Author: editor desk

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील डांभुर्णी येथे भर चौकात गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या कोळन्हावी येथील विद्यमान सरपंचाला यावल पोलिसांनी अवघ्या काही तासांत जळगाव येथून ताब्यात घेत अटक केली. विकास उर्फ गोटू जगन्नाथ सोळंके (वय ३७, रा. कोळन्हावी, ता. यावल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२७ ऑगस्ट) रात्री सुमारे आठ वाजता डांभुर्णी गावातील चौकात विकास सोळंके याने गावठी कट्ट्यातून हवेत फायर केल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद यांच्यासह…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत घरातील सुमारे ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने रात्री सुमारे १.३० ते २ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाट फोडण्यात आले. कपाटातील सोने आणि रोकड चोरून चोरटा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  प्रवाशांना अधिक सुलभ, सोयीस्कर आणि जलद तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस नूतनीकृत रेल्वे तिकीट खिडकीची सुविधा आज, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. या नूतनीकृत तिकीट कार्यालयाचे उद्घाटन माननीय खासदार श्रीमती स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय आमदार श्री राजू मामा भोळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री पुनीत अग्रवाल, वरिष्ठ शाखा अधिकारी, स्टेशन प्रबंधक, रेल्वे कर्मचारी तसेच प्रवासी आणि नागरिक उपस्थित होते. जळगाव रेल्वे स्थानकाच्या शिवाजीनगर बाजूस असलेल्या या तिकीट खिडकीमुळे परिसरातील प्रवाशांना रेल्वे तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यामुळे विशेषतः शिवाजीनगर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहरातील सिद्धेश्वरनगर परिसरात दंगल घडवून आणल्याच्या पार्श्वभूमीवर तडीपार करण्यात आलेला निलेश काळे याने तडीपारीच्या आदेशाला धाब्यावर बसवत पुन्हा वरणगाव शहरात प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सिद्धेश्वरनगर परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवत सापळा रचला. अखेर दि. २६ रोजी रात्री सातच्या सुमारास सिद्धेश्वरनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. निलेश काळे याच्याविरुद्ध वरणगाव पोलिस ठाण्यात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक बागुल यांनी पोलिस पथकाला तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपपोलिस अधिकारी मंगेश बेंडकोळी यांच्यासह पोलिस कर्मचारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तरुणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना गुरुवार दि. २७ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये निखील सुनिल पाटील (वय ३४, रा. सदोबानगर) व राजन सुकलाल बारी (वय २८, रा. जुने जळगाव) या दोघांचा समावेश असून दोघांच्याही आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील सदोबा नगरात राहणारे निखील पाटील हे एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानात कामाला होते. गुरुवार दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ते महामार्गालगत असलेल्या हॉटेल त्रिमुर्तीजवळ दुकानाचे गोडावून असून निखील पाटील हे दुकानातून गोडावूनमध्ये वस्तू घेण्याकरीता आले होते. याच वेळी सामान…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी घडली. मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या वडिलांचाही बुडून मृत्यू झाल्याने तलवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अण्णा तलवारे (वय १०) हा तलावात गेला असता तो पाण्यात बुडू लागला. मुलाला बुडताना पाहून त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्य विषयक गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्तींविरुद्धच्या एमपीडीए कायद्यांतर्गत जळगाव जिल्ह्यातील ९ गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाजिद खान साबीर खान (वय २९, रा. नागदरोड, चाळीसगाव) याच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाजिद खान याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न, विनयभंग, गंभीर दुखापत, दुखापत तसेच गैरकायदा मंडळी जमवून दहशत निर्माण करण्यासारख्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचे प्रेस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास देण्यासह तिच्या आईला शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या धनराज गजानन कोळी याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी ६ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येऊन धनराज कोळी याने २१ ऑक्टोबर २०१८ रोजी मुलीला बाहेर बोलवत ‘तू माझ्या सोबत प्रेमसंबंध ठेव’ असे म्हणाला होता. त्या वेळी मुलीची आई घरा बाहेर आली असता तिला शिवीगाळ करत ‘तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाऊ, तू आमचे काहीही करू शकत नाही. आमच्या नांदी लागली तर तुला व्यवस्थित जगू देणार नाही’ अशी धमकी दिली होती. या घटनेपूर्वीही मुलगी शाळेत जात असताना…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा ते जळगाव महामार्गावरील खेडगाव (नंदिचे) गावानजीक भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २८ वर्षीय दुचाकीचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हनुमान नगरसह म्हसावद गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोऱ्यातील हनुमान नगरमधील शाहरुख मन्सुर पिंजारी (वय २८) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाने नाव आहे. दरम्यान, शाहरुख पिंजारी हे ईद ए मिलाद साजरी करुन दुचाकीने म्हसावद येथे सासरवाडीला जात होते. दरम्यान, जळगावकडुन पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने शाहरुख पिंजारी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. खेडगाव (नंदिचे) गावानजीक झालेल्या या अपघातात शाहरुख पिंजारी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मयत शाहरुख…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कावड यात्रेमध्ये रस्त्याने पायी जाणाऱ्या चिमुकल्याला वाहनाने चिरडल्यानंतर संतप्त जमावाकडून वाहन चालक उबेद खान इकबाल खान (वय चालक उबेद खान इकबाल खाना जात होती. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर जमावातील काही जणांनी पोलिसांना धक्काबुक्की करीत चालकाला बाजूला करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जमावाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगावकडून ममुराबादकडे जात असलेल्या आयशने वाहनाने म्हाळसा देवी मंदिराजवळ कावड यात्रेतील चिमुकल्याला चिरडले. त्यानंतर चिरडले त्यानंतर बालकाला चिरडणारे (एमएच २०, ईजी ३५९३) क्रमांकाचे वाहन पेटवून दिले होते. घटनेच माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोनि शशिकांत पाटील, प्रदीप राजपूत, किरण पाटील, बापू कोळी, प्रकाश चिंचोरे व…

Read More