Author: editor desk

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातून बोलावून नेत तिच्यावर स्मशानभूमीच्या आवारात नेवून अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला पहाटेच्या सुमारास घराजवळ आणून सोडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित साबीर पिंजारी (वय २२) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  कुटुंबिय नातेवाईकांकडे गेलेले असतांना घरी एकट्या असलेल्या १४ वर्षीय मुलीला संशयित साबीर उर्फ आसीफ पिंजारी याने रात्री १० वाजेच्या सुमारास घराबाहेर बोलावले. त्यानंतर तिला स्मशानभूमी परिसरात नेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला घराजवळ सोडून तो तिथून निघून गेला. हा प्रकार पीडित अल्पवयीन मुलीच्या काकाच्या निदर्शनास…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  टास्क पूर्ण करून त्यातून मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात सर्वे प्रगणक असलेले रणजित दशरथ पवार (वय ३०, रा. ढेकू बुद्रुक तांडा, ता. अमळनेर) यांची ६ लाख ४५ हजार ९०९ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाईन ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयात सर्वे प्रगणक म्हणून नोकरीस असलेले रणजित दशरथ पवार (वय ३०, रा. ढेकू बुद्रुक तांडा, ता. अमळनेर) यांना दि. १३ जुलै रोजी मेसेज आला व टेलिग्राम चॅनल ग्रुपला अॅड होण्यास सांगितले. कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर ५० टक्के परतावा मिळण्याचे अमिष दाखविण्यात आले. त्यासाठी दिलेल्या टास्कसाठी त्यांनी सुरुवातीला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  बोदवड शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खासगी क्लासेसमधील एका शिक्षकाने मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी संशयिताला मारहाण केली. या वेळी त्या शिक्षकाच्या नातेवाईकाने त्याला एका घरात डांबून ठेवले. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने दोन दुचाकी जाळल्या. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या वेळी संतप्त नागरिकांनी त्या शिक्षकाला ताब्यात देण्याची मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या मांडला. तर, पोलीस नागरिकांची रात्री उशिरापर्यंत समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, रात्री उशिरा एसपी आल्यानंतर शिताफीने संशयिताला जळगाव येथे नेण्यात पोलिसांना यश आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  बोदवड शहरातील शासकीय विश्राम गृहाच्या बाजुलाच एक…

Read More

जळगाव | प्रतिनिधी  राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून, भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना जारी केल्या आहेत असे उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीचा मसुदा संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सादर करणे, जाहिरातीत शैक्षणिक पात्रता व सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अचूक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात देण्याच्या सूचना आहेत. उमेदवारांकडून ऑनलाइन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राजस्थानकडून पत्रे घेऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील फेकरी ते साकरी उड्डाणपुलावर २ सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या केबिनचा चुराडा होऊन चालक वाहनाच्या पत्र्यामध्ये अडकला. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला असून त्याची सुटका करण्यात यश आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक प्रवीण दरेकर यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनरमध्ये चालक अडकल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची सुटका करण्यासाठी तातडीने क्रेन मागवले. क्रेनच्या सहाय्याने कंटेनरचा पत्रा सावधगिरीने उचलून त्यानंतर पोलिस व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करत चालकाला वाहनातन बाहेर काढले. गंभीर जखमी चालकाला स्थानिक नागरिकांच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  रक्षाबंधनानिमित्त कुटुंबीयांसह मूळ गावी गेलेल्या वकिलाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे जवळपास १०.५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्हीच्या वायरी कापून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे कैद झाले आहेत. या संदर्भात अॅड. नितीन सुरेश पाटील (वय ४२) यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन पाटील हे पत्नी शुभांगी, मुलगा अथर्व व मुलगी त्रीशा यांच्यासह शिवाजीनगर परिसरात राहत असून चाळीसगाव न्यायालयात ते वकिली करतात.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रस्त्याने बस घेऊन जात असताना एका विना क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने बस चालकाला अश्लील शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या बस चालकाने बसमधील प्रवाशांसह थेट जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगत दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर चालक बस घेऊन पुढील मार्गाला रवाना झाला. मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगाराची एमएच २०, बीएल २४८५ क्रमांकाची बस मंगळवारी खेडी-कढोलीकडून प्रवाशांना घेऊन नवीन बसस्थानकाच्या दिशेने येत होती. बस मानराज पार्क ते शिवकॉलनी दरम्यान आली असता एका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्स येथे पॅन्टच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, एका विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, रा. एम.आय.डी.सी., म्हाडा कॉलनी, जळगाव) हे शाहूनगर येथील शाहू कॉम्प्लेक्समध्ये असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत एडिप (ADIP) योजनेतून तसेच खासदार श्रीमती स्मिता वाघ यांच्या प्रयत्नातून भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिमको) यांच्या वतीने जळगाव लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व मोजमाप करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी इंद्रा भवन, स्वामीनारायण मंदिरामागे, अमळनेर येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तपासणी शिबिर होणार आहे. शिबिरासाठी यूडीआयडी कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची मूळ व छायांकित प्रत, आधारकार्डची छायांकित प्रत, तलाठी/तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला आणणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसल्यास बीपीएल कार्ड…

Read More

जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६ जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या धडक मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत इफेड्रिन व गांजा असा एकूण ११ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत मेहरुण येथील ५५ वर्षीय नूर मोहम्मद अब्दुल सलाम पटेल याला ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना एमआयडीसी परिसरात इफेड्रिन या अंमली पदार्थाची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या…

Read More