Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तणाव; तरुणांवर जीवघेणा हल्ला
    क्राईम

    गौमांस वाहतुकीच्या संशयावरून तणाव; तरुणांवर जीवघेणा हल्ला

    editor deskBy editor deskJune 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसरातील नवीन कानळदा रोडवरील राजराजेश्री अपार्टमेंटसमोर गौमांस वाहतुकीच्या संशयावरून वाहनाची तपासणी करणाऱ्या दोन तरुणांवर १० ते १५ जणांच्या जमावाने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) उपचार सुरू आहेत. प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कैलास सोनवणे आणि योगेश साळी यांना शिवाजीनगर परिसरात गोमांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी उस्मानिया पार्क परिसरातील राजराजेश्री अपार्टमेंटसमोर एक छोटा हत्ती वाहन (क्र. एमएच ०४ एचडी ७५२९) थांबवून त्याची तपासणी सुरू केली.

    यावेळी वाहनाशी संबंधित असलेल्या सिटी कॉलनी परिसरातील समशेर नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फोन करून आणखी १० ते १५ जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. काही वेळातच जमावाने राहुल सोनवणे आणि योगेश साळी यांच्यावर हल्ला चढविला.

    हल्लेखोरांनी लोखंडी पाइपने मारहाण केल्याने योगेश साळी गंभीर जखमी झाले. त्यांना वाचविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल सोनवणे यांच्या डोक्यातही पाइपचा जोरदार फटका बसला. या हल्ल्यात राहुल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला.

    जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. राहुल सोनवणे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डोक्यावर तब्बल १८ टाके घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर योगेश साळी यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.

    घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधितांकडून माहिती घेऊन हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुंबईत जळगावच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; नशिराबादवर शोककळा

    June 19, 2026

    कृषी अधिकाऱ्यांच्या शासकीय वाहनाला मध्यरात्री आग; घातपाताचा संशय, अज्ञातांविरुद्ध गुन्हा !

    June 19, 2026

    कर्ज मंजुरीच्या आमिषाने व्यापाऱ्याची ५ लाखांची फसवणूक

    June 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.