जळगाव : प्रतिनिधी दुचाकीने घरी जाणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना विरुद्ध दिशेने आलेल्या पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात वरुण विजय सुरवाडे (रा. श्रावस्ती रेल्वे हॉस्पिटलच्या मागे, भुसावळ) हा तरुण ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला होता. याप्रकरणी दि. २५ रोजी धडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील वरुण सुरवाडे व त्याचा मित्र पवन अडकमोल हे दि. २४ ऑगस्ट रोजी दुपारी (एमएच १९, ईआर ८४९३) क्रमांकाच्या दुचाकीने भुसावळकडे जात होते. महामार्गावरील ऑटोनगरकडून जात असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच २०, जीसी ९६८४) क्रमांकाच्या भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार विजय सुरवाडे हा जागीच…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील पती पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वे खाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना २७ रोजी पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल , त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी , व अंगणवाडीत असलेला राज याना सोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. त्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. पहाटे ४:४० वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसाना कळवले आहे. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी एपीआय गणेश अहिरे , हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील ,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील भरत नारायण भट (वय २६) व खेडी परिसरातील योगेश कैलास माळी (२०, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील भरत नारायण भट (वय २६) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुसऱ्या एका घटनेत योगेश कैलास माळी (वय २०, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या तरुणाने गळफास घेतला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
अमळनेर : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील एका गावात २७ वर्षे महिलेला गोड बोलून स्वतःच्या बहिणीच्या गावी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २२ ऑगस्टला रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील रोहिदास चत्तरसिंग बारेला (वय ३५, रा. अंबावतार, ता. वरला, जि. बडवाणी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील पीडित २७ वर्षीय पीडित महिला सध्या अमळनेर तालुक्यातील एका गावात पती सोबत राहते. दरम्यान, या महिलेचे पती शेतात गेले असता तिच्या गावातील रोहिदास बारेला हा २२ मे ऑगस्टला आला. त्यानंतर तिच्याशी गोड बोलून तो नि पीडित महिलेला धरणगाव तालुक्यातील एका गावात त्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी देवाच्या कार्यक्रमासाठी भावाकडे मुक्कामी थांबलेल्या अर्चना प्रशांत मगर (वय ४०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ५ तोळे सोने, १५ भार चांदी व ३० हजारांची रोकड असा एकूण २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये घडली. त्यानंतर चोरट्यांनी अन्य दोन घरांमध्ये देखील चोरी केली. एकाच रात्रीत तीन घरांमध्ये घरफोडी केल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील साई पाडुरंग सोसायटीमध्ये अर्चना मगर या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. २३ ऑगस्ट रोजी त्यांचे – मोठे भाऊ रविंद्र इंधाटे यांच्याकडे देवाचा कार्यक्रम असल्याने मगर…
जळगाव : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी लॉजिंग मॅनेजरसह तरुणाला मंगळवारी अटक केली. सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू असताना सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नितीन सुभाष महाजन (२३, रा. वाघोड, ता. रावेर) हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फ्रेश होण्यासाठी सावदा रोडवरील वैशाली लॉजिंग येथे घेऊन गेला होता. याचदरम्यान सणानिमित्त पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी केली जात होती. या…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून ‘खेलो इंडिया संवाद – खेल की बात PM के साथ’ हा विशेष राष्ट्रव्यापी कार्यक्रम २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्ह्यातील तीन ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांनी दिली. यावेळी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एच. नारखेडे उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यात हा कार्यक्रम डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव, मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव आणि श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भुसावळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात युवा,…
जळगाव : प्रतिनिधी स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शुक्रवारी ४ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात दोन दिवसांत आणखी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. लागोपाठ होणाऱ्या महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. जळगाव शहरातील येथील नाथवाडा येथील रहिवासी सरूबाई तुकाराम पाटील या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने अनधिकृतपणे वीज जोडल्याचे आढळले. या ग्राहकाने ७ हजार ७१० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगरातील रहिवासी भूषण रवींद्र खलसे (क्य २५) हा बेपत्ता तरुण सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेव्हरे धरणात मृत अवस्थेत आढळून आला. भूषण रविवारी सकाळी ८ वाजेपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही. सोमवारी सायंकाळी नेव्हरे धरण परिसरात त्याची दुचाकी, मोबाइल व घड्याळ आढळून आले. शंका आल्याने धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता भूषणचा मृतदेह मिळून आला. याबाबत पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात या दोन्ही बाजूंनी एमआयडीसी पोलिस तपास…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कन्हेरे येथे २४ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दक्ष राजेंद्र नेरकर (वय १२ वर्षे) हा शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहायला गेला होता. दरम्यान, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर, लगेच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

