चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला आज नवी दिशा आणि नवा वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण विकासाची गंगा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आणत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, निधी आणि विकासकामांचा लाभ चाळीसगावच्या जनतेला मिळवून देण्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात आणि संवादात मंगेशदादा हे आवर्जून सांगतात की, “मोदीजींची प्रेरणा, फडणवीस साहेबांचे नेतृत्व आणि गिरीशभाऊ महाजन यांचे मार्गदर्शन व भक्कम पाठबळ यामुळेच चाळीसगावच्या विकासाची ही मोठी कामे करणे शक्य होत आहे.” चाळीसगावच्या विकासाचा विचार करताना केवळ…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पाण्याचा प्रश्न आता उद्याचा राहिलेला नसून तो आजचाच प्रश्न आहे. पाऊस किती आणि कधी पडेल हे आपल्या हातात नाही; मात्र पडलेले पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे आणि जमिनीत जिरवणे आपल्या हातात आहे. पाणीटंचाईवर दीर्घकालीन मात करायची असेल, तर वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवावा लागेल. जलसंधारण हा केवळ शासनाचा कार्यक्रम न राहता लोकसहभागातून त्याला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जलसंधारण दिनानिमित्त जळगाव येथील सागर पार्क येथे आयोजित ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, औद्योगिक भूखंड, सक्षम दळणवळण व्यवस्था आणि निर्यातीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना विदर्भाच्या धर्तीवर ‘डी प्लस’ दर्जा देण्यास मान्यता मिळाली असून, त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होणे बाकी आहे. या अनुकूल वातावरणाचा लाभ घेऊन जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी जळगावमध्ये नवीन उद्योग उभारावेत. उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. त्याचबरोबर उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देत जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती द्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्ह्यात गुंतवणूक आकर्षित करणे, नवीन…
जळगाव : प्रतिनिधी दूर अँड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायाच्या नावाखाली इतरांच्या बँक खात्यावर सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल २ कोटी १५ लाख ३९ हजार २३० रुपये स्वीकारल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी करण भारत सांखला उर्फ सैनी (३१, रा. रायसोनी नगर, जळगाव, मूळ रा. मेढता सिटी, जि. नागौर, राजस्थान) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ९ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करत ही रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यांवर स्वीकारतात व नंतर काढून घेतात. अशी संशयास्पद रक्कम आलेले खाते होल्ड केले जातात. अशाच प्रकारे जळगावातील दोन जणांची बैंक खाती होल्ड…
जळगाव : प्रतिनिधी ‘मैत्री ठेवली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला ठार मारेन’ अशी धमकी देत तरुणाने मध्यरात्री तरुणीच्या घरासमोर जोरदार धिंगाणा घातला. इतकेच नाही तर, रागाच्या भरात त्याने तरुणीची गाडी समजून इमारतीखाली उभ्या असलेल्या दुसऱ्याच एका व्यक्तीच्या कारची तोडफोड केल्याचा प्रकार जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील डेमला कॉलनी परिसरातील एका २१ वर्षीय तक्रारदार तरुणी आणि २३ वर्षीय तरुण मागील एका वर्षापासून मित्र होते. मात्र, काही कारणास्तव तरुणीला तरुणासोबतची मैत्री पुढे चालू ठेवायची नव्हती. तिने मैत्री तोडल्याचा तरुणाला राग आला. याच रागातून तरुणाने दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा ते…
बोडवड : प्रतिनिधी महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर निर्बंध असतानाही काही भागांत परराज्यातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून गुटख्याचा पुरवठा होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे बंदीच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान बोदवड येथे गुटख्याने भरलेले चार चाकी वाहन भरधाव वेगाने बोदवडहून जामनेरकडे जात असताना संध्याकाळी ६:३० मि. शेलवड घाटीमध्ये बोलेरो पिकप (एमएच जीसी२९६७ दुचाकी स्वार मोटरसायकल (एमपी ६८ झेडपी ५८८१) पल्सर गाडीला धडक देऊन जागीच मृत्यू झाल्याची बातमी उघडकीस आली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली व गुटख्याने भरलेली गाडी पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. मध्य प्रदेश राज्यातून गुटख्याची सर्रास चार चाकी वाहनातून वाहतूक करून तो स्थानिक पातळीवर…
जळगाव : प्रतिनिधी शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास पुलाचा भराव खचल्याने सध्या महामार्गावरील संपूर्ण वाहतूक शहरातून वळवण्यात आली आहे. यामुळे जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुरुवार दि. २० रोजी पहाटेच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी hue 1 जाणाऱ्या योगेश ऊर्फ युवराज कडून महाजन (वय ३८, रा. इच्छादेवी चौक) या तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बांभोरी पुलाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ईच्छादेवी चौकात राहणारा योगेश उर्फ युवराज महाजन यांची इच्छादेवी चौकातच नाश्त्याची गाडी लावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवार दि.…
जळगाव : प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती आणि नियुक्त्यांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी आता केवळ नाशिक विभागापुरती मर्यादित राहिलेली नसून राज्यभर विस्तारण्याच्या दिशेने आहे. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन कोणाकडे आहे, संस्थाचालक लोकप्रतिनिधी किंवा व्हीव्हीआयपी असो, कोणाचाही मुलाहिजा न ठेवता समान निकषाने चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाला (एसआयटी) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शालार्थ आयडी घोटाळ्यासह शिक्षक भरतीतील कथित गैरव्यवहारांमुळे शिक्षण क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान एसआयटीने मुंबई, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तपास सुरू असल्याची माहिती अंतरिम अहवालाद्वारे न्यायालयास दिली. एसआयटीने दोन सीलबंद पाकिटांमध्ये प्राथमिक अहवाल सादर केला. त्यातील एका…
जळगाव : प्रतिनिधी चहा पित असलेल्या पत्नीकडे वाईट नजरेने बघणाऱ्यास जाब विचारला असता, त्याचा राग आल्याने चौघांनी २७ वर्षीय विवाहितेसोबत अश्लिलकृत्य करीत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारहाण देखील केली. ही घटना दि. १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगरकडून कानळद्याकडे जाणाऱ्या चहाच्या दुकानावर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाकडून कानळद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चहाच्या दुकानावर २७ वर्षीय महिला दि. १६ ऑगस्ट रोजी तिच्या पतीसह चहा पिण्यासाठी आली होती. चहा पित असतांना त्याठिकाणी उभा असलेला एक जण महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. तिच्या पतीने तु माझ्या पत्नीकडे वाईट नजरेने का बघतोय असे…
जळगाव : प्रतिनिधी रशियन कंपनीने काही भाग भारतात विक्री केले आहे. त्याच्या भागीदारांकडून गुंतवणुकीवर नफा देणार असल्याचे सांगत अॅड. विजय बाबुलाल दाणेज (वय ५७, रा. विसनजी नगर) यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेवून त्यांची ७ लाख ६० हजारात फसवणूक केली. ही घटना दि. ६ जून २०१६ ते दि. २८ मार्च २०२० दरम्यान घडली. या प्रकरणी दि. १८ ऑगस्ट २०२६ विनोद निमानाथ सोनार (रा. कात्रज, पुणे), आनंद परदेशी (रा. पुणे) या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील विसनजी नगरात राहणारे अॅड. विजय दाणेज हे वकील आहे. त्यांचा जळगावातील एक मित्र पुणे येथील विनोद सोनार याला त्यांच्याकडे…

