जळगाव : प्रतिनिधी
घराच्या खिडकीत उभे राहून डोक्याचे केस विंचरत असतांना संशयिताने तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना दि. १५ जून रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी संशयित सोपान विठ्ठल कोळी (रा. असोदा ता, जळगाव) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. दि. १५ जून रोजी रात्रीच्या सुमारास तरुणी ही घराच्या खिडकीत उभी राहून डोक्याचे केस विंचरत होती. त्यावेळी संशयिताने त्या तरुणीकडे पाहून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान, पीडितेने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी दि. १७ जून रोजी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित सोपान विठ्ठल कोळी (रा. असोदा, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना विजय निकम हे करीत आहे.



