Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात खळबळ : लॉजमध्ये दिला अल्पवयीन मुलीला रूम; मॅनेजरसह तरुण अटकेत
    क्राईम

    जिल्ह्यात खळबळ : लॉजमध्ये दिला अल्पवयीन मुलीला रूम; मॅनेजरसह तरुण अटकेत

    editor deskBy editor deskAugust 26, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी लॉजिंग मॅनेजरसह तरुणाला मंगळवारी अटक केली. सणाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिसांकडून हॉटेल व लॉजिंगची तपासणी सुरू असताना सावदा रोडवरील वैशाली लॉजिंगमध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नितीन सुभाष महाजन (२३, रा. वाघोड, ता. रावेर) हा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला फ्रेश होण्यासाठी सावदा रोडवरील वैशाली लॉजिंग येथे घेऊन गेला होता. याचदरम्यान सणानिमित्त पोलिसांकडून शहरातील हॉटेल व लॉजिंगची तपासणी केली जात होती. या तपासणीमध्ये संबंधित मुलगी व तरुण लॉजमध्ये असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

    चौकशीदरम्यान लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला रूम देताना आवश्यक ती ओळख पडताळणी करण्यात आली नसल्याचे समोर आले. तसेच लॉजच्या रजिस्टरमध्येही संबंधित व्यक्तींची नोंद करण्यात आलेली नव्हती. वैशाली लॉजिंगचा मॅनेजर सुभाष चुडामण पाटील (४३, रा. अजंदा, ता. रावेर) याने कोणतेही ओळखपत्र न घेता रूम उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.

    पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलगी लॉजमध्ये असल्याची माहिती असूनही संबंधित बाब पोलिसांना कळविणे आवश्यक असताना मॅनेजरने ती माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब असल्याने पोलिसांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत दोन्ही आरोपींना अटक केली.

    या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(l), ३५१ (२) (३) तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ मधील कलम ४, १६ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषतः पॉक्सो कायद्यातील कलम २१ नुसार, अशा गुन्ह्याची माहिती असूनही ती संबंधित यंत्रणेला न देण्याबाबतही कायदेशीर तरतूद आहे.

    गुन्ह्याची नोंद पोहेकॉ नितीन आमोदकर यांनी तातडीने केली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे हे पुढील तपास करीत आहेत. लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. अल्पवयीन मुला-मुलींना बेकायदेशीरपणे निवासाची सुविधा उपलब्ध करून देणे अथवा संशयास्पद प्रकाराची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धक्कादायक : एकाच दिवशी दोन तरुणानी घेतला टोकाचा निर्णय !

    August 26, 2026

    धरणगाव तालुक्यात खळबळ : मध्यरात्री महिलेवर अत्याचार !

    August 26, 2026

    पिंप्राळा परिसरात एकाच रात्री तीन घरफोडी : लाखोंची रोकड गायब !

    August 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.