Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  पाळधी येथे महाराष्ट्रातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या 22 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, राजू भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरणगाव येथे ट्रामा केसर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय उभारावे,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणावे यासाठी सासरच्या मंडळींनी जळगावातील विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत विवाहितेने फिर्याद दिल्यावरून पती, सासू-सासरे आणि दिराविरूढ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील हिराशिवा कॉलनीतील माहेर असलेले नेहा परेश सोनवणे (वय २२) हिचा विवाह पुणे येथील परेश मनोहर सोनवणे यांच्याशी २०२१ मध्ये झाला होता. काही दिवसानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ करून घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रुपयांची सासरच्या मंडळीकडून मागणी सुरु झाली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करण्यात आली. पैशांसाठी सासरे, सासू, दीर यांनी पैशांसाठी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी ’50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आंदोलनाच्या तयारीत असणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव शहरात आकाशवाणी चौकात मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून सत्कार आयोजित करण्यात आला. या कार्यकर्त्यांना नोटीस दिली होती आणि आंदोलन करण्याआधीच चौकात असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या बाहेर महानगराध्यक्ष अशोक लाडवंजरी, महिला महानगराध्यक्ष मंगला पाटील, रिकु चौधरी, सुनील माळी यांच्यासह ८ जणांना ताब्यात घेतले आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था IAS-IPS अधिकारी म्हटलं की एक अभ्यासू, शिस्तप्रिय, कठोर अशी व्यक्ती समोर येते. असे अधिकारी त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी आणि धडाकेबाज निर्णयासाठी प्रसिद्ध असतात. पण सध्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या वेगळ्याच गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर असा व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो तुफान व्हायरल होतो आहे. महिला आयएएस अधिकाऱ्याने आपल्या सोशल मीडियावर प्रेमाचा एक रोमँटिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. खरं प्रेम म्हणजे काय असतं, हे दाखवण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्याने केला. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. डॉ. सुमिता मिश्रा असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव. डॉ. मिश्रा या हरयाणातील अॅग्रीकल्चर आणि…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येत्या तीन दिवसात अजून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून यानुसा जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा अलर्ट जारी केला आहे.परतीच्या मोसमी पावसाने राज्यात ठिकठिकाणी थैमान घातल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात देखील काही दिवसांपासून पाऊस सुरू असून येत्या तीन दिवसात म्हणजे २३ सप्टेंबर पर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने देखील जिल्हावासियांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल पाटील यांनी निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, दिनांक १९ ते दिनांक २३…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणसंदर्भात ही महत्वाची बातमी आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार एक समिती गठित करण्यात आली आहे. त्यात भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या उपसमितीमद्धे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभुराज देसाई आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष पद चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे. यापुढे मराठा आरक्षणबद्दल बैठका होतील किंवा शिष्टमंडळे येतील जे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील ते ही समिती घेईल यावरती शिक्कामोर्तब करण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. आगामी काळातील मराठा आरक्षण बद्दलचा…

Read More

बुलडाणा : वृत्तसंस्था बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरामध्ये मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील ८ वर्षीय चिमुकला जागीच ठार झाला तर आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. जखमी आई-वडिलांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. बुलडाण्यातील नांदुराजवळ हा अपघात घडला आहे. आयुष डाबेराव (वय ८ वर्ष) असं मृत मुलाचं नाव आहे. आयुष हा आपल्या आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. डाबेराव दाम्पत्य आपल्या दुचाकीने नांदुराकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. ट्रकची धडक बसल्यामुळे दुचाकीवरून तिघेही फेकले गेले. त्यामध्ये 8 वर्षीय आयुष डाबेराव हा चिमुकला जागीच ठार झाला तर त्याचे आई…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मनोरंजनाच्या विविध साधनांमध्ये देशातील मोबार्इल गेमिंग क्षेत्र झपाट्याने वाढत आहेत. गेमिंगचा थरार, आकर्षक बक्षीसे आणि अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे या खेळास अनेकांची पसंती मिळत आहे. प्रामुख्यानं तरुण पिढी याकडे आकर्षित होते त्यामुळे काही काळजीही घेणं गरजेचं आहे. देशात सध्या ३०० दशलक्षाहून अधिक लोक मोबाईल गेम खेळतात. संपूर्णपणे गेमिंग बाजार २०१९-२०२० मध्ये ३८ टक्के आणि २०२१-२२ या वर्षात ही बाजारपेठ ३७ टक्क्यांनी वाढली आहे. याचाच अर्थ गेल्या काही वर्षांपासून भारतात सोशल मीडियापेक्षा गेमिंग वेगाने वाढत आहे. भारताच्या सोशल मीडिया मार्केटमध्ये २०१९-२० मध्ये ११ टक्के आणि मागील आर्थिक वर्षात २६ टक्के वाढ झाली आहे. मोबाईल गेमिंगची बाजारपेठ सुमारे १.५ बिलियन…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था आईने “शाळेत जा’ म्हटल्याचा राग आल्याने नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आयुष्य संपवले. झोका खेळता-खेळता लहानाचा मोठा झालेल्या लायप्पा व्हनमाने याने त्याच झोक्याच्या दोरीने गळफास लावून घेतला. नई जिंदगी परिसरातील शिवगंगानगर भाग ३ मध्ये सोमवारी ही हृदयद्रावक घटना घडली. लायप्पा (१४) हा मूळचा मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील आहे. त्याचे आईवडील शेतमजूर आहेत. आईवडिलांनी लायप्पाला नई जिंदगी येथील त्याच्या मामाकडे लहानपणापासून शिक्षणासाठी ठेवले होते. मामा त्याच्याकडे विशेष लक्ष देत. नियमित अभ्यास करून घेत. मामाच्या घराजवळील शाळेत तो शिकण्यास होता. मामांकडे आईही आली होती. मुलगा शाळेत जात नव्हता. सोमवारी सकाळी लायप्पाला आईने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या ५ ते ६ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. बहुताश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कपाशी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ज्या ठिकाणी शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून राज्य शासनाच्या वतीने हवालदिल झालेल्या शेतकरीना मदत मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ५ ते ६ दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे व अजून पुढील काही दिवस हा पाऊस सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. बहुताश ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे कपाशी, मका व इतर…

Read More