Author: editor desk

यावल : प्रतनिधी  तालुक्यातील चिंचोली येथील पेट्रोल पंपावर तरूणांचा आपसात वाद झाला. त्यात एकास मारहाण तर एकास शिविगाळ करण्यात आली. डायल ११२ वर कॉल केल्याने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी संबधीत शिवीगाळ करणाऱ्यांना अटक का केली नाही. या रागातून एकाने पोलिस ठाण्यात येवून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी दि. २४ रोजी घडली. याप्रकरणी तरूणाच्या तक्रारीवरून एका विरूध्द तसेच या तरूणाविरूध्द देखील अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार  चिचोली येथील पेट्रोल पंपावर समाधान धनगर व महेंद्र रूले हे दुचाकीवर गेले होते. तेथे त्यांच्याशी शुभम पाटील याने महेंद्र रूले यास मारहाण केली व समाधान धनगर यास शिवीगाळ केली आणि तुम्हाला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावत तीन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत एकूण ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील आहुजा नगर येथे राहणारे फिर्यादी मनोज शंकर गरुड यांच्या मालकीची एमएच-१९ डीडी-८३२३ क्रमांकाची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली होती. फिर्यादींचा मुलगा गरुड हा एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामाला असल्याने त्याने १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता मोटारसायकल एमआयडीसी परिसरात उभी केली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजता काम आटोपून परत आल्यानंतर मोटारसायकल जागेवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चोपडा शहरातील मल्हारपुरा परिसरातील १५ वर्षीय विद्यार्थी दि.२३ रोजी मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. हाशीम अरमान खाटीक असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, हाशीम अरमान व खाटीक हा त्याचे दोन वर्गमित्र प्रसाद वासुदेव मराठे (१५, रा. पाटील गढी, चोपडा) आणि शेख अबू सिद्दीक कलीम (१५, रा. के.जी.एन. कॉलनी, जमजम पार्क, चोपडा) हे तिघेही वेले या गावाकडे फिरायला गेले होते तेथून शहरातील – धनवाडी फाट्या जवळील पाटचारीत पाणी पाहून ने त्यांचा पाण्यात पोहण्याचा मोह झाला. यावेळी . मयत हाशीम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कुठलाही परवाना नसतांना वाळूची चोरटी वाहतुक करणारे दोन पिकअप वाहनांवर तालुका पोलिसांनी कानळदा ते विदगाव रस्त्यावर कारवाई केली. दोन वाहने जप्त केली असून ही कारवाई दि. २२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजता केली. याप्रकरणी वाहन चालकांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील काळनदा ते विदगाव रस्त्यावरील एमएसईबीच्या सब स्टेशनजवळून विना परवाना वाळूची वाहतुक करणारे (एमच १९, सीएक्स ३८३३) क्रमांकाचे वाहन तालुका पोलिसांनी दि. २२ रोजी मध्यरात्री पकडले. वाहन चालकाकडे परवाना मागितला असता त्याकच्याकडे कुठलाही परवाना नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी वाहन ताब्यात घेत वाहन चालक प्रफुल्ल गुणवंत नेहते (वय ३१, रा. जैनाबाद, मोहन टॉकीजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील बालाजी पेठेतून दुचाकी चोरणाऱ्या शेख ईरफान शेख रईस (रा. एरंडोल) या चोरट्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडन चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळलेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी पेठेतून निलेश प्रकाश बोरसे (वय २७) यांची दि. १३ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली होती. बाहेरगावाहून परतल्यानंतर ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक संतोष खेडकर, परि. उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, पराग दुसाने, अमोल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात आज सकाळी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली, यावेळी जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री.आदित्य जीवने (भा.प्र.से.) यांनी संपूर्ण गोलाणी मार्केट परिसराची पाहणी करून स्वच्छता, अतिक्रमण तसेच गाळेधारकांच्या विविध समस्यांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मार्केट परिसरात वाढीव अतिक्रमण, दुकानांसमोरील ओटे, अनधिकृत बोर्ड व फ्लेक्स यामुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. मार्केट परिसरातील वाढीव अतिक्रमण, ओटे, बोर्ड व फ्लेक्स यांच्यावर तात्काळ कारवाई करून संबंधितांकडून दंड आकारण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. थकीत वसुली तातडीने भरण्याचे निर्देश गोलाणी मार्केटमधील ज्या गाळेधारकांकडे महानगरपालिकेची वसुली अथवा भाडे थकीत आहे, त्यांनी लवकरात लवकर थकीत रकमेचा…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे जाणाऱ्या एसटी बसचा कन्नड घाटात स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटल्याने बसचे नियंत्रण सुटल्याची थरारक घटना रविवारी (दि. २३ ऑगस्ट) सकाळी घडली. नियंत्रण सुटलेली बस घाटातील कठड्याला अडकून थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. या बसमध्ये तब्बल ५९ प्रवासी होते. सुदैवाने सर्व प्रवाशांचा जीव बचावला असून, चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस क्रमांक एमएच ४० एन ९७२६ ही छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे प्रवाशांना घेऊन जात होती. कन्नड घाटातून बस जात असताना अचानक स्टेअरिंग रॉड जॅम होऊन तुटला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस अचानक अनियंत्रित झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, बस घाटातील कठड्याला अडकून…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव या गावात हॉटेल जत्राच्या मागे असलेल्या एका गुरांच्या गोठयात २३ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली असून, त्याला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुण हा आडगाव (ता. यावल) येथील रहिवाशी होता. मिळालेल्या माहितीनुसार,  किनगाव ता. यावल या गावात हॉटेल जत्रा आहे. या हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या गुरांच्या गोठयात गणेश हाजी बारेला (वय २३ रा. आडगाव ता. यावल) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा तरुण बेशुद्ध अवस्थेत तेथे…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथे अवजड केबल टाकण्याचे काम सुरू असताना जीर्ण झालेला सिमेंटचा वीज खांब अचानक अर्ध्यातून तुटल्याने जवळपास २० फूट उंचीवरून खाली पडल्याने उत्तर प्रदेशातील एका २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी अपघातात उत्तर प्रदेशातील नितीन दिवाकर (वय २१, रा. देवीपूर, जि. कानपूर) या कामगारा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीसी लिमिटेड (हैदराबाद) या कंपनीकडून परिसरात वीजवाहक केबल टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी नितीन दिवाकर यांच्यासह सहा कामगार आले होते. शनिवारी भातखंडे बुद्रुक गावातील एका रहिवासी घराच्या बाथरूमजवळ असलेल्या जुन्या व जीर्ण सिमेंटच्या खांबावरून अवजड केबल ओढली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  कंपनीत कामगारांना रोजंदारीने लावून त्याच्या मोबदल्यात प्रति कामगार दीडशे रुपये कमिशन देण्याचे व बनावट हिशोब दाखवून मोठा नफा मिळवून देतो. असे अषिष दाखवून योगिता शाम देवरे (वय ४७, रा. शिंदे नगर, पिंप्राळा) या महिलेची त्याच्या दीराचा शालक महेंद्र उर्फ मनोज बाळकृष्ण सोनार (रा. जळगाव) याने ७६ लाख ७७ हजार रुपयात फसवणुक केली. ही घटना दि. ७ एप्रिल २०२२ ते दि. ३० एप्रिल २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शहरातील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरात योगिता देवरे या वास्तव्यास असून त्यांचा सख्खा चुलत दिराचे शालक मनोज उर्फ महेंद्र…

Read More