Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रविवारपासून बेपत्ता भूषणचा सोमवारी मृतदेह; नेव्हरे धरणातील घटनेने खळबळ
    क्राईम

    रविवारपासून बेपत्ता भूषणचा सोमवारी मृतदेह; नेव्हरे धरणातील घटनेने खळबळ

    editor deskBy editor deskAugust 25, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :  प्रतिनिधी 

    तालुक्यातील शिरसोली येथील बारी नगरातील रहिवासी भूषण रवींद्र खलसे (क्य २५) हा बेपत्ता तरुण सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नेव्हरे धरणात मृत अवस्थेत आढळून आला. भूषण रविवारी सकाळी ८ वाजेपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाइकांनी सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही.

    सोमवारी सायंकाळी नेव्हरे धरण परिसरात त्याची दुचाकी, मोबाइल व घड्याळ आढळून आले. शंका आल्याने धरणाच्या पाण्यात शोध घेतला असता भूषणचा मृतदेह मिळून आला. याबाबत पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात या दोन्ही बाजूंनी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भूषणच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ज्याला लेकरासारखं प्रेम दिलं, त्याच भाच्याने मावशीचा जीव घेतला! ४० दिवसांनी समोर आलं काळीज पिळवटणारं सत्य”

    September 13, 2026

    समता नगरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम; परिसरात कायमस्वरूपी CCTV कॅमेऱ्यांची सुविधा!

    September 13, 2026

    रूपाली महाजन यांनी घेतला पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा आशीर्वाद; शहर विकासासाठी दिला महत्त्वाचा सल्ला !

    September 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.