मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (88) यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) कडक वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे यांच्यावर सुरुवातीला राळेगण सिद्धीजवळील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना तीव्र विषाणूजन्य संसर्ग आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणे या समस्या जाणवू लागल्या. वाढते वय आणि उपचारांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यानंतर स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिक चांगल्या आणि विशेष वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना तत्काळ मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या बॉम्बे रुग्णालयातील तज्ज्ञ…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी यावल शहर व तालुक्यातील तिघांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील रहिवासी व सांगवी खुर्द येथील रहिवाशी अशा दोघा तरुणांनी गळफास घेतला तर दहिगाव येथील एकाने विहिरीत उडी घेतली. या तिघा प्रकरणात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद न करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चोपडा रस्त्यावर इंदिरा गांधी ची हायस्कूलच्या शेजारील डांगपुरा भागात शेख मुजाहिद र्फ शेख मुन्शी मोमीन (वय ३९) या तरुणाने गळफास घेतला. हा प्रकार रविवारी रात्री निदर्शनास आला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय यावल येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद…
चाळीसगाव : प्रतिनिधी रक्षा बंधन उलटून १ दिवस होत नाही, तोवर भडगाव तालुक्यातील अंजनीनेरा येथील सासर असलेल्या व तालुक्यातील तळेगाव जवळील बिरोबावाडी येथील माहेरवासीन असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने दि.२९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहते गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील अंजनीनेरा येथील सासर असलेली विवाहिता शितल सुनील मोरे (वय १९) ही तालुक्यातील तळेगाव जवळील बिरोबावाडी येथे माहेरी आली. होती. दि.२९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातील व्यक्तींना शितल ही घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली त्यांनी लागलीच तिला स्थानिक रुग्णालयात नेवून चाळीसगाव येथे…
जळगाव : प्रतिनिधी मीरा भाईंदर पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाने जळगावात येवून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल सव्वा कोटी रुपये किंमतीचे ४ किलो ९०० ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. जळगावात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आमली पदार्थ मिळून आल्याने खळबळ माजून गेली आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जची तस्करी होत असतांना स्थानिक यंत्रणांना याबाबत साधी कल्पना देखील नसल्याने या यंत्रणा कुचकामी ठरु लागल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गांजापाठोपाठ एमडी या अमली पदार्थाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलाकडून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी कारवाईची मोहीम राबविली जात आहे. शहरातील शाहनगर, गेंदालाल मिल,…
भुसावळ : प्रतिनिधी घरगुती वादातून सुरू झालेला छळ सहन न झाल्याने ३० वर्षीय विवाहितेने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीसह सासरच्या चौघांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला असून, या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळ मलकापूर (जि. बुलढाणा) येथील असून सध्या भुसावळ शहरातील जाम मोहल्ला परिसरात वास्तव्यास आहे. तिचा विवाह – ५ एप्रिल २०१५ रोजी मलकापूर – येथील सैय्यद समीर उर्फ बबलू न उर्फ शाका डॉन याच्यासोबत मुस्लिम रितीरिवाजानुसार झाला. या दाम्पत्याला चार अपत्ये आहेत. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, विवाहानंतर सुरुवातीची दोन वर्षे संसार सुरळीत सुरू होता.…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर पाळधी ते तरसोद बायपास रस्त्यावर खचलेल्या ओव्हरब्रिजच्या दुरुस्तीदरम्यान सुरक्षेची कोणतीही काळजी न घेतल्याने रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला. ट्रक व तवेराच्या अपघातात एक ठाण तर चौघे जखमी झाले. कंत्राटदार ‘अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता यांच्यासह संबंधित साइट अधिकायांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अंमलदार अजय भोंबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाळधी ते तरसोद फाटा दरम्यानच्या नवीन रस्त्याचे व ओव्हरब्रिजचे बांधकाम अॅग्रो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने केले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये हे काम पूर्ण झाले. कराराच्या अर्थीनुसार पुढील तीन वर्षे रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी…
जळगाव : प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. मिळाळलेल्या माहितीनुसार, साळशिंगी शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था कुजलेली असल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या मृत व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील गलवाडे येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून स्कुटीवरून घरी परतणाऱ्या दोन जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास अमळनेर-गलवाडे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ घडली. भरधाव स्कुटीचा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने रंजाणे परिसरावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५), रा. रंजाणे यांचा समावेश आहे. गलवाडे येथे भंडारा-प्रसादाच्या कार्यक्रमासाठी स्कुटी क्रमांक एमएच ५४ ई ७६४ वरून गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा रंजाणेकडे परतत होते. पंडित भिल हे स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते.…
जळगाव : प्रतिनिधी घराच्या दुसऱ्या मजल्यावर चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या साहील सद्दाम शहा (वय २१, रा. तांबापुरा) या संशयित चोरट्याला निहाल दिनेशकुमार हसिजा (वय ३१, रा. सिंधी कॉलनी) यांनी रंगेहाथ पकडले. ही घटना दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात निहाल दिनेशकुमार हसिजा हे वासतव्यास असून त्यांचा व्यवसाय आहे. दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर संशयित साहील शहा हा चोरटा चोरी करण्याच्या उद्देशान अनधिकृतपणे शिरला. तसेच घरातील कपाट उघडून त्यातील ऐवज चोरी करतांना त्याला हसिजा कुटुंबियांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, संशयिताला पोलीस ठाण्यात…
जळगाव : प्रतिनिधी मंदिराच्या कामासाठी वाढीव १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये घेऊन मंदिराचे कामही पूर्ण केले नाही. तसेच घेतलेली रक्कमही देण्यास बांधकाम कंपनीच्या संचालकांनी नकार देत शहरातील स्वामिनारायण मंदिर संस्थानची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ऑगस्ट २०२२ ते मे २०२४ या दरम्यान घडली. या प्रकरणी गुजरातमधील बांधकाम कंपनीच्या संचालकांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात स्वामीनारायण मंदिराच्या बांधकामासाठी गुजरातमधील इंडर, जि. साबरकांठा येथील मांगल्य टेम्पल प्लॅडिंग अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीला दगडी काम देण्यात आले. यासाठी कंपनीचे संचालक नंदीशभाई मनहरभाई सोमपुरा, किशनभाई मनहरभाई सोमपुरा, मनहरभाई प्रभाशंकर सोमपुरा यांनी सांगितल्याप्रमाणे कमानी बांधण्यासाठी…

