Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील १६ वर्षीय मुलीला पोटात अचानक तीव्र दुखू लागल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीचे वडील संतोष सोनवणे यांनी केली आहे. याबाबत संतोष सोनवणे (वय ४१, रा. रूपवते हाउसिंग सोसायटी, भुसावळ, ) यांनी दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांची मुलगी नेहा संतोष सोनवणे (वय १६ वर्षे) ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता नेहाने पोट दुखत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर ते कामावर जाण्यासाठी…

Read More

जळगाव : विजय पाटील  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी माजी मंत्री व शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे मात्र या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून ते थेट जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आमदार खासदाराला आमंत्रण होते मात्र या कार्यक्रमाला भाजपच्या सर्वच नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राज्यात एकेकाळी बारा खात्याचे मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले मुक्ताईनगर चे आमदार एकनाथराव खडसे हे 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्त मुक्ताईनगर शहरात अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साह सुरू झाला आहे मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या वाहन पंक्चर झाल्यामुळे महामार्गाच्या कडेला उभे केले होते. चोरट्यांनी त्या वाहनासह साहित्य असा एकूण ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २५ ते दि. २७ऑगस्ट दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील सिंधी कॉलनीत राहणारे चेतन सर्वानंद राजपाल (वय ४८) यांचा चष्मा, बेल्ट, हेडफोन, मोबाईल चार्जरसह कटलरी साहित्याची ओमनी कारमधून विक्री करुन आपला उदनिर्वाह करतात. दि. २५ रोजी दिवसभर व्यवसाय केल्यानंतर रात्री १० वाजता त्यांनी सर्व साहित्य (एमएच ०४, डीजे ५४६२) क्रमाकाच्या ओमनीत टाकुन घरी जाण्यासाठी निघाले. परंतू त्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाल्यामुळे त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दुचाकी काढत असताना गर्दीचा फायदा घेत अनिल राजमल कासट (वय ६२, रा. म्हाडा कॉलनी) यांच्या खिशातून चोरट्यांनी १२ हजार ५०० रुपये लांबविले. ही घटना दि. २६ ऑगस्ट रोजी शाहूनगरमध्ये घडली होती. या प्रकरणी दि. २७ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होऊन सईद खान नजीरखान (वय २७), समीरखान मजीद खान (वय ३५, दोन्ही रा. गेंदालाल मिल) या दोघांना अटक करण्यात आले आ हे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचाही या चोरीमध्ये सहभाग असल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महेश प्रगीत मंडळ येथे व्यवस्थापक म्हणून काम करणारे अनिल कासट यांचा दूध विक्रीचाही व्यवसाय आहे. दि. २६ रोजी…

Read More

अमळनेर :  प्रतिनिधी  शहरातील मातोश्री नगर परिसरातील श्री चामुंडा माता मंदिरात २८ रोजी रात्री चोरट्यांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांत मातोश्री नगर परिसरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चामुंडा माता मंदिराच्या दरवाजाचे २८ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील कपाट फोडून त्यातील ऐवज चोरी केला. तसेच माते मूर्तीवरील सोन्याच्या टिकल्या, बांगड्या तसेच दानपेटीतील रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. चोरट्यांनी मंदिरातील कपाटे व इतर साहित्याचीही नासधूस केली आहे. सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेमुळे मातोश्री नगर…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. एकाच वेळी शहरात अनेक विकासकामे सुरू असल्याने नाशिककरांना सध्या मोठा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळे आम्हाला लोकांच्या शिव्याही खाव्या लागत आहेत, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. मात्र, ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर हेच लोक आपल्याला फुलांचे हार घालतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यातील कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करणारे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला. नाशिकमध्ये आयोजित ‘सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिकमध्ये…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी  तालुक्यातील खडके येथील पिता-पुत्रावर नर्मदा नदीत जलदुर्घटनेचे संकट ओढवले. जबलपूर परिसरातील नर्मदा नदीकाठी असलेल्या आश्रमात गेले असताना मुलगा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी घेतली; मात्र वेगवान प्रवाहात तेही वाहून गेले, शोधमोहिमेत वडिलांचा मृतदेह सापडला असून, मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. गणेश शांताराम पाटील (वय ३६) व लकी गणेश पाटील (वय ११) अशी दोघांची नावे आहेत. खडके येथील संबंधित परिवारासह गावातील आणखी दोन-तीन परिवार १९ ऑगस्ट रोजी जबलपुर परिसरातील नर्मदा नदीकाठी असलेल्या सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या आश्रमात गेले होते. नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी या आश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अन्नदानाची सेवा सुरू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आई माहेरी भावाला तर वडील त्यांच्या बहिणीच्या घरी राखी बांधण्यासाठी गेलेले असताना रोहित साहेबराव धनगर (१७, रा. दशरथनगर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (२८ ऑगस्ट) दुपारी घडली. बहिणीला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देण्याचे स्टेटस व मित्रांना मेसेज पाठवून रोहितने ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी जीवन संपविले. ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. वडील साहेबराव धनगर हे रोहित व मुलीला घेऊन मेहरुण परिसरात बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेले होते. तेथून रोहित हा एकटाच घरी आला व त्याने गळफास घेतला. रोहित याने घरी आल्यानंतर मित्रांना मेसेजद्वारे आत्महत्या करत असल्याचे कळविले. ते मेसेज पाहून मित्रांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रक्षाबंधनाच्या चांदीच्य दिवशीच जळगावच्या सुवर्ण बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यापासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या दराला शुक्रवारी काहीसा ब्रेक लागला. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाजारात येणाऱ्या ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जळगावच्या सुवर्ण बाजारात सोमवारी दि. २४ ऑगस्ट रोजी तीन टक्के जीएसटीसह सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम १ लाख ६८ हजार ८१७ रुपये होता. गेल्या काही दिवसांत दरात सातत्याने वाढ होत होती. मात्र, शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात ४ हजार ५३२ रुपयांची घट होऊन भाव १ लाख ६४ हजार २८५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील सावदा येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला, सुगंधित तंबाखू व केशरयुक्त पानमसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला सावदा पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ रंगेहात पकडले. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरलेली होंडा अमेझ कार असा एकूण १० लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना २७ रोजी रात्री १०.५० वाजता राखाडी रंगाच्या होंडा अमेझ कारमधून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी तांदलवाडी फाट्याजवळ सापळा रचला. रात्री ११.०४ वाजता संशयित कार तेथे येताच पोलिसांनी ती थांबवून तपासणी केली. तसेच कारचालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव सारंग मुरलीधर अवचार (वय…

Read More