Author: editor desk

धरणगाव : प्रतिनिधी  दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तीनजण जागीच ठार झाले. ही भीषण घटना पाळधी (ता. धरणगाव) नजीक सावदा-रिंगणगाव रस्त्यावर सोमवारी दुपारी २ वाजता घडली. यात एकजण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये किरण बाबूलाल राक्षे-मराठे (३८, पथराड, ता. धरणगाव), चेतन पाटील (३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या दुचाकीवर वडील बाबूलाल राक्षे हे मागे बसलेले होते. पाळधीनजीक समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. त्यात वरील तीनजण ठार झाले.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दारूचे व्यसन आणि पत्नीवर घेत असलेल्या संशयातून नशिराबाद येथे एका पतीने आपल्या पत्नीचा कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२२ जून) दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून सात वर्षांच्या निष्पाप मुलाचे मातृछत्र हिरावल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मंदा विकास जाधव (वय २८, रा. भवानीनगर, नशिराबाद) असे मृत महिलेचे नाव असून, विकास जगन जाधव (वय ३३) असे आरोपी पतीचे नाव आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास जाधव याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नी मंदा हिला…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२३ जून २०२६ मेष राशी आज तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण विचार न करता केलेला खर्च नंतर अडचणी निर्माण करू शकतो. तुमच्या बेसावध बोलण्यामुळे काही लोक दुखावले जाऊ शकतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी गांभीर्याने वागणेच हिताचे ठरेल. कामाच्या ठिकाणी थोडीशीही निष्काळजीपणा गुंतागुंत निर्माण करू शकतो, म्हणून प्रत्येक काम काळजीपूर्वक करा. वृषभ राशी आज उपासना आणि धार्मिक कार्यांकडे अधिक ओढ असेल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल. तसेच, दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळू शकेल. मिथुन राशी आजचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्र विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन विजयी झाले. या निवडणुकीत एकूण ६१६ मतदानापैंकी एकूण ६११ वैध मते नोंदविण्यात आली होती. त्यापैकी नंदकिशोर महाजन यांना सर्वाधिक ५८२ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये तायडे शरद शामराव यांना १७ मते, अनिल छबिलदास चौधरी यांना ११ मते तर रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. याशिवाय ५ मते अवैध ठरली. मतमोजणीदरम्यान टेबल क्रमांक १ वर श्री. महाजन यांना २०७, टेबल क्रमांक २ वर १९१ आणि टेबल क्रमांक ३ वर १८४ अशी एकूण ५८२ मते मिळाली. मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेने जिल्हा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, महायुतीने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत महायुतीने तब्बल १७ पैकी १६ जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. तर महाविकास आघाडीला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. १८ जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवडणुकीत मतदानापूर्वीच १७ पैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष लढत केवळ ११ जागांसाठी झाली. या ११ पैकी १० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजयाचा झेंडा फडकावला. मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असताना मागच्या दरवाजाने घरात घुसून दीपक प्रकाश निकम (वय ३५) याने या मुलीवर अत्याचार केला. ही घटना दि. ७एप्रिल रोजी तालुक्यातील एका गावात घडली. काही दिवसांच्या अंतराने त्याने पुन्हा हे कृत्य केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. २० जून रोजी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय तरुणी घरात एकटीच असताना दीपक निकम हा घराच्या मागच्या दरवाजाने घरात घुसला. मुलगी स्वयंपाक खोलीत काम करत असताना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला तो दुसऱ्या खोलीत घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतरही त्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा तब्बल ५७७ मतांच्या फरकाने पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महाजन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. दरम्यान, मतमोजणी सुरू असताना महाविकास आघाडीचे उमेदवार…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  शहरातील पुंडलिकनगर परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या भीषण गॅस सिलिंडर स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. महारुद्र हनुमान मंदिराजवळील एका दुमजली इमारतीत झालेल्या या दुर्घटनेत ४५ वर्षीय महिलेचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे इमारतीत अडकलेल्या अन्य नऊ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर परिसरातील संबंधित दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर दुकाने असून वरच्या मजल्यावर निवासी घरे आहेत. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास तळमजल्यावरील एका दुकानाला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानाच्या पाठीमागील खोलीत ठेवलेल्या चार गॅस सिलिंडरपैकी एका सिलिंडरचा गळतीमुळे भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की त्याचे हादरे…

Read More

कोल्हापूर : वृत्तसंस्था  केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकास प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात महत्त्वाची माहिती देताना शिवसेनेतील फुटीच्या राजकारणावरही भाष्य केले. “आता एकच शिवसेना राहिली आहे आणि ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना,” असे विधान करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ‘शिंदे गट’ म्हणून संबोधले जात होते. मात्र आता तो कोणताही गट राहिलेला नसून तीच खरी शिवसेना असल्याचे जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात एकच शिवसेना असून ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

परभणी : वृत्तसंस्था  परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध श्रीक्षेत्र यशवाडी देवस्थान येथे शनिवारी दुपारी अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मंदिर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या सभामंडपाचे पिलर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली असून, प्राथमिक माहितीनुसार ६ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ८ ते १० भाविक गंभीर जखमी झाले असून, ३० ते ४० भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यशवाडी देवस्थान हे परभणी जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून दर शनिवारी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. शनिवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. मंदिरासमोरील सभागृहात कीर्तन, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन…

Read More