळ येथे वास्तव्यास आहेत. गुरुवारी दि.२५ जून रोजी वेळोवेळी विलास पाटील नाव सांगणारा मोबाईल धारक याने तरुणाशी संपर्क साधला. मोबाइल क्रमांकावर नाव व फोटो लावुन त्याने तक्रारदार यांचा विश्वास संपादन केला. नफ्याचा गुंतवणूक फंडा सांगत त्याने तक्रारदार यांच्याकडून तब्बल ९७ लाख ५० हजार रुपये ऑनलाईन स्विकारले. त्यानंतर तक्रारदार यांनी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.…
जळगावः प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या उत्खनन करुन वाळुची वाहनातून चोरटी वाहतूक खेडी खु. शिवारातून केली जात होती. पोलिसांचे पथक दिसल्यानंतर वाहने सोडुन चालक पसार झाले. ट्रॅक्टर, ट्रक तसेच डंपर आणि त्यात भरलेली वाळु असा सुमारे १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळुन आला. याप्रकरणी संशयित चालकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास खेडी खु. (ता. जळगाव) शिवारातील गिरणा नदी पात्रातून वाळु भरुन चोरटी वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह पथक रवाना झाले. वाळुची चोरटी वाळु वाहतूक करत असताना पोलीस पथक दिसले. कारवाईच्या भितीतून…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे पुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील डॉ. समाधान पाटील आणि रवींद्र महाजन यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी संबंधित हॉस्पिटलमध्ये दोघांमध्ये वाद उफाळल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी रवींद्र महाजन यांची डॉक्टरांसोबत झटापट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ पोस्ट केल्याचेही सांगितले आहे. यानंतर रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या…
जळगाव : प्रतिनिधी शिरसोली गावातील जुन्या भांडणाचा राग मनात धरून दापोरा येथील एका तरुणासह त्याच्या मित्रांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची आणि चॉपरने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २६ जून रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली प्र. न. स्मशानभूमीजवळ घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विशाल विनोद पाटील (वय २१, रा. दापोरा, ता. जि. जळगाव) या तरुणाने रुग्णालयात दिलेल्या जबाबावरून संशयित आरोपी विक्की बारी, दीपक भिल आणि महेश बारी (सर्व रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . फिर्यादी विशाल पाटील हा सुप्रीम…
जळगाव : प्रतिनिधी अवघ्या ९०० रुपयांच्या गुटख्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून एका निष्पाप सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आव्हाणे शिवारात घडली. वडिलांवर फेकलेला लाकडी दांडूका चुकून जवळ उभ्या असलेल्या मुलाच्या डोक्याला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तालुका पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पानटपरीचालकाला अटक केली आहे. मृत बालकाचे नाव वंश सुनील बारेला (वय ६) असे आहे. तो मुळचा उनपदेव (अडावद) येथील रहिवासी असून त्याचे कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून कामानिमित्त आव्हाणे येथे वास्तव्यास आहे. वंशचे वडील सुनील बारेला हे गावातील श्रीकांत चौधरी यांच्या म्हशीच्या गोठ्यात मजुरीचे काम…
मुंबई : वृत्तसंस्था जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात दाखल झालेल्या मान्सूनने काही भागांत हजेरी लावल्यानंतर अचानक विश्रांती घेतल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर संकटाची छाया निर्माण झाली होती. मात्र आता मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासांत राज्यातील विविध भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाडा, पुणे विभाग आणि कोकण किनारपट्टीत मान्सूनने जोरदार प्रगती केली आहे. काही दिवस कोकणात रेंगाळलेला मान्सून आता वेगाने पुढे सरकला असून तो पुणे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवकॉलनी ते आशाबाबा नगर मार्गावर रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी सकाळी परिसरात एकच खळबळ उडाली. चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्यामुळे सुरुवातीला घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात अतिमद्यसेवनानंतर तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर बारकू नारळे (वय २७, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारळे हा आपल्या आई-वडिलांसह खंडेराव नगर परिसरात राहत होता. काही वर्षांपासून तो बाहेरगावी नातेवाईकांकडे वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वीच…
जळगाव : प्रतिनिधी तुम्ही विहरीचे ठिकाणी बदल केले असून तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुम्हाला विहरीचे पुढील अनुदान पाहिजे असतील तर तुम्हाला मला ३० हजार द्यावे लागतील. असे म्हणत ३० हजारांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जामनेर पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक कंत्राटी कर्मचारी सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी जामनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समिती यांच्याकडून प्रस्तावित सिंचन विहीर मंजूर झाली होती. पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर नावकर यांनी प्रस्तावित विहिरीची स्थळ पाहणी करण्यापुर्वीच तक्रारदार…

